Bigg Boss 14 | बिग बॉस 14 मध्ये नवा ट्विस्ट ‘ही’ राजकिय व्यक्ती करणार बिग बॉसच्या घरात प्रवेश!

बिग बॉसच्या घरात गेल्या काही दिवसांपासून वाइल्ड कार्ड कंटेस्टेंट्सची एंट्री मोठा प्रमाणात होत आहे.

Bigg Boss 14 | बिग बॉस 14 मध्ये नवा ट्विस्ट 'ही' राजकिय व्यक्ती करणार बिग बॉसच्या घरात प्रवेश!
Follow us
| Updated on: Dec 20, 2020 | 5:12 PM

मुंबई : बिग बॉसच्या घरात गेल्या काही दिवसांपासून वाइल्ड कार्ड कंटेस्टेंट्सची एंट्री मोठा प्रमाणात होत आहे. वाइल्ड कार्ड एंट्री करून एखादा सदस्य ज्यावेळी घरात येतो. तेव्हा बिग बॉसच्या घरात मोठा हंगामा बघायला मिळतो. वाइल्ड कार्ड कंटेस्टेंट् म्हणून हरियाणाची बीजेपी नेता आणि टिकटॉक स्टार सोनाली फोगाट येणार असल्याचे बिग बॉसचे शोचे अपडेट्स देणाऱ्या द खबरीमध्ये म्हटले आहे. (new twist in Bigg Boss 14 will be entered by a politician)

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

सोनाली फोगाटसोबतच इतरही काहीजण वाइल्ड कार्डने बिग बॉसच्या घरात प्रवेश करणार असल्याचे समजत आहे. म्हणजेत अजूनही बिग बॉसच्या घरात वेगवेगळे ट्विस्ट बघायला मिळणार आहेत. मध्यंतरी सोनाली फोगाट एका व्हिडिओमुळे बरीच चर्चेत आली होती.

बिग बॉसचा नुकताच एक प्रोमो समोर आला आहे. त्यामध्ये बिग बॉसचा घरातील मुलांना शिक्षा देण्यात येत आहे. घरातील मुली मुलांचे वॅक्स करताना दिसत आहेत. राहुल महाजन, अली गोनी, एजाज खान यांचे तर बेहाल होताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत. सलमान खान त्यावेळी मुलांना प्रश्न विचारताना दिसत आहे.

विकास गुप्ता आणि अर्ची खानमध्ये भांडणे झाली होती. यावेळी अर्शी खानने विकास गुप्ता यांच्या आईवर भाष्य केले होते, त्यानंतर विकासने तिला पाण्यात ढकलले होते. अर्शीला पाण्यात ढकल्यामुळे विकास गुप्ताला बिग बॉसच्या घरातून बेघर देखील व्हावे लागले आहे.

मात्र, त्यानंतर  सलमान खान अर्शीची क्लास घेतला,  तु विकास गुप्ताच्या आईबद्दल बोललीस आणि कोणी माझ्या आईबद्दल असे बोलले असते तर कदाचित मी सुध्दा तेच केले असते जे विकास गुप्ताने केले. त्याचबरोबर सलमान घरातील इतर सदस्यांना विचारतो की, जर अर्शी तुमच्या आईबद्दल अशी बोलली असती तर तुम्ही काय केले असते. त्यावर राखी सावंत म्हणते की, माझ्या आईबद्दल बोलले असते तर तिचा गळा मी दाबला असता, रूबीना म्हणते की, मी तिच्या कानाखाली जाळ काढल्या असता आणि स्वत: बिग बॉसच्या घराबाहेर गेले असते.

यासर्व प्रकरणावर अर्शी म्हणते की, मी विकास गुप्ताच्या आईबद्दल काहीही वाईट बोलले नाही. आणि ती मोठमोठ्याने ओरडत असते त्यावेळी तिला सलमान खान रागवतो देखील अर्शी म्हणते की, आता मला बिग बॉसच्या घरात राहायचे नाही असे म्हणत ती उठून जाते. यावेळी सलमान म्हणतो की, कोणाच्याही आई-वडीलांबद्दल चुकीचे बोलण्याचा अधिकार कोणालाही नाही.

संबंधित बातम्या : 

Bigg Boss 14 | ‘इम्युनिटी स्टोन’साठी ‘बिग बॉस’च्या स्पर्धकांचे आयुष्य चव्हाट्यावर, नव्या रहस्यांनी प्रेक्षक स्तब्ध!

Bigg Boss 14 | रुबीना-अभिनव नोव्हेंबरमध्ये घटस्फोट घेणार? ‘बिग बॉस’च्या घरात खळबळजनक दावा!

(new twist in Bigg Boss 14 will be entered by a politician)

'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.