Raju Srivastav | राजू श्रीवास्तव यांची तब्बल 3 वेळा अँजिओप्लास्टी, वाचा डाॅक्टर नेमके काय म्हणाले…
राजू यांची तब्येत चांगली होण्यासाठी किमान 10 दिवसांचा कालावधी लागू शकतो, असे डाॅक्टरांनी अगोदरच सांगितले होते.
मुंबई : हृदयविकाराचा झटका आल्याने राजू श्रीवास्तव (Raju Srivastav) यांना 10 आॅगस्ट रोजी दिल्लीतील एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. तब्बल 41 दिवस तज्ज्ञ डाॅक्टरांनी राजू यांच्यावर उपचार केले. मात्र आज राजू यांची प्राणज्योत मावळलीये. देशभरातून चाहते राजू यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करत होते. राजू यांच्या मेंदूच्या नसा दबल्याचे एमआरआयमधून (MRI) स्पष्ट झाले होते. राजू यांची तब्येत चांगली होण्यासाठी किमान 10 दिवसांचा कालावधी लागू शकतो, असे डाॅक्टरांनी (Doctor) अगोदरच सांगितले होते. मात्र, सर्व प्रयत्न करूनही राजू यांना शुद्ध येत नसल्याने डाॅक्टरांनीही चिंता व्यक्त केली होती.
10 आॅगस्ट रोजी डाॅक्टरांनी तिसऱ्यांदा राजू केली अँजिओप्लास्टी
राजू श्रीवास्तव यांच्या अँजिओप्लास्टी वेळी डाॅक्टरांच्या लक्षात आले की, हृदयामध्ये 100 टक्के ब्लॉकेज आहेत. हार्टचे रूग्ण असल्याने यापूर्वी दोनदा राजू यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली होती. 10 आॅगस्ट रोजी डाॅक्टरांनी तिसऱ्यांदा राजू यांच्यावर जिओप्लास्टी केली. 41 दिवस राजू हे व्हेंटिलेटरवर होते. राजू यांच्या प्रकृतीवर डाॅक्टर सतत लक्ष ठेवून होते. राजू यांच्या पत्नी शिखा श्रीवास्तव आणि मुलगी अंतरा या चाहत्यांना राजू यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्याचा विनंती करत होत्या.
58 व्या वर्षी राजू यांची प्राणज्योत मावळली…
मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजू श्रीवास्तव त्याच्या प्रत्येक शोसाठी 4 ते 5 लाख रुपये घेत होते. यासोबतच राजू श्रीवास्तव जाहिरात आणि चित्रपटातून भरपूर कमाई करत होते. राजू श्रीवास्तव यांची एकूण संपत्ती 20 कोटी रुपये आहे. राजूचे स्वतःचे एक आलिशान घर आहे, ज्यात सर्व सुविधा आहेत. याशिवाय कानपूरमध्ये त्यांचे स्वतःचे घर आहे. राजू यांनी त्यांच्या पश्चात कोटींची संपत्ती त्यांच्या परिवारासाठी सोडलीये.