Saajni : प्राजक्ता गायकवाडचे नवीन गाणं प्रदर्शित, ‘साजनी’ या नवीन गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती

या आधी ऐतिहासिक भूमिकेत पाहायला मिळणारी प्राजक्ता आता या गाण्यात नॉर्मल लुक मध्ये दिसतेय. (Prajakta Gaikwad's new song released, watch 'Saajni' song)

Saajni : प्राजक्ता गायकवाडचे नवीन गाणं प्रदर्शित, 'साजनी' या नवीन गाण्याला प्रेक्षकांची विशेष पसंती
Follow us
| Updated on: Nov 03, 2021 | 8:11 AM

मुंबई : “स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज” या मालिकेत महाराणी येसूबाई राणीसाहेबांची भूमिका साकारणारी अभिनेत्री प्राजक्ता गायकवाडने महाराष्ट्रातील तमाम रसिक प्रेक्षकांच्या मनात तिच्या अभिनयाच्या जोरावर घर केले आहे. ही भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीस पडली आणि अजूनही प्रेक्षक या भूमिकेसाठी तिला दाद देताना दिसतात.आता प्राजक्ता प्रेक्षकांसमोर एका नव्या भूमिकेत येणार आहे. सोशल मीडियावरही प्राजक्ता ऍक्टिव्ह असते आणि प्रेक्षकही तिला मनापासून प्रतिसाद देतात. त्याच प्रेक्षकांसाठी प्राजक्ता ‘साजनी’ या गाण्यातून भेटीस येत आहे.

प्राजक्ता गायकवाडने व्यक्त केल्या भावना

“साजनी” या गाण्याबद्दल बोलताना प्राजक्ता म्हणाली हे गाणं अतिशय सुंदर आहे. ऐकायला खरंच खूप छान आहे याचे म्युझिक बिट्स गाणे ऐकणाऱ्याला गुणगुणायला लावतात. आणि हे गाणं जर सकाळी ऐकलं तर खूप फ्रेश वाटेल कारण या गाण्याचे म्युझिक खूप प्लेजेंट आहे.

या आधी ऐतिहासिक भूमिकेत पाहायला मिळणारी प्राजक्ता आता या गाण्यात नॉर्मल लुक मध्ये दिसतेय. तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने म्हणजेच 6 ऑक्टोबरला या गाण्याचा टिझर लाँच झाला असून आता हे गाणं प्रेक्षकांना युट्युब, मायबोली चॅनेलवर पाहायला मिळणार आहे. या गाण्याची निर्मिती निर्माते शिवाजी जवळे, संदीप कुंजीर, गजानन सानप, संदेश भोंडवे यांनी केली आहे. तर S4G प्रॉडक्शन प्रस्तुत हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

पाहा गाणं

प्राजक्ता सोबत या गाण्यात सिद्धांत तुपे दिसणार असून त्याचा हा पहिलाच प्रोजेक्ट आहे. “साजनी” हे त्यांच्या स्वप्नातील गाणं आहे. हे गाणं म्हणजे प्रत्येकाच्या मनामनातलं, स्वप्नातलं गाणं असल्याने प्रेक्षकांना हे गाणं नक्कीच भावेल यांत शंकाच नाही. हे गाणे धैर्य आणि तेजस यांनी स्वरबद्ध केले असून याची संकल्पना निर्माते शिवाजी जवळे यांची आहे. या गाण्याला धीरज भालेराव यांनी दिग्दर्शित केले असून याचे डिझायनिंग शलाका बोजवार यांनी केले आहे. तर सीमा दारवटकर यांनी मेकअप आर्टिस्टची भूमिका उत्तमरीत्या पेलवली. बाळा कांबळे यांनी या गाण्याला शब्दबद्ध केले आहे.

‘साजनी’ हे गाणं प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे. तुम्ही हे गाणं पाहिलंत का? नसेल पाहिलं तर लवकरात लवकर पहा आणि लाईक्स अँड शेअर करा.

संबंधित बातम्या

Diana Penty Birthday : मॉडेलिंग डायनाचं पहिले प्रेम, त्यासाठी नाकारला रणबीर कपूरचा ‘रॉकस्टार’, जाणून घ्या काही खास गोष्टी

Aishwarya Rai Bachchan : ऐश्वर्याच्या वाढदिवशी अभिषेक बच्चनने दिला खास मुकुट, अभिनेत्रीचे सौंदर्य जिंकेल तुमचे मन

’झिम्मा’ चित्रपटातून गवसणार नभाच्या पल्ल्याडचं ‘माझे गाव’, मैत्रिणींच्या सहलीत प्रेक्षकही घेणार फिरस्तीचा अनुभव!

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.