Nava Gadi Nava Rajya: ‘नवा गडी नवं राज्य’मध्ये पल्लवी पाटील-अनिता दातेचा आमनासामना; प्रेक्षकांमध्ये मालिकेबद्दल उत्सुकता

पल्लवी पाटील हिच्या करिअरची सुरुवात चित्रपटांपासून झाली. तिने वेगवेगळ्या भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. अभिनेत्री पल्लवी पाटील आता 'नवा गडी नवं राज्य' या मालिकेत आनंदी या व्यक्तिरेखेतून पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Nava Gadi Nava Rajya: 'नवा गडी नवं राज्य'मध्ये पल्लवी पाटील-अनिता दातेचा आमनासामना; प्रेक्षकांमध्ये मालिकेबद्दल उत्सुकता
Nava Gadi Nava Rajya: 'नवा गडी नवं राज्य'मध्ये पल्लवी पाटील-अनिता दातेचा आमनासामनाImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Aug 03, 2022 | 11:05 AM

झी मराठी वाहिनीवर ‘नवा गडी नवं राज्य’ (Nava Gadi Nava Rajya) ही मालिका येत्या 8 ऑगस्टपासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या मालिकेचे प्रोमो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून ‘माझ्या नवऱ्याची बायको’मधील राधिका म्हणजेच अभिनेत्री अनिता दाते (Anita Date) यातून कमबॅक करतेय. अनितासोबतच अभिनेत्री पल्लवी पाटीलचीही (Pallavi Patil) मालिकेत मुख्य भूमिका आहे. पल्लवी पाटील हिच्या करिअरची सुरुवात चित्रपटांपासून झाली. तिने वेगवेगळ्या भूमिका साकारून प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं आहे. अभिनेत्री पल्लवी पाटील आता ‘नवा गडी नवं राज्य’ या मालिकेत आनंदी या व्यक्तिरेखेतून पहिल्यांदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

मालिकेच्या प्रोमोमध्ये सगळ्यांनी आनंदीला पाहिलं आणि या भूमिकेतून देखील प्रेक्षकांच्या मनात उत्सुकता निर्माण झाली आहे. आनंदीची भूमिका एक नव्या धाटणीची आहे. त्याबद्दल बोलताना पल्लवी म्हणाली, “मी साकारत असलेल्या आनंदीचं पात्र गावातून आलेली स्वच्छंद स्वभावाची मुलगी आहे. तिच्या आजूबाजूच्या लोकांना ती आवडते आणि आनंद पसरवणारी आनंदी आहे. तिच्या नवऱ्याचा अर्धवट राहिलेला संसार ती कशा पद्धतीने पूर्ण करेल आणि हे करत असताना रमा कशी तिला डिवचणार आहे हे मालिकेत पहायला मिळेल. त्या दोघींचा मजेशीर आमना सामना पाहताना प्रेक्षकांचं खूप मनोरंजन होणार आहे. ही प्रेक्षकांसाठी नवी पर्वणी असेल.”

हे सुद्धा वाचा

पहा मालिकेचा प्रोमो-

रमा आणि आनंदीच्या जुगलबंदीत आनंदी ही एक आई, एक सून, एक पत्नी अशी नाती निभावून रमाची जागा भरून काढण्याचा प्रयत्न करणार आहे आणि हे बघणं प्रेक्षकांना नक्की आवडेल, असा विश्वास पल्लवीने व्यक्त केला आहे. या मालिकेत अनिता दाते रमाची भूमिका सादर करणार असून, आनंदीच्या भूमिकेत अभिनेत्री पल्लवी पाटील दिसणार आहे. पल्लवी पाटील या मालिकेतून टीव्ही माध्यमात पदार्पण करतेय. तर रमाच्या मुलीच्या भूमिकेत सायशा भोईर दिसणार आहे. अभिनेता कश्यप परुळेकर देखील या मालिकेत मध्यवर्ती भूमिकेत दिसेल.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.