गप्पांच्या ओघात शाहीर शेखने जाहीर केली अंकिता लोखंडेची ‘ती’ खाजगी गोष्ट, ऐकून चाहतेही झाले उत्सुक!

अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) बऱ्याच दिवसांपासून विकी जैनला (Vicky Jain) डेट करत आहे. ती विकीसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत राहते. चाहत्यांना या दोघांची जोडी आवडते आणि दोघांनीही लवकरच लग्न करावे, अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे.

गप्पांच्या ओघात शाहीर शेखने जाहीर केली अंकिता लोखंडेची ‘ती’ खाजगी गोष्ट, ऐकून चाहतेही झाले उत्सुक!
Vhicky, Ankita, Shaheer
Follow us
| Updated on: Sep 10, 2021 | 11:22 AM

मुंबई : अभिनेत्री अंकिता लोखंडे (Ankita Lokhande) बऱ्याच दिवसांपासून विकी जैनला (Vicky Jain) डेट करत आहे. ती विकीसोबतचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर शेअर करत राहते. चाहत्यांना या दोघांची जोडी आवडते आणि दोघांनीही लवकरच लग्न करावे, अशी त्यांच्या चाहत्यांची इच्छा आहे. दरम्यान, अलीकडेच अंकिताचा सहकलाकार शाहीर शेखने (Shaheer Sheikh) अंकिताच्या लग्नाबद्दल अशी कमेंट केली की ऐकून चाहतेही खूश होतील.

वास्तविक, शाहीर आणि अंकिता त्यांच्या आगामी शो ‘पवित्र रिश्ता 2’चे प्रमोशन करत आहेत. तर, अलीकडेच बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीत शाहीरने अंकिताच्या लग्नाबद्दल एक कमेंट केली होती. त्यानंतर अभिनेत्रीने त्याला सर्वांसमोर शट अप म्हटले. असे काहीतरी घडले की, पवित्र रिश्ता 2 नंतर अंकिताला तिच्या पुढील योजनांबद्दल विचारण्यात आले. अंकिता म्हणते की, सध्या तिच्याकडे या शो नंतर काहीच काम हातात नाहीय. नेमकं तेव्हाच शाहीर मधेच म्हणाला की, राहू दे यार, तू लग्न करत आहेस.

अंकिताने शाहीरला केले गप्प

हे ऐकून अंकिता हैराण झाली आणि म्हणाली, ‘तू वेडा आहेस का? गप्प बस… नाही नाही असे काही नाही.’ यानंतर, शाहीर आपला मुद्दा स्पष्ट करताना म्हणतो की, ‘अरे मला काही माहित नाही… मी जे सांगितले ते विसरून जा.’

यानंतर अंकिता म्हणते की, ‘मी सध्या काहीच करत नाहीय. होय, पण फेब्रुवारीपासून मी काहीतरी नवीन सुरू करू शकते.’ अंकिता आणि विकी 3 वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत आणि लवकरच ते लग्न बंधनात अडकणार आहेत.

लग्नासाठी उत्सुक अभिनेत्री

यावर्षी, एका मुलाखतीदरम्यान अंकिताने सांगितले होते की, ती लग्नाची योजनाही आखत आहे. अंकिता म्हणाली होती, ‘लग्न ही खूप सुंदर गोष्ट आहे. होय, मी माझ्या लग्नाबद्दल खूप उत्साहित आहे आणि मला जयपूर-जोधपूर अशा ठिकाणी राजस्थानी पद्धतीने लग्न करायला आवडेल. पण मी अजून काय करायचं हे ठरवलं नाही.’

विकीसाठी लिहिलेली खास पोस्ट

सुशांतच्या मृत्यूनंतर अभिनेत्याच्या चाहत्यांनी विक्कीला खूप ट्रोल केले आणि त्यालाही बऱ्याच नकारात्मक टिप्पण्यांना सामोरे जावे लागले. जरी विकीने त्यावेळी अंकिताला पाठिंबा दिला होता, त्यानंतर अभिनेत्रीने त्याच्यासाठी एक खास पोस्ट शेअर केली.

अंकिताने लिहिले होते, ‘तू मला दिलेल्या सर्व समर्थनासाठी विकी तुला सलाम. मी तुला वचन देते की, मी तुला सर्व आनंद देईन, ज्यासाठी तू पात्र आहेस. तुमच्या जोडीदाराने तुमच्यासाठी जे, केले त्याबद्दल कौतुक आवश्यक आहे. प्रत्येक जण तुझ्यासारखी परिस्थिती हाताळू शकत नाही. सगळ्यासाठी धन्यवाद.’

हेही वाचा :

Akshay Kumar | काम एके काम, आईच्या निधनानंतर दुःखातून सावरत शूटिंगवर परतला अक्षय कुमार!

Chikoo Ki Mummy Durr Kei : स्टार प्लसच्या ‘चीकू की मम्मी दूर की’ या नव्या मालिकेत झळकणार सुधा चंद्रन

भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं.
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर
छगन भूजबळांचा मंत्रिमंडळातून नेमका कोणामुळे पत्ता कट? कारणं आली समोर.
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?
बीडचा बिहार की गँग्स ऑफ वासेपूर? सरपंच हत्या प्रकरणात सूत्रधार कोण?.
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?
बीड सरपंचाच्या हत्येचा 'आका', देवेंद्र फडणवीसांचा कोणाकडे इशारा?.
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ
... अन् एकटी महिला भिडली, छेड काढणाऱ्याला चांगलंच चोपल, बघा व्हिडीओ.
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी
मुंबईतील काँग्रेस कार्यालयात घुसून आंदोलन करणं 'भाजप युवा'च्या अंगाशी.
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?
'ए अंबादास खाली बस...', शिंदेंनी विरोधकांना फटकारलं, सभागृहात काय झाल?.
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?
'.. आता भाजपची वाट', सुषमा अंधारे यांचा नेमका कोणाला खोचक टोला?.
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?
बीड सरपंच संतोष देशमुखांची हत्या, शवविच्छेदन अहवालातून काय आलं समोर?.
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर
अचानक संध्याकाळी 17 लाख मतं वाढली? EVMच्या आरोपांवर फडणवीसांचं उत्तर.