Aai Kuthe Kay Karte | समीर धर्माधिकारी नाही, तर ‘सावित्रीज्योती’ फेम ‘हा’ अभिनेता साकारणार अरुंधतीच्या मित्राची भूमिका!
छोट्या पडद्यावरची ‘आई कुठे काय करते’ ही मालिका प्रचंड गाजते आहे. मालिकेचं भावनिक कथानक आणि एका आईची गगनभरारी असा आशय घेऊन पुढे चाललेली ही मालिका प्रेक्षकांना देखील प्रचंड भावते आहे. मात्र, आता मालिकेत लवकरच एक नवं वळण येणार आहे.
मुंबई : छोट्या पडद्यावरची ‘आई कुठे काय करते’ ही मालिका प्रचंड गाजते आहे. मालिकेचं भावनिक कथानक आणि एका आईची गगनभरारी असा आशय घेऊन पुढे चाललेली ही मालिका प्रेक्षकांना देखील प्रचंड भावते आहे. मात्र, आता मालिकेत लवकरच एक नवं वळण येणार आहे. घटस्फोट झाल्यानंतर आता आई अर्थात ‘अरुंधती’च्या आयुष्यात एका नव्या व्यक्तीची एन्ट्री होणार आहे.
अभिनेता ओंकार गोवर्धन याची या मालिकेत एन्ट्री होणार आहे. ओंकार या मालिकेत अरुंधतीचा मित्र म्हणून दिसणार आहे. अरुंधतीच्या महाविद्यालयीन जीवनातील हा मित्र पुन्हा एकदा तिच्या आयुष्यात एन्ट्री करणार आहे. यासोबतच मालिकेत एक नवा ट्वीस्ट पाहायला मिळणार आहे. या मित्राच्या येण्याने आता अरुंधतीच्या आयुष्यात काय काय बदल होणार की, देशमुखांच्या घरात नवा हंगामा होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे. सुरुवातीला ही भूमिका अभिनेते समीर धर्माधिकारी साकारणार अशी चर्चा रंगली होती. माध्यमांच्या अहवालानुसार यावर शिक्कामोर्तब देखील झाला होता. मात्र, आता त्यांच्या जागी ‘सावित्रीज्योती’ फेम अभिनेता ओंकार गोवर्धन दिसणार असल्याचे जाहीर झाले आहे.
View this post on Instagram
अविनाशमुळे अरुंधती अडकणार?
अनिरुद्धचा लहान भाऊ अविनाश सध्या एका मोठ्या अडचणीत अडकला होता. त्याच्यावर काही लाखांचं कर्ज झाल्याने तो काकुळतीला आला होता. त्याला मदत म्हणून अरुंधतीने त्याला काही पैसे देऊ केले. अर्तःत ही मिठी रक्कम असल्याने अरुंधतीने एव्हढे पैसे नक्की कुठून आणले, असा प्रश्न त्यालाही पडला होता. मात्र, प्रत्येकवेळी अरुंधतीने उत्तर देणे टाळले.
अरुंधतीच्या या व्यवहारात यशने पुढकार घेतल्याने त्याला या सगळ्याची कल्पना होती. हीच कल्पना तो गौरीला देत असताना संजनाच्या कानी पडते. यावरून संतापलेली संजना देशमुखांच्या घरात येऊन पुन्हा एकदा मोठा हंगामा करते. यावरून पुन्हा एकदा देशमुखांच्या घरात वादंग माजणार आहेत.
खरंतर अरुंधतीने अप्पांनी तिच्या नवे केलेला घराचा अर्धा हिस्सा तारण म्हणून ठेवून जवळपास 25 लाख रुपयांचे कर्ज घेऊन ते अविनाशला देऊ केले होते. ही गोष्ट घरातील लोकांना कळताच सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसला आहे. तर, याबदल्यात आता संजनाने देखील उर्वरित घर विक म्हणून अनिरुद्धच्या मागे तगादा लावला आहे.
यश पुन्हा परतणार!
‘आई कुठे काय करते’ या मालिकेत सध्या यश हे पात्र सकारात असलेला अभिनेता अभिषेक देशमुख या मालिकेतून काही काळ ब्रेक घेत असल्याचे वृत्त सध्या खूप चर्चेत आले होते. मालिकेच्या कथानकानुसार यशला एका फिल्म फेस्टिव्हलसाठी परदेशी जाण्याची संधी मिळाली असल्याचे दाखवले गेले आहे. यावरून अभिनेता सध्या मालिकेत दिसणार नसल्याचे स्पष्ट झाले होते. खऱ्या आयुष्यातही अभिनेता असाच कुठेतरी बाहेर गेल्याचे कळत होते. मात्र, आता तो पुन्हा कामावर परतला आहे. 1 नोव्हेंबर पासून तो पुन्हा शुटींगला सुरुवात करणार आहे.
हेही वाचा :
‘माझ्या मुलीने दोन वर्षात खूप काही कमावलं…’, आलिया भट्टच्या यशाने आनंदी झालेयत महेश भट्ट!