Video | पत्नी दिसताच रोमँटिक झाला पुनीत पाठक, खाजगी व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत!

कोरिओग्राफर पुनीत पाठक (Punit Pathak) हे मनोरंजन विश्वातील एक सुप्रसिद्ध नाव आहे. आजकाल पुनीत 'डान्स प्लस' हा शो जज करताना दिसत आहे. जिथे सहसा त्याची सह-न्यायाधीश शक्ती मोहन हिच्यासह शोमध्ये, तो त्याच्या रोमँटिक आणि सिझलिंग केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मने जिंकत आहे.

Video | पत्नी दिसताच रोमँटिक झाला पुनीत पाठक, खाजगी व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत!
Punit Pathak
Follow us
| Updated on: Oct 09, 2021 | 11:42 AM

मुंबई : कोरिओग्राफर पुनीत पाठक (Punit Pathak) हे मनोरंजन विश्वातील एक सुप्रसिद्ध नाव आहे. आजकाल पुनीत ‘डान्स प्लस’ हा शो जज करताना दिसत आहे. जिथे सहसा त्याची सह-न्यायाधीश शक्ती मोहन हिच्यासह शोमध्ये, तो त्याच्या रोमँटिक आणि सिझलिंग केमिस्ट्रीने प्रेक्षकांची मने जिंकत आहे. पुनीत पाठक यांनी 2020 मध्ये निधी मुनी सिंह हिच्याशी लग्न केले. दरम्यान, पुनीत पाठक याचा एक रोमँटिक व्हिडीओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ कोरिओग्राफरची पत्नी निधी मुनी सिंहने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

या व्हिडीओमध्ये पुनीतची रोमँटिक शैली पाहायला मिळत आहे. व्हिडीओमध्ये, पुनीत त्याच्या शयनगृहात अर्थात बेडरूममध्ये शर्टलेस बसून जेवण जेवत आहे. त्याचवेळी त्याच्या हातात साडी पदर किंवा दुपट्टा असे काहीतरी पकडलेले दिसते, जे त्याची पत्नी निधी मुनीचे आहे. पुनीत निधीच्या दिशेने अतिशय रोमँटिक नजरेने पाहत आहे आणि ती त्याचा व्हिडीओ बनवत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना निधीने सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणी यांच्या ‘शेर शाह’ चित्रपटातील ‘राता लंबिया’ हे गाणे पार्श्वभूमीवर ठेवले आहे.

पाहा व्हिडीओ :

पत्नीनेच शेअर केला व्हिडीओ

व्हिडीओ शेअर करताना निधी मुनी सिंहने कॅप्शनमध्ये पती पुनीत पाठक याचे नाव लिहिले आहे आणि दोन हार्ट इमोजी देखील पोस्ट केल्या आहेत. पूर्वी पुनीतला बिग बॉस ओटीटीमध्ये पाहुणे म्हणूनही पाहिले गेले होते. शोमध्ये पुनीत त्याचा कोरिओग्राफर मित्र निशांत भट्टला पाठिंबा देण्यासाठी आला होता. पुनीत 2019 मध्ये रोहित शेट्टीच्या स्टंटवर आधारित रिअॅलिटी शो ‘खतरों के खिलाडी’चा विजेता ठरला आहे.

अभिनयातही आजमावले नशीब

याशिवाय तो काही चित्रपटांमध्येही दिसला आहे. ज्यात रेमो डिसूझाचा ‘नवाबजादे’, ‘एबीसीडी’ आणि ‘एबीसीडी 2’ देखील समाविष्ट आहे. पुनीत पाठक याने 2020 मध्ये निधी मुनी सिंह यांच्याशी लग्न केले. 11 डिसेंबर रोजी दोघेही लग्नाच्या बंधनात अडकले. त्यांच्या लग्नात शक्ती मोहन, मुक्ती मोहन, मौनी रॉय यांच्यासह त्यांचे अनेक मित्र आणि मनोरंजन क्षेत्रातील अनेक सेलिब्रिटी उपस्थित होते.

हेही वाचा :

Vishal Kotian | चित्रपटाच्या तिकिटांची काळाबाजारी करून भरली शाळेची फी, आता ‘बिग बॉस’मधून करतोय प्रेक्षकांचं मनोरंजन, वाचा अभिनेता विशाल कोटियानबद्दल

Apurva Nemlekar : नवरात्रीचा तिसरा दिवस; रंग करडा आणि जया गौरी दुर्गा परमेश्वरीचा लूक, पाहा अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरचा खास अंदाज

Happy Birthday Sayani Gupta | फेसबुकमुळे मिळाली शाहरुखसोबत काम करायची संधी, ‘फॅन’मधून पूर्ण झाले सयानी गुप्ताचे स्वप्न!

Premat Tujhya : अभिनेत्री सायली चौधरी आणि अभिनेता सिद्धार्थ खिरीदची लव्हेबल केमिस्ट्री, ‘प्रेमात तुझ्या’ या गाण्यात झळकली जोडी

मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.