Aai Kuthe Kay Karte : ‘आजचा बेत वांग्याचं भरीत’, ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या सेटवर फुलली फळबाग; संजनासोबत करुया खास सफर

आई कुठे काय करते मालिकेचा सेट फळं आणि फुलांच्या मळ्याने सजला आहे. सेटवर शूटिंगसाठी आणल्या जाणाऱ्या भाज्या फेकून न देता त्यातल्या बियांपासून सेटवरची ही बाग दिमाखात सजली आहे. (Planting vegetables on the set of the serial Aai Kuthe kay karte)

Aai Kuthe Kay Karte : 'आजचा बेत वांग्याचं भरीत', ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या सेटवर फुलली फळबाग; संजनासोबत करुया खास सफर
Follow us
| Updated on: Aug 20, 2021 | 4:04 PM

मुंबई : स्टार प्रवाहवरील ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) मालिका सध्या लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. मालिकेतलं कुटुंब प्रेक्षकांचं लाडकं आहेच. यासोबतच सेटवरही हे सर्व कलाकार अगदी गुण्यागोविंदाने नांदतात. शूटिंगचा बराचसा वेळ सेटवरच जात असल्यामुळे सेट हा कलाकारांसाठी दुसरं घरच आहे.

आई कुठे काय करते मालिकेचा सेट फळं आणि फुलांच्या मळ्याने सजला आहे. सेटवर शूटिंगसाठी आणल्या जाणाऱ्या भाज्या फेकून न देता त्यातल्या बियांपासून सेटवरची ही बाग दिमाखात सजली आहे. सेटवरची सर्वच मंडळी या बागेची काळजी घेतात. त्या झाडांना खतपाणी घालतात. हिरवीगार बाग पाहून तर आता बियाणं आणून त्याची छोटीशी शेती केली जातेय. हे सर्वच खूप भारावून टाकणारं आहे.

पाहा खास व्हिडीओ

संजनानं सांगितला खास किस्सा

आई कुठे काय करते मालिकेत संजनाची भूमिका साकारणारी रुपाली भोसले सेटवरची हा खास किस्सा सांगताना म्हणाली, मला आणि माझ्या आईला झाडांची लावगड करायला खूप आवडतं. माझ्या घरी सर्व सिझनल भाज्या आणि फुलांची झाडं आम्ही लावली आहेत. त्यामुळे सेटवर देखील अशीच झाडं आमच्या टीमने लावली आहेत. सेटवर आम्ही सेंद्रिय भाज्यांचा आस्वाद घेतो. कधीकधी गरमागरम वाग्यांच्या भरीताचाही बेत असतो. शूटिंगची सुरुवात नेहमी गणपती बाप्पाच्या आशीर्वादाने होते. त्यामुळे बाप्पाचरणी सेटवरच्याच जास्वंदीच्या झाडाचं फुल असतं. त्यामुळे सेटवरचं वातावरण अतिशय प्रसन्न करणारं आहे. निसर्गाचं महत्त्व आपल्या सर्वांनाच कळतंय. त्यामुळे सेटवरचा हा नजारा काम करण्यासाठी सर्वांनाच नवी ऊजा देतो.

मालिकेला नवं वळण

छोट्या पडद्यावरची लोकप्रिय मालिका ‘आई कुठे काय करते’ (Aai Kuthe Kay Karte) आता एका वेगळ्या टप्प्यावर पोहोचली आहे. मालिकेत आता आई-बाबा अर्थात अनिरुद्ध आणि अरुंधती देशमुख यांचा घटस्फोट झाला आहे. कायदेशीररित्या एकमेकांपासून फारकत घेऊन आता हे दोघे वेगळे झाले आहेत. अनिरुद्धला घटस्फोट देण्याबरोबरच अरुंधतीने आता देशमुखांच्या घराचा देखील निरोप घेतला आहे.

घटस्फोटाच्या दिवशी आपलं सगळं सामान आवरून, 25 वर्षातील संसाराच्या आठवणी मागे सोडून अरुंधती आता पुढील आयुष्यातील तिच्या नव्या प्रवासाला सज्ज झाली आहे. मात्र आता इतक्यातच तिच्या ऑपरेशनची घाई देखील सुरु झाली आहे. पोटातील गाठ वाढत असल्याने आता अरुंधतीचं ऑपरेशन झालं आहे. या दरम्यान आरामासाठी अरुंधतीला पुन्हा समृद्धी बंगल्यात आणावं या निर्णयावर देशमुख कुटुंबातील सर्वांचेच एकमत झाले आहे.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.