राहुल नवलानी 11 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडीत, ‘वैशाली ठक्कर’मुळेच…
वैशाली हिने आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट देखील लिहिली होती. त्यामध्ये तिने तिच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या व्यक्तींची नावे लिहिली आहेत.
मुंबई : टीव्ही अभिनेत्री वैशाली ठक्करच्या आत्महत्येनंतर चाहत्यांना मोठा धक्काच बसला आहे. वैशालीच्या आत्महत्येनंतर दररोज वेगवेगळे खुलासे होत आहेत. वैशाली हिने आत्महत्येपूर्वी एक सुसाईड नोट देखील लिहिली होती. त्यामध्ये तिने तिच्या आत्महत्येस जबाबदार असलेल्या व्यक्तींची नावे लिहिली आहेत. इतकेच नाही तर या प्रकरणातील मुख्य आरोपीला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले आणि न्यायालयाने राहुल नवलानीला कोठडीत पाठवले आहे.
राहुल नवलानी याला न्यायालयाने 11 नोव्हेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. यादरम्यान पोलिसांनी असा दावा केला आहे की, राहुल विरोधात त्यांच्याकडे अनेक पुरावे आहेत. मात्र, राहुलने वैशाली हिच्या आत्महत्येनंतर आपल्या मोबाईलमधील सर्व डेटा (पुरावे) नष्ट केले आहेत. सध्या पोलिसांची एक टीम मोबाईलमधील सर्व डेटा परत मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहे.
राहुल याला न्यायालयात हजर करण्यात आले असता. पोलिसांनी राहुलला चौकशी दरम्यान बेदम मारहाण केली. असा आरोप वकील राहुल पेठे यांनी केला आहे. इतकेच नाही तर राहुल नवलानीचे वकील पेठे म्हणाले की, वैशाली ठक्करमुळे माझे लग्न तुटायला आले होते, असे राहुल याने त्याचे वकील राहुल पेठे यांना सांगितले आहे. याप्रकरणात आता अनेक खुलासे होताना दिसत आहेत. 11 नोव्हेंबरपर्यंत राहुल हा न्यायालयीन कोठडीत असणार आहे.