मुंबई : टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मा (Tunisha Sharma) हिने 24 डिसेंबरला मालिकेच्या सेटवर गळफास घेत आत्महत्या (Suicide) केली. तुनिशाच्या आत्महत्येनंतर तिच्या आईने अली बाबा: दास्तान ए काबुल मालिकेमधील तुनिशासोबत मुख्य भूमिकेमध्ये असलेल्या शीजान खान याच्यावर अनेक गंभीर आरोप केले. यानंतर FIR दाखल करत पोलिसांनी शीजान याला अटक केली. आता शीजान हा न्यायालयीन कोठडीमध्ये आहे. शीजान खान याच्या वकिलाने तुनिशा शर्मा हिच्यावर काही गंभीर आरोप केले असून तुनिशा अली नावाच्या मुलाला डेट करत असल्याचे म्हटले. आता त्यावर तुनिशाच्या मामाने उत्तर दिले आहे.
तुनिशा शर्माने आत्महत्या करण्याच्या फक्त 15 दिवस अगोदर शीजान आणि तुनिशामध्ये ब्रेकअप झाले होते. ब्रेकअप झाल्यामुळेच तुनिशा तणावामध्ये होती आणि यामुळेच तिने आत्महत्या केली असल्याचे तिच्या आईने म्हटले आहे.
तुनिशाचे मामा पवन शर्मा यांनी म्हटले आहे, अली हा तुनिशाचा जिम ट्रेनर होता. अलीला तुनिशाची फॅमिली गेल्या काही वर्षांपासून ओळखते. तुनिशा आणि अलीमध्ये काही वर्षे काहीच संपर्क नव्हता.
शीजान खान याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर डेटिंग अॅपवर तुनिशाला अली दिसला. अली आणि तुनिशा हे फक्त मित्र होते. त्यापेक्षा अधिक काहीच नाही. हे खरे आहे की, काॅफीसाठी तुनिशा आणि अली भेटले होते.
तुनिशा आणि अली मित्र असल्याने एकमेकांना बोलत होते. यापेक्षा त्यांच्यामध्ये वेगळे काहीच नसल्याचे तुनिशाच्या मामाने सांगितले आहे. तुनिशाच्या आत्महत्येनंतर परत एकदा अली बाबा: दास्तान ए काबुल मालिकेच्या शूटिंगला सुरूवात झाली आहे.