Rajeev Sen | चारू असोपा हिच्यावर सुष्मिता सेनच्या भावाने लावले अत्यंत गंभीर आरोप
अभिनेत्री चारू असोपा आणि सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत.
मुंबई : टीव्ही अभिनेत्री चारू असोपा आणि सुष्मिता सेनचा भाऊ राजीव सेन गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. हे दोघे लवकरच घटस्फोट घेणार असून त्यापूर्वी दोघेही ऐकमेकांवर अत्यंत गंभीर आरोप करत आहेत. काही दिवसांपूर्वी चारूने सांगितले होते की, मी गर्भवती असताना राजीव मला धोका देत होता आणि त्याचे विवाहबाह्य संबंध देखील होते. चारू असोपाने राजीव सेनवर केलेले आरोप ऐकून अनेकांना मोठा धक्काच बसला. मात्र, आता राजीवनेही चारू हिच्यावर आरोप केले असून टीव्ही इंडस्ट्रीतील एका अभिनेत्यासोबत चारूचे अफेअर असल्याचे सांगितले आहे.
चारूने राजीववर फक्त विवाहबाह्य संबंधाचाच आरोप केला नसून त्याच्यावर मारहाण आणि शिवीगाळ करत असल्याचा देखील आरोप केला होता. चारू प्रमाणेच राजीव सेन याने देखील चारूवर गंभीर आरोप केले आहेत. राजीव म्हणाला की, चारू असोपाचे टीव्ही अभिनेता करण मेहरासोबत अफेअर होते. ही गोष्ट स्वत: चारूच्या आईनेच मला सांगितली आहे, असे राजीव म्हणाला.
चारू असोपा हिने माझ्यावर केलेले सर्व आरोप खोटे असल्याचे देखील राजीव सेनने सांगितले. मी कधीच चारूला मारहाण किंवा शिवीगाळ केली नाहीये. चारू आणि करण मेहरा यांनी रोमँटिक इंस्टाग्राम रील बनवले होते, यावरही मी कधीच चारूला प्रश्न विचारले नाहीत, उलट चारूनच माझ्यावर कायम संशय घेत होती.
राजीव सेन आणि चारू असोपा हे दोघेही सातत्याने ऐकमेंकावर गंभीर आरोप करताना दिसत आहेत. चारू आणि राजीव यांना एक लहान मुलगी देखील आहे. 2019 मध्ये यांचे लग्न झाले होते. मात्र, काही वर्षांमध्येच यांच्या नात्यामध्ये खटके उडण्यास सुरूवात झाली. यापूर्वी दोघांनी घटस्फोट घेण्याच्या निर्णय घेतला होता. मात्र, चारू आणि राजीव यांनी त्यांच्या नात्याला एक संधी देण्याचे ठरवले होते.