Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mazhi Tuzhi Reshimgaath |  श्रेयस-प्रार्थना-मायारासोबतच ‘शेफाली’ही प्रेक्षकांच्या पसंतीस, या हटके भूमिकेबद्दल सांगताना काजल काटे म्हणते…

सध्या झी मराठीवरील 'माझी तुझी रेशीमगाठ' (Mazhi Tuzhi Reshimgaath) ही मालिका खूप गाजते आहे. त्यामधील श्रेयस आणि प्रार्थनाची जोडी आणि छोटी परी हिची चर्चा घराघरात होतेय. मालिकेत अनेक दिग्गज कलाकारांची फौज आहे. मालिकेत अजून एक व्यक्तिरेखा लक्ष वेधून घेतेय ती म्हणजे ‘शेफाली’.

Mazhi Tuzhi Reshimgaath |  श्रेयस-प्रार्थना-मायारासोबतच ‘शेफाली’ही प्रेक्षकांच्या पसंतीस, या हटके भूमिकेबद्दल सांगताना काजल काटे म्हणते...
Kajal Kate
Follow us
| Updated on: Sep 22, 2021 | 1:25 PM

मुंबई : सध्या झी मराठीवरील ‘माझी तुझी रेशीमगाठ’ (Mazhi Tuzhi Reshimgaath) ही मालिका खूप गाजते आहे. त्यामधील श्रेयस आणि प्रार्थनाची जोडी आणि छोटी परी हिची चर्चा घराघरात होतेय. मालिकेत अनेक दिग्गज कलाकारांची फौज आहे. मालिकेत अजून एक व्यक्तिरेखा लक्ष वेधून घेतेय ती म्हणजे ‘शेफाली’. नेहाची कलीग आणि जवळची मैत्रीण शेफाली हिची भूमिका अभिनेत्री काजल काटे (Kajal Kate) अगदी चोख बजावतेय.

आपल्या व्यक्तिरेखेबद्दल बोलताना काजल म्हणाली, ‘शेफाली ही माझ्यासारखीच आहे. आनंदी, सगळ्यांना हसवत असणारी काहीशी अल्लड अशी मी सुद्धा आहे. त्यामुळे शेफाली माझ्या फार जवळची आहे आणि ती साकारताना मला खूप मजा येते. शेफाली म्हंटल की माझ्या डोळ्यासमोर आले ते कभी ख़ुशी कभी गम चित्रपटातील काजोल आणि जब वी मेट मधली करीना कपूर. या दोघींचं मिश्रण म्हणजे शेफाली. शेफाली हे खूप एनर्जेटिक कॅरेक्टर आहे. त्यामुळे सेटवरही मला सतत एनर्जेटिक राहावं लागतं.’

शेफाली माझ्यासाठी टर्निंग पॉईंट!

प्रेक्षकांकडून शेफालीला मिळणाऱ्या प्रतिसादाबद्दल बोलताना काजल म्हणाली, ‘शेफाली माझ्यासाठी टर्निंग पॉईंट ठरली आहे. शेफालीने माझं आयुष्य बदलून टाकलंय. मला आज लोकं ओळखायला लागली आहेत. आता मी सुद्धा काहीसा शेफालीप्रमाणे विचार करायला लागले आहे. त्यामुळे मीच स्वतः शेफालीच्या प्रेमात आहे. तिच्यावर प्रेक्षक ही खूप प्रेम करतात. मला मेसेजेस, फोनद्वारे लोकं आवर्जून प्रतिक्रिया कळवतात. शेफाली सारखी आमच्या आयुष्यात एक तरी मैत्रीण असावी, अशी प्रतिक्रिया जेव्हा मला मिळाली तेव्हा मला खूप आनंद झाला.’

चिमुकली ‘मायरा’ वेधून घेतेय प्रेक्षकांचं लक्ष!

श्रेयस आणि प्रार्थना सोबतच प्रोमोमध्ये झळकणारी चिमुकली मायरा प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत आहे. मालिका सुरु होण्याआधीच मायरा प्रेक्षकांची लाडकी बनली आहे. खऱ्या आयुष्यात श्रेयसची मुलगी आद्या देखील मायरच्या वयाचीच आहे. मायरा बद्दल बोलताना श्रेयस म्हणाला, “मी मायरा सोबत खूप रिलेट करू शकतो. शूट शेड्युलनंतर देखील मायरा आम्हाला सेटवर बिझी ठेवते. ती सेटवर असताना वेळ कसा निघून जातो कळतच नाही. मी एक पिता असल्यामुळे, मला कळतं की, मायराला केव्हा अराम करायचा आहे, तिला केव्हा भूक लागते. मी आद्याला मायराबद्दल सांगितलं आहे आणि तिला प्रॉमिस केलं आहे की, मी तिला एक दिवस तरी सेटवर मायराला भेटायला घेऊन जाणार आहे.”

प्रार्थनाचं पुनरागमन

सुशांत सिंह राजपूतसोबत ‘पवित्र रिश्ता’ या मालिकेत झळकलेल्या प्रार्थनाने मराठी मालिका आणि चित्रपटांमधून काम केले आहे. बऱ्याच वर्षांच्या गॅपनंतर प्रार्थना पुन्हा छोट्या पडद्यावर पुनरागमन करतेय. आगामी ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेच्या निमित्ताने अभिनेत्री प्रार्थना बेहेरे हिने ही खास पोस्ट लिहिली आहे. ‘10 वर्षांनी टिव्ही वर पुनरागमन करते आहे… तुमच्या घरातली, अगदी तुमच्यातली एक होण्यासाठी… तुमचे प्रेम आणि आशीर्वाद असेच पाठीशी राहोत, हीच सदिच्छा…!! तुमचीच प्रार्थना बेहेरे !!!…“माझी तुझी रेशीमगाठ ”, असं तिने या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

हेही वाचा :

Sonu Sood | ‘दोन पक्षांनी देऊ केलेल्या राज्यसभा सीट मी नाकारल्या…’, आयकर विभागाच्या छाप्यानंतर सोनू सूदचा दावा

सिद्धार्थ मल्होत्रा ​​कियारा अडवाणीशी लग्न करणार? पाहा अभिनेत्याची योजना काय…

राऊतांना शिवसेनेच्या खासदारानं डिवचलं; ट्वीट करत म्हणाले, सांगा बरं...
राऊतांना शिवसेनेच्या खासदारानं डिवचलं; ट्वीट करत म्हणाले, सांगा बरं....
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीकडून राहुल अन् सोनिया गांधीविरोधात चार्जशीट
नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी ईडीकडून राहुल अन् सोनिया गांधीविरोधात चार्जशीट.
'या' महिलांना 800चा हफ्ता येणार, लाडक्या बहिणीनो तुम्ही तर नाहीना यात?
'या' महिलांना 800चा हफ्ता येणार, लाडक्या बहिणीनो तुम्ही तर नाहीना यात?.
संभाजी भिडेंना चावलेला कुत्रा दत्तक घेणार, कोणी केली मोठी घोषणा?
संभाजी भिडेंना चावलेला कुत्रा दत्तक घेणार, कोणी केली मोठी घोषणा?.
लाडक्या बहिणींनो... आता 1500 नाही 500 रुपये, रोहिणी खडसे म्हणाल्या...
लाडक्या बहिणींनो... आता 1500 नाही 500 रुपये, रोहिणी खडसे म्हणाल्या....
अयोध्येचं राम मंदिर बॉम्बने उडवणार? थेट धमकीचा मेल, काय म्हटलंय त्यात?
अयोध्येचं राम मंदिर बॉम्बने उडवणार? थेट धमकीचा मेल, काय म्हटलंय त्यात?.
भिडेंना कुत्र्याचा चावा; वडेट्टीवार म्हणाले, त्याला दुर्बुद्धी सुचली
भिडेंना कुत्र्याचा चावा; वडेट्टीवार म्हणाले, त्याला दुर्बुद्धी सुचली.
ठाकरे गटाचा हंडा मोर्चा; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड
ठाकरे गटाचा हंडा मोर्चा; पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड.
बीडमध्ये हत्येचं सत्र थांबेना! भाजप लोकसभा विस्तारकाची निर्घृण हत्या
बीडमध्ये हत्येचं सत्र थांबेना! भाजप लोकसभा विस्तारकाची निर्घृण हत्या.
'आता सगळं ओक्के...', दानवेंवर काल खैरे भडकले आज गळाभेट घेणार?
'आता सगळं ओक्के...', दानवेंवर काल खैरे भडकले आज गळाभेट घेणार?.