Phulala Sugandh Maticha | किर्ती पूर्ण करू शकेल का आपल्या आई-बाबांचं स्वप्न, ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत येणार नवा ट्विस्ट!

छोट्या पडद्यावर सध्या ‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका प्रचंड गाजत आहे. अनोख कथानक आणि त्याच समर्पक चित्रीकरण प्रेक्षकांना खूप आवडत आहे. सध्या मालिकेत नवीन वळण आल्याचं देखील पाहायला मिळत आहे.

Phulala Sugandh Maticha | किर्ती पूर्ण करू शकेल का आपल्या आई-बाबांचं स्वप्न, ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेत येणार नवा ट्विस्ट!
Phulala Sugandh Maticha
Follow us
| Updated on: Aug 08, 2021 | 5:30 PM

मुंबई : छोट्या पडद्यावर सध्या ‘फुलाला सुगंध मातीचा’ ही मालिका प्रचंड गाजत आहे. अनोख कथानक आणि त्याच समर्पक चित्रीकरण प्रेक्षकांना खूप आवडत आहे. सध्या मालिकेत नवीन वळण आल्याचं देखील पाहायला मिळत आहे. मालिकेतील ‘शुभम’ आणि ‘किर्ती’ यांची जोडी प्रचंड गाजत आहे. आयपीएस अधिकारी बनण्याचं स्वप्न उराशी बाळगून ध्येय गाठण्यासाठी निघालेल्या किर्तीला आयुष्यात लग्न नावाच्या बेडीत अडकावं लागतं.

किर्तीच्या आई-वडिलांचा अपघाती मृत्यू झाल्याने घाईघाईत तिचं लग्न लावून दिलं जातं. आपल्या मुलीने खूप शिकावं आणि पोलीस अधिकार व्हावे, अशी त्यांची इच्छा असते. मात्र, तिचं लग्न आता एका अशा घरात झालं आहे, जिथे तिला पुढील शिक्षणाची संधीच मिळाली नाही.

पूर्ण होणार का किर्तीचं स्वप्न?

सध्या कुटुंबातून पुढे आलेल्या आणि लग्न करून शुभमच्या घरात नांदणाऱ्या किर्तीच्या मनाच्या कोपऱ्यात आजही पोलीस अधिकारी होण्याची इच्छा आहे. मात्र, तिच्या या स्वप्नाबद्दल तिच्या सासरच्या घरात कोणालाही माहिती नाही. आता किर्तीला लवकरच एक खास भेट वस्तू मिळणार आहे. तिच्या वाढदिवशी तिला एक पेन भेट म्हणून मिळणार आहे. हे तेच पेन असणार आहे, जे तिच्या वडिलांनी तिच्यासाठी भेट म्हणून घेतले होते.

शुभम देणार किर्तीला साथ!

किर्तीच्या पोलीस अधिकारी बनण्याच्या या प्रवासात आता शुभम तिला साथ देणार आहे. शुभमनेच हे पेन किर्तीसाठी जपून ठेवलं होतं. अपघात झाल्यानंतर हॉस्पिटलला नेताना किर्तीच्या वडिलांनी ही ठेव शुभमच्या हातात सोपवली होती. ती भेट या खास निमित्ताने त्याने आपल्या पत्नीला अर्थात किर्तीला दिली आहे. या पेनच्या साक्षीने आता किर्तीच्या स्वप्नांचा उलगडा देखील होणार आहे.

गुन्हेगारांना पकडण्यात किर्तीची मदत

शहरात शिरलेल्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी किर्तीने पोलिसांना खूप मोठी मदत केली आहे. एक लग्न सोहळ्यात असलेला बॉम्ब शोधून तो निकामी करत तिने अनेक लोकांचे प्राण वाचवले, असे या मालिकेच्या कथानकात दाखवण्यात आले आहे. त्यामुळे मालिकेत लवकरच तिचा पोलीस अधिकारी बनण्याचा प्रवास पाहायला मिळणार आहे. मात्र, तिच्या या स्वप्नांच्यामध्ये जीजीअक्का आडकाठी तर करणार नाहीत ना, याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे. ही मालिका प्रेक्षकांची मने जिंकत असून, टीआरपीतही अव्वल स्थानी आहे.

(Phulala Sugandh Maticha latest update Kirti becomes a police officer soon)

हेही वाचा :

ऑडीओ बुकच्या माध्यमातून पुन्हा ऐकता येणार लालन सारंग आणि विनय आपटेंचा आवाज!

मी सुमित राघवनला दत्तकच घेणार होते, असं का म्हणाल्या चिन्मयी सुमित? वाचा भन्नाट किस्सा…

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.