उर्मिला कोठारेचं 12 वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक, ‘तुझेच मी गीत गात आहे’ मालिका लवकरच स्टार प्रवाहवर प्रेक्षकांच्या भेटीला

अभिनेत्री ऊर्मिला कोठारे तब्बल12 वर्षांनंतर तुझेच मी गीत गात आहे या मालिकेतून छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक करणार आहे. वैदेही असं तिच्या पात्राचं नाव असून ती स्वराच्या आईची भूमिका साकारणार आहे.

उर्मिला कोठारेचं 12 वर्षांनंतर छोट्या पडद्यावर कमबॅक, 'तुझेच मी गीत गात आहे' मालिका लवकरच स्टार प्रवाहवर प्रेक्षकांच्या भेटीला
तुझेच मी गीत गात आहे-स्टार प्रवाहImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Apr 07, 2022 | 8:10 AM

मुंबई : स्टार प्रवाहवरील (star pravah) जवळपास सर्वच मालिका लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. दर्जेदार संहिता, दमदार कलाकारांची फौज आणि तितकंच उत्तम दिग्दर्शन यामुळेच स्टार प्रवाहवरील मालिकांमधील प्रत्येक पात्र प्रेक्षकांच्या कुटुंबाचा महत्वाचा भाग बनली आहेत. स्टार प्रवाहच्या या परिवारात लवकरच आणखी एका नव्या मालिकेचं कुटुंब सामील होणार आहे. या नव्या मालिकेचं नाव आहे तुझेच मी गीत गात आहे (Tujhech me geet gat ahe). गाण्याचं स्वप्न उराशी बाळगलेल्या आणि अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत ते पूर्ण करण्यासाठी झटणाऱ्या चिमुकल्या स्वराची गोष्ट या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येईल.अभिनेत्री उर्मिला कोठारे (urmila Kothare) तब्बल12 वर्षांनंतर या मालिकेतून छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक करणार आहे. वैदेही असं तिच्या पात्राचं नाव असून ती स्वराच्या आईची भूमिका साकारणार आहे.

तुझेच मी गीत गात आहे या मालिकेतल्या भूमिकेविषयी सांगताना उर्मिला म्हणाली, “खूप वर्षांनंतर हा छान योग जुळून आला आहे. स्टार प्रवाहसोबत आणि अर्थातच स्टार प्रवाहचे कार्यक्रम प्रमुख सतीश राजवाडे यांच्यासोबत खूप जुनं नातं आहे. वैदेही हे पात्र साकारताना खूप धमाल येतेय. सेटवर खूप खेळीमेळीचं वातावरण असतं. याआधी प्रेक्षकांनी मला ग्लॅमरस रुपात पाहिलं आहे. मात्र या मालिकेतला माझा लूक आणि व्यक्तिरेखा खूपच वेगळी आणि आव्हानात्मक आहे. स्टार प्रवाहच्या सर्वच मालिका मी आवर्जून पहाते. नायिका म्हणून या प्रवाहात आता मी देखिल सामील होणार आहे त्यामुळे मी खूपच उत्सुक आहे.”

तुझेच मी गीत गात आहे या मालिकेतून उर्मिला पुन्हा एकदा छोद्या पडद्यावर पाहायला मिळणारा आहे. ही नवी मालिका 2 मे पासून रात्री 9 वाजता स्टार प्रवाहवर पाहायला मिळणार आहे.

संबंधित बातम्या

Hrithik Saba: हृतिक रोशनची गर्लफ्रेंड सबा आझादविषयी या 10 गोष्टी माहित आहेत का?

Ranbir Alia Wedding: रणबीर-आलियाच्या लग्नावरील हे भन्नाट मीम्स एकदा पहाच; पोट धरून हसाल!

उदय सामंत यांच्या हस्ते ‘श्यामची आई’ सिनेमाच्या शूटिंगचा श्रीगणेशा, पावसमध्ये शुटिंगला सुरूवात

पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.