‘तारक मेहता का उल्टा चष्मा’च्या निर्मात्यावर भिडेच्या लेकीचा गंभीर आरोप
तारक मेहता का उल्टा चष्मा या शोमधील आतापर्यंत अनेक अभिनेत्रींना शोच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप केले आहेत. आता आणखी एका अभिनेत्रीने आरोप केला आहे. ज्यामुळे शो पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. याआधी अभिनेत्रीला कायदेशीर नोटीस पाठवल्याची देखील माहिती समोर आली होती. त्यावर देखील अभिनेत्रीवर स्पष्टीकरण दिले आहे.
‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय टीव्ही शोमध्ये ‘सोनू भिडे’ची भूमिका साकारणारी अभिनेत्री पलक सिंधवानी हिने शोच्या निर्मात्यांवर गभीर आरोप केले आहेत. त्यामुळे ती सध्या चर्चेत आहे. कराराचे उल्लंघन केल्यामुळे, प्रॉडक्शन हाऊसने अभिनेत्रीला कायदेशीर नोटीस पाठवल्याची बातमी काही दिवसांपूर्वी आली होती. पलक आणि शोचे निर्माते असित मोदी यांनी या वृत्तांचे खंडन केले असले तरी, आता ‘नीला फिल्म प्रॉडक्शन’ने अधिकृत निवेदनात या अभिनेत्रीला कायदेशीर नोटीस पाठवल्याची पुष्टी केली आहे. पलकने यानंतर शोच्या निर्मात्यांवकर गंभीर आरोप केले आहेत.
पलकने मीडियाला दिलेल्या निवेदनात कराराचा भंग केल्याच्या सर्व आरोपांचे खंडन केले. ती म्हणाली की, हे आरोप खोटे आहेत. प्रॉडक्शन हाऊसने तिला त्रास देण्यासाठी आणि बदनाम करण्यासाठी ही ‘खोटी कथा’ रचली आहे. तिने असेही सांगितले की ‘TMKOC’ वरील तिच्या 5 वर्षांच्या कार्यकाळात, तिने शो सोडण्याची इच्छा व्यक्त करेपर्यंत तिला कोणत्याही ब्रँडचे समर्थन करण्यापासून रोखले नाही.
सेटवर पलकशी झालेल्या गैरवर्तनाबद्दलही तिने माहिती दिली आहे. निवेदनात असे लिहिले आहे की, “या मालिकेच्या सेटवर पलकला सतत अमानुष वागणूक दिली जात आहे आणि प्रॉडक्शन हाऊस आणि त्याच्या टीमकडून तिचा सर्व प्रकारे छळ केला जात आहे, ज्यामुळे तिला मानसिक आघातासह अनेक आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागले आहे.” . तिने प्रकृतीचा विचार करून विश्रांतीसाठी वैद्यकीय रजेची विनंती केली होती, पण कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांनी (शोच्या निर्मात्यांनी) ती नाकारली आणि त्याच्या विनंतीकडे दुर्लक्ष केले.
पलकने दावा केला आहे की तिने 8 ऑगस्ट 2024 रोजी शो सोडण्याच्या तिच्या इराद्याबद्दल ‘TMKOC’ च्या प्रोडक्शन हाऊसला कळवले होते. जेव्हा तिने 7 सप्टेंबर 2024 रोजी एका वरिष्ठ निर्मात्याशी शो सोडण्याच्या औपचारिकतेबद्दल चर्चा करण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तिला ‘भावनिक छळ/ब्लॅकमेल’ करण्यात आले. पलकच्या निवेदनात म्हटले आहे की, जेव्हा तिने तिचा करार संपुष्टात आणण्याचा प्रयत्न केला तेव्हा प्रॉडक्शन हाऊसने सोशल मीडियावर तिच्याबद्दल “खोट्या आणि अपमानास्पद वक्तव्य केले. मानसिक तणावामुळे तिला काम करणे आव्हानात्मक झाले होते.
निवेदनात म्हटले आहे की, “प्रॉडक्शन हाऊसने तिच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केले. तिला काम करण्यास भाग पाडले. ज्यामुळे 14 सप्टेंबर 2024 रोजीच पलकला सेटवर पॅनीक ॲटॅक आला. पण तरी तिच्या तब्येतीकडे लक्षही दिले नाही.”
View this post on Instagram
पलक सिंधवानी हिच्या आधी जेनिफर मिस्त्री, प्रिया आहुजा, मोनिका भदौरिया, शैलेश लोढा आणि नेहा मेहता यांसारख्या कलाकारांनी ‘TMKOC’ च्या सेटवर त्यांच्यासोबत गैरवर्तन केल्याचे सांगितले आहे.