MC Stan | बिग बाॅस 16 चा विजेता झाल्यानंतर एमसी स्टॅन याने घेतला अत्यंत मोठा निर्णय, थेट करणार…

एमसी स्टॅन याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग आहे. त्यामध्येही बिग बाॅस 16 चा विजेता झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे सोशल मीडियावर दिसत आहे.

MC Stan | बिग बाॅस 16 चा विजेता झाल्यानंतर एमसी स्टॅन याने घेतला अत्यंत मोठा निर्णय, थेट करणार...
Follow us
| Updated on: Feb 17, 2023 | 2:57 PM

मुंबई : बिग बाॅस 16 चा विजेता एमसी स्टॅन (MC Stan) हा झाला आहे. बिग बाॅसच्या घरात तब्बल साडेचार महिने राहून आपला एक वेगळा अंदाज एमसी स्टॅन याने दाखवला. घरामध्ये म्हणावे तेवढे जास्त भांडणे देखील एमसी स्टॅन याने केले नाहीत. अनेकदा टास्क खेळताना देखील एमसी स्टॅन दिसला नाही. मात्र, आपली एक जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग घेऊन एमसी स्टॅन हा बिग बाॅसच्या घरात दाखल झाला होता. एमसी स्टॅन याचा एक वेगळा स्वभाव प्रेक्षकांना आवडला. कारण बिग बाॅसच्या घरात असे अनेक सदस्य सदभागी झाले होते, जे कारण नसताना देखील भांडणे करताना दिसले. बिग बाॅसच्या घरातून बाहेर पडल्यानंतरही एमसी स्टॅन याच्या फॅन फाॅलोइंगमध्ये जबरदस्त वाढ होताना दिसत आहे. एमसी स्टॅन बिग बाॅस 16 (Bigg Boss 16) चा विजेता झाल्यानंतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली. इतकेच नाही तर बिग बाॅसच्या निर्मात्यांवर अनेक आरोपही केले. अनेकांना वाटत होते की, प्रियंका चाैधरी किंवा शिव ठाकरे यांच्यापैकी एकजण बिग बाॅस 16 चा विजेता होईल. मात्र, तीन नंबरला प्रियंका चाैधरी ही बिग बाॅस 16 मधून बाहेर पडली आणि एमसी स्टॅन हा विजेता झाला. एमसी स्टॅन विजेता झाल्यानंतर शिव ठाकरे याने एमसी स्टॅन याला चक्क स्टेजवर असताना उचलून घेत डान्स केला.

एमसी स्टॅन याची जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग आहे. त्यामध्येही बिग बाॅस 16 चा विजेता झाल्यानंतर त्याच्या चाहत्यांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे सोशल मीडियावर दिसत आहे. बिग बाॅसच्या घरात असताना टीना दत्ता शालिन भनोट याला म्हणाली होती की, आपण एमसी स्टॅन याच्यासोबत चांगले राहू कारण त्यांची फॅन फाॅलोइंग चांगली आहे.

बिग बाॅसच्या घरात असताना जेंव्हा घरातील सदस्यांना कळाले की, एमसी स्टॅन याची फॅन फाॅलोइंग जबरदस्त आहे, तेंव्हा अनेकजण एमसी स्टॅन याच्यासोबत चांगले रिलेशन तयार करण्याचा प्रयत्न करत होते. शिव ठाकरे, एमसी स्टॅन, साजिद खान, अब्दु रोजिक, निम्रत काैर आणि सुंबुल ताैकीर यांची मैत्री प्रेक्षकांना प्रचंड आवडलीये.

View this post on Instagram

A post shared by MC STΔN ? (@m___c___stan)

बिग बाॅस 16 चा विजेता झाल्यानंतर आता एमसी स्टॅन याने मोठी घोषणा केलीये. एमसी स्टॅन याने त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवरून पोस्ट शेअर करून याबाबत माहिती दिली आहे. एमसी स्टॅन हा टूर त्याच्या फेमस रॅप गाणे ‘बस्ती का हस्ती’साठी करणार आहे.

आपल्या चाहत्यांना माहिती देताना एमसी स्टॅन याने लिहिले की, ‘बस्ती का हस्ती इंडिया टूर… शेवटी!! परत रस्त्यावर…सर्वांनी दिलेल्या प्रेमाबद्दल खूप खूप धन्यवाद, लवकरच भेटू…आता एमसी स्टॅन याची ही पोस्ट व्हायरल होताना दिसत आहे.

एमसी स्टॅन याचा मार्चपासून भारत टूर सुरू होणार आहे. 3 मार्च रोजी पुण्यातून त्यांचा प्रवास सुरू होईल. त्यानंतर 5 मार्चला मुंबई, 10 मार्चला हैदराबाद, 11 मार्चला बेंगळुरू, 17 मार्चला इंदूर, 18 मार्चला नागपूर, 28 एप्रिलला अहमदाबाद, 29 एप्रिलला जयपूर, 6 मे ला कोलकाता आणि 7 तारखेला दिल्लीत शो होणार आहे. बुक माय शोवर एमसी स्टॅन याच्या शोची तिकिटे बुक करता येणार आहेत.

दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह
मुंबईकरांची चिंता वाढली; HMPV चा शिरकाव, 6 महिन्याचं बाळ पॉझिटीव्ह.
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट
सव्वालाख मुंबईकरांना गंडा, मालक पसार, टोरेस फसवणूक प्रकरणात मोठी अपडेट.
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले
महायुतीतील मनसेची युती कशी फिस्कटली? कारण देत राज ठाकरे स्पष्ट म्हणाले.
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?
धनंजय मुंडे यांच्यावरील आरोपांवर अजित पवार कधी मौन सोडणार?.
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?
सुरेश धस यांनी अजितदादांकडे धनंजय मुंडेंचे नेमके कोणते पुरावे दिले?.
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?
वाल्मिक कराडमागे ईडीचाही फेरा? संपत्तीवरून सुरेश धसांचे आरोप काय?.
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.