‘Miss you Raji…’ पती राज कौशलच्या आठवणींनी व्याकूळ झाली मंदिरा बेदी, शेअर केली भावनिक पोस्ट
अभिनेत्री मंदिरा बेदी (Mandira Bedi) हिने मंगळवारी रात्री उशिरा तिच्या इंस्टाग्रामवर पती राज कौशलची (Raj Kaushal) आठवण करुन देणारी एक अतिशय भावनिक पोस्ट शेअर केली. भारतीय चित्रपट निर्माते आणि मंदिरा बेदी हिचे पती राज कौशल यांचे 30 जून रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
मुंबई : अभिनेत्री मंदिरा बेदी (Mandira Bedi) हिने मंगळवारी रात्री उशिरा तिच्या इंस्टाग्रामवर पती राज कौशलची (Raj Kaushal) आठवण करुन देणारी एक अतिशय भावनिक पोस्ट शेअर केली. भारतीय चित्रपट निर्माते आणि मंदिरा बेदी हिचे पती राज कौशल यांचे 30 जून रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. मंदिरा बेदी ही एक अतिशय कणखर अभिनेत्री आहे. सध्या ती पतीच्या निधनाच्या धक्क्यातून स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत आहे. कारण, आता तिला आपल्या दोन्ही मुलांचीही काळजी घ्यावी लागत आहे.
रात्री उशिरा मंदिरा बेदी हिने टिश्यू पेपरचा फोटो शेअर केला होता, त्यावर ‘Miss you Raji…’ असे लिहिले होते. हा फोटो शेअर करतानाही मंदिराने कॅप्शन लिहिले ‘मिस यू राजी.’ यासह मंदिरानेही ब्रोकन हार्टचे इमोजी शेअर केले. मंदिराची ही पोस्ट खूप भावनिक आहे. हे पाहून कळते की, पतीच्या निधनाने दु:खी मंदिरा बेदी त्याला खूपच मिस करत आहे. मंदिरा बेदीच्या या पोस्टनंतर तिचा मित्र परिवार आणि तिचे चाहते तिला धीर देत आहेत.
पाहा मंदिरा बेदीची पोस्ट
View this post on Instagram
या पोस्टच्या अगोदरही मंदिराने तिचा नवरा राज कौशलसोबत घालवलेला अविस्मरणीय क्षण शेअर केला होता. त्या फोटोंमध्ये दोघेही खूप आनंदी दिसत होते.
मंदिराने दिली शेवटपर्यंत साथ
राजचा मृतदेह स्मशानभूमीत नेत असताना मंदिरासुद्धा त्याच रुग्णवाहिकेत होती. इतकेच नाही तर स्वत: मंदिरानेही राज यांचा मृतदेह उचलला होता. साधारणपणे हे सर्व कार्य पुरुष करतात, परंतु मंदिराने ही प्रथा मोडली.
राज गेल्यानंतर आता मंदिराला दोन्ही मुलांचा सांभाळ एकट्याने करावा लागणार आहे. राज आणि मंदिराचे 1999 साली लग्न झाले होते. दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांनी एका मुलीला गेल्या वर्षीच दत्तक घेतले होते. घरी मुलगी आल्यामुळे राज खूप खुश झाला होता. इतकेच नाही तर, ते सोशल मीडियावर मुलांबरोबर फोटोही शेअर करत असत.
नुकताच राज यांनी मुलांसमवेत फादर्स डे साजरा केला होता. मंदिरा बेदीचे पती राज कौशल एक भारतीय दिग्दर्शक, निर्माता होते. ‘प्यार मे कभी कभी’, ‘शादी का लड्डू’, ‘अँथनी कौन है’ अशा चित्रपटांचे दिग्दर्शन त्यांनी केले होते.
मंदिरा बेदीची कारकीर्द
49 वर्षीय मंदिरा बेदीने 1994 मध्ये शांती मालिकेतून मनोरंजन विश्वात पाऊल ठेवलं होतं. या मालिकेतील तिची व्यक्तिरेखा चांगलीच गाजली होती. त्यानंतर क्योंकि सास भी कभी बहू थी, जस्सी जैसी कोई नहीं यासारख्या मालिकांतही ती झळकली. दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे चित्रपटातून 1995 मध्ये बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर बादल, शादी का लड्डू, मीराबाई नॉट आऊट यासारख्या सिनेमांमध्ये ती झळकली.
(Mandira Bedi Share an emotional post on social media for late husband raj kaushal)
हेही वाचा :
Mandira Bedi | पतीच्या निधनामुळे कोसळला दुःखाचा डोंगर, मैत्रीण मौनी रॉयने घेतली मंदिराची भेट!
मंदिरा बेदी ते रेखा, ‘या’ बॉलिवूड सेलिब्रेटींनी कमी वयातच गमावले आपले जोडीदार