शाहरुख खान याच्या डंकी चित्रपटातून प्रियंका चाैधरी हिचा पत्ता कट, या व्यक्तीने दिली महत्वाची माहिती
बिग बाॅस 16 च्या घरात असताना निम्रत काैर हिला एकता कपूर हिचा चित्रपट भेटला. तसेच टीना दत्ता हिला देखील साऊथचा चित्रपट भेटल्याची एक चर्चा आहे. शालिन भनोट यालाही एक मालिका मिळाली आहे.
मुंबई : बिग बाॅस 16 चा फिनाले 12 फेब्रुवारी रोजी पार पडलाय. बिग बाॅस 16 (Bigg Boss 16) ला त्याचा विजेता देखील मिळाला आहे. यंदाचे बिग बाॅस 16 चे सीजन टीआरपीमध्ये टाॅपला राहिले. बिग बाॅसच्या घरात दाखल झालेल्या सर्वच स्पर्धेकांनी जबरदस्त असे मनोरंजन प्रेक्षकांचे नक्कीच केले आहे. शिव ठाकरे आणि प्रियंका चाैधरी (Priyanka Chaudhary) यांच्यापैकी एकजण बिग बाॅस 16 चा विजेता होईल, असे सर्वांनाच वाटत होते. मात्र, जबरदस्त अशी फॅन फाॅलोइंग असल्याने एमसी स्टॅन हा बिग बाॅस 16 चा विजेता ठरला. एमसी स्टॅन हा बिग बाॅस 16 चा विजेता ठरल्यानंतर अनेकांनी बिग बाॅसच्या निर्मात्यांवर गंभीर आरोप केले. एमसी स्टॅन याने घरामध्ये काहीच केले नसून तो कसा बिग बाॅस 16 चा विजेता होऊ शकतो, असे अनेकांनी म्हटले. एमसी स्टॅन हा बिग बाॅस 16 चा विजेता झाल्यानंतर शिव ठाकरे याचेही चाहते नाराज झाल्याचे सोशल मीडियावर बघायला मिळाले. मात्र, बिग बाॅसच्या इतिहासामध्ये असे पहिल्यांदाच घडले की, दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या स्पर्धकाने विजेत्याला उचलून घेत डान्स केला.
बिग बाॅस 16 च्या घरात असताना निम्रत काैर हिला एकता कपूर हिचा चित्रपट भेटला. तसेच टीना दत्ता हिला देखील साऊथचा चित्रपट भेटल्याची एक चर्चा आहे. शालिन भनोट यालाही एक मालिका मिळाली आहे.
गेल्या काही दिवसांपासून एक चर्चा सुरू आहे की, प्रियंका चाैधरी हिला शाहरुख खान याचा आगामी डंकी हा चित्रपट मिळाला असून डंकी चित्रपटामध्ये प्रियंका चाैधरी ही महत्वाच्या भूमिकेत आहे.
या बातमीनंतर प्रियंका चाैधरी हिच्या चाहत्यांमध्ये आनंदाचे वातावरण बघायला मिळत होते. मात्र, आता यासंदर्भात मोठे अपडेट पुढे येत असून डंकी चित्रपटाशी संबंधित एक व्यक्तीने यावर भाष्य केले आहे.
शाहरुख खान याच्या डंकी चित्रपटामध्ये प्रियंका चाैधरी ही दिसणार नसून डंकी चित्रपटाची तिला आॅफर असल्याच्या अफवा असल्याचे त्या व्यक्तीने सांगितले आहे. म्हणजेच प्रियंका चाैधरी ही डंकी चित्रपटामध्ये दिसणार नाहीये.
अजून एक चर्चा आहे की, सलमान खान याच्या चित्रपटामध्ये प्रियंका चाैधरी ही महत्वाच्या भूमिकेत आहे. मात्र, यावरही अजून काही कळू शकले नाहीये. काही दिवसांपूर्वी प्रियंका चाैधरी ही म्हटली होती की, मी बिग बाॅसच्या घराबाहेर आता आलीये. त्यामुळे मला अजून शाहरुख खान याच्या डंकी चित्रपटाबद्दल काही माहिती नाहीये.