मान्या सिंह ‘बिग बॉस 16’मध्ये स्पर्धेक म्हणून जाण्याची शक्यता, वाचा अजून कोणत्या नावांची सुरू आहे चर्चा…
बिग बॉस 16 च्या घरात नेमके कोणते स्पर्धेक येणार यावर आता चर्चा रंगू लागलीये. चाहते देखील बिग बॉसच्या घरात सहभागी होणाऱ्या स्पर्धेकांची नावे जाणून घेण्यास इच्छुक आहेत.
मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून प्रेक्षक बिग बॉस 16 ची (Bigg Boss 16) आतुरतेने वाट पाहात आहेत. 1 ऑक्टोबरपासून मनोरंजनाचा (Entertainment) तडका लागणार आहे. बहुचर्चित बिग बॉस 16 चे सीजन आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. बिग बॉस या शोने अनेकांना स्वत: ची ओळख निर्माण करण्यासाठी एक संधी दिलीये. इतकेच नाही तर काहीजणांना बिग बॉस शो केल्यानंतर थेट चित्रपटांमध्ये (Movie) काम करण्याची संधी मिळालीये. याचे उत्तम उदाहरण म्हणजे शहनाज गिल ही असून शहनाजला खरी ओळख बिग बॉसच्या घरातूनच मिळालीये.
बिग बॉस 16 साठी या नावांची चर्चा सुरू
बिग बॉस 16 च्या घरात नेमके कोणते स्पर्धेक येणार यावर आता चर्चा रंगू लागलीये. चाहते देखील बिग बॉसच्या घरात सहभागी होणाऱ्या स्पर्धेकांची नावे जाणून घेण्यास इच्छुक आहेत. मिस इंडिया 2020 रनरअप मान्या सिंह बिग बॉस 16 च्या घरात येणार असल्याची जोरदार चर्चा रंगत आहेत. मात्र, अजून बिग बॉस निर्मात्यांनी किंवा मान्याने यासंदर्भात काही भाष्य केले नाहीये. मात्र रिपोर्टनुसार कळते आहे की, मान्या बिग बॉस 16 च्या घरात येण्यास इच्छुक असून तिची निर्मात्यांसोबत चर्चाही सुरू आहे. दिव्यांका त्रिपाठी, कनिका मान, करण पटेल, फैसल खान, जन्नत जुबेर आणि मुनावर फारुकी बिग बॉस 16 मध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.
या मोठ्या अभिनेत्रीचा पतीही बिग बॉस 16 च्या घरात दिसू शकतो
बिग बॉस 16 च्या सीजनमधील मजा, भांडणे आणि मारामारी बघण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. मध्यंतरी बातम्या होत्या की, शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्रा देखील बिग बॉस 16 च्या घरात येऊ इच्छित आहे. बिग बॉसच्या निर्मात्यांचे आणि राज कुंद्राचे बोलणे देखील सुरू असल्याचे कळते. कारण राज कुंद्राला असे वाटते की, बिग बॉसच्या घरातून तो जगाला काही खऱ्या गोष्टी सांगू शकतो. मात्र, अजून हे स्पष्ट झाले नाहीये की, खरोखरच राज कुंद्रा बिग बॉस 16 मध्ये येणार आहे की नाही.