‘प्रतिज्ञा’च्या ‘ठाकूर सज्जन सिंह’ने घेतला जगाचा निरोप, अभिनेता अनुपम श्याम यांचे दीर्घआजाराने निधन

लोकप्रिय टीव्ही अभिनेता अनुपम श्याम (Anupam Shyam) यांचे निधन झाले आहे. अनुपम यांनी ‘लाईफ लाईन हॉस्पिटल’मध्ये अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी किडनीशी संबंधित समस्येमुळे अनुपम यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

‘प्रतिज्ञा’च्या ‘ठाकूर सज्जन सिंह’ने घेतला जगाचा निरोप, अभिनेता अनुपम श्याम यांचे दीर्घआजाराने निधन
अनुपम श्याम
Follow us
| Updated on: Aug 08, 2021 | 11:56 PM

मुंबई : लोकप्रिय टीव्ही अभिनेता अनुपम श्याम (Anupam Shyam) यांचे निधन झाले आहे. अनुपम यांनी ‘लाईफ लाईन हॉस्पिटल’मध्ये अखेरचा श्वास घेतला. काही दिवसांपूर्वी किडनीशी संबंधित समस्येमुळे अनुपम यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. पण काही दिवसांपूर्वी तब्येतीत सुधारणा दिसल्याने त्यांना व्हेंटिलेटरवरून काढण्यात आले होते.

प्रसिद्ध दिग्दर्शक अशोक पंडित यांनी अनुपम यांच्या मृत्यूची माहिती सर्वांना दिली आहे. त्यांनी ट्विट केले, ‘ज्येष्ठ अभिनेते अनुपम श्याम यांचे अनेक अवयव निकामी झाल्यामुळे त्यांचे निधन झाले, हे जाणून अत्यंत दुःख झाले आहे. चित्रपट आणि टीव्ही उद्योगासाठी हे एक मोठे नुकसान आहे.’

पाहा अशोक पंडित यांचे ट्विट

दीर्घकाळापासून आजारी

गेल्या वर्षी, अभिनेता अनुपम श्याम यांना किडनीच्या समस्येमुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या भावाने हॉस्पिटलचे बिल भरण्यासाठी लोकांकडून आर्थिक मदतही मागितली होती. प्रकृती सुधारल्यानंतर अभिनेत्याला दररोज डायलिसिससाठी जावे लागत होते. त्यानंतर, या वर्षी जेव्हा ‘मन की आवाज प्रतिज्ञा’चा दुसरा सीझन सुरू झाला, ते पुन्हा कामावर परतले होते. शूट संपल्यानंतर ते आठवड्यातून तीनदा डायलिसिसला जायचे.

आजारी असतानाही का केले काम?

एका मुलाखतीत अनुपमने सांगितले होते की, तब्येत ठीक नसतानाही त्यांनी सज्जन सिंगचे पात्र साकारण्यासाठी हो का म्हटले होते. अनुपम म्हणाले होते की, प्रेक्षकांना हे पात्र खूप आवडते आणि त्यांना क्षणभरही आपल्या चाहत्यांना निराश करायचे नव्हते.

ते म्हणाले होते की, ‘आयुष्याशी युद्ध लढत असताना, तिथून सुखरूप बाहेर आले आहेत. आता प्रतिज्ञा या शोच्या माध्यमातून मला पुन्हा प्रेक्षकांचे मनोरंजन करायचे आहे.’

अभिनयाने जिंकली प्रेक्षकांची मने!

अभिनेते अनुपम श्याम उत्तर प्रदेशच्या प्रतापगढ येथील रहिवाशी होते. त्यांनी ‘दस्तक’, ‘दिल से’, ‘लगान’, ‘गोलमाल’ आणि ‘मुन्ना मायकेल’ सारख्या बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केले होते. याशिवाय त्यांनी ‘रिश्ते’, ‘डोली अरमानो की’, ‘कृष्णा चली लंडन’ आणि ‘हम ने ली शपथ’ या सारख्या टीव्ही शोमध्ये आपल्या उत्कृष्ट अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत.

(Pratigya fame actor anupam shyam dies due to multiple organ failure)

हेही वाचा :

ध्यानी मनी नसलेली धून दलेर मेहंदीनी गाण्याला लावली आणि सुपरहिट ठरलं आमिर खानचं ‘Rang De Basnti’!

चित्रपटच नाही तर, ‘या’ व्यवसायांमधूनही बक्कळ कमाई करतो बॉलिवूडचा ‘दबंग’ खान!

डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.