Phulala Sugandh Maticha: ‘फुलाला सुगंध मातीचा’ मालिकेतील किर्तीची तारेवरची कसरत; स्वीकारलं नवं आव्हान

खास बात म्हणजे ट्रेनिंगपासून ते मालिकेतले हे धाडसी प्रसंग साकारताना किर्तीने बॉडी डबलचा वापर न करता स्वत: हे फाईट सीक्वेन्स पूर्ण केले आहेत. नोकरी आणि घरची जबाबदारी पार पडताना सध्या तिचा कस लागतोय.

Phulala Sugandh Maticha: 'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेतील किर्तीची तारेवरची कसरत; स्वीकारलं नवं आव्हान
Phulala Sugandh Maticha: 'फुलाला सुगंध मातीचा' मालिकेतील किर्तीची तारेवरची कसरतImage Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Aug 03, 2022 | 1:13 PM

स्टार प्रवाह वाहिनीवरील फुलाला सुगंध मातीचा (Phulala Sugandh Maticha) या मालिकेत सध्या किर्तीची (Samruddhi Kelkar) नोकरी आणि घरच्या जबाबदाऱ्या पार पाडताना तारेवरची कसरत सुरु आहे. आयपीएस (IPS) ऑफिसर बनण्याचं किर्तीचं स्वप्न होतं आणि ते पूर्ण करण्यासाठी आता तिची कसोटी सुरु आहे. वेगवेगळ्या गुन्ह्यांचा शोध घेताना किर्तीने याआधी आपलं शौर्य दाखवलंच आहे. खास बात म्हणजे ट्रेनिंगपासून ते मालिकेतले हे धाडसी प्रसंग साकारताना किर्तीने बॉडी डबलचा वापर न करता स्वत: हे फाईट सीक्वेन्स पूर्ण केले आहेत. नोकरी आणि घरची जबाबदारी पार पडताना सध्या तिचा कस लागतोय. हाच प्रसंग प्रोमोमधून दाखवण्यासाठी यावेळी किर्तीला असाच एक धाडसी प्रसंग शूट करावा लागला ज्यात ती दोरीवरुन चालतेय.

किर्ती म्हणजेच अभिनेत्री समृद्धी केळकरसाठी हे नवं आव्हान होतं. फाईट मास्टर आणि मालिकेची संपूर्ण टीम जरी सोबत असली तरी समृद्धीने दोरीवर चालण्याचं हे कसब आत्मसात केलं. दोन तीन वेळा सराव केल्यानंतर समृद्धीने अपेक्षित असलेला शॉट दिला आणि सेटवर सर्वांच्याच चेहऱ्यावर हसू उमटलं. गेले दोन वर्षे समृद्धी किर्ती ही व्यक्तिरेखा फक्त साकारत नाहीय तर ती जगतेय. त्यामुळे जेव्हा जेव्हा अशी नवी आव्हानं उभी ठाकतात, समृद्धी त्याचा हसत हसत सामना करताना दिसते.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

या मालिकेत किर्तीचं आयपीएस बनण्याचं स्वप्न पूर्ण झालं आहे. किर्तीच्या स्वप्नपूर्तीचा हा प्रवास वाटतो तितका सोपा नाही. घरच्या जबाबदाऱ्या आणि खडतर प्रशिक्षणाची कसोटी पार करत कीर्तीने आपलं ध्येयं साध्य केलं आहे. जामखेडकर कुटुंबासाठी हा अत्यंत अभिमानाचा क्षण होता. किर्तीच्या मालिकेतल्या प्रशिक्षणासाठी खऱ्याखुऱ्या एनसीसी कॅडेट टीमची नेमणूक करण्यात आली होती. एनसीसी कॅडेट व्हॅलेण्टाईन फर्नांडिस आणि त्यांच्या टीमने मालिकेतले हे रोमांचक प्रसंग साकारण्यासाठी मेहनत घेतली. प्रचंड मेहनत, जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर समृद्धीने हे खडतर प्रशिक्षणाचे सीन पूर्ण केले होते.

कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....