Rakhi Sawant | राखी सावंत आणि आदिल दुर्रानी यांच्यामध्ये पुन्हा वाद? अभिनेत्रीने केले मोठे आरोप
राखी सावंत हिच्यासोबतचे लग्न नाकारू शकत नाही आणि स्वीकारू शकत नाही म्हटले. मला फक्त दहा दिवसांचा वेळ द्या मी कोणत्या परिस्थितीमध्ये राखी सावंत हिच्यासोबत लग्न केले हे सांगेल.
मुंबई : राखी सावंत ही गेल्या काही दिवसांपासून प्रचंड चर्चेत आहे. अगोदर राखी सावंत (Rakhi Sawant) ही बिग बाॅस मराठीमध्ये सहभागी झाली होती. त्यावेळी तिचा प्रियकर आदिल दुर्रानी हा बिग बाॅसच्या घरात गेला होता आणि त्याने राखीला प्रपोज देखील केला. यानंतर राखी सावंत ही बिग बाॅसच्या घराबाहेर पडली आणि तिने थेट लग्नाचे काही फोटो आणि व्हिडीओ हे सोशल मीडियावर शेअर केले. धक्कादायक बाब म्हणजे सात महिन्यांपूर्वीच राखी सावंत हिचे आदिल दुर्रानी (Adil Durrani) याच्यासोबत लग्न केले होते. यामध्ये राखी सावंत हिने कोर्टामध्ये अगोदर आदिल दुर्रानी याच्यासोबत लग्न केले आणि मग निकाह केला. इतकेच नाही तर आदिल दुर्रानी याच्यासोबत लग्न करण्यासाठी राखी सावंत हिने इस्लाम धर्म देखील स्वीकारला आणि स्वत: चे नाव फातिमा आदिल दुर्रानी असे ठेवले. राखी सावंत हिच्या लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ पाहून चाहत्यांना देखील मोठा धक्का बसला होता. यानंतर आदिल दुर्रानी याने मीडियासमोर येत राखी सावंत हिच्यासोबतचे लग्न नाकारू शकत नाही आणि स्वीकारू शकत नाही म्हटले. मला फक्त दहा दिवसांचा वेळ द्या मी कोणत्या परिस्थितीमध्ये राखी सावंत हिच्यासोबत लग्न केले हे सांगेल.
यानंतर परत आदिल दुर्रानी याने राखी सावंत हिच्यासोबतचे लग्न स्वीकारले. आपले लग्न वाचवण्यास सलमान खान यानेच मदत केल्याचे काही दिवसांपूर्वीच राखी सावंत हिने सांगितले होते. मात्र, आदिल दुर्रानी आणि राखी सावंत यांच्यामध्ये अजूनही सर्वकाही अलबेल नसल्याचे पुढे आले आहे.
चार दिवसांपूर्वीच राखी सावंत ही पैपराजी यांच्यापुढे ढसाढसा रडत आदिल दुर्रानी याने आपल्याला धोका दिल्याचे म्हटले होते. परत राखी सावंत म्हणाली की, आदिल दुर्रानी आणि माझ्यामध्ये आता सर्वकाही व्यवस्थित आहे आणि मी माझ्या पतीची बदनामी अजिबात करणार नाही.
आता नुकताच राखी सावंत हिचा एक व्हिडीओ पुढे आलाय. या व्हिडीओमध्ये राखी सावंत ही आदिल दुर्रानी याला फोनवर बोलताना दिसत आहे आणि ढसाढसा रडत आहे. राखी सावंत म्हणते की, आदिल दुर्रानी हा परत एकदा त्याच्या एक्स प्रियसीकडे मला सोडून गेला आहे.
एका वर्षापासून आदिल दुर्रानी माझ्यासोबत राहिला आणि माझ्यासोबत लग्न केले. तो माझा होऊ शकला नाही तर दुसऱ्या कोणाचाही होऊ शकत नाही. इतकेच नाही तर या संभाषनामध्ये आदिल दुर्रानी हा राखी सावंत हिला घटस्फोट मागत असल्याचे दिसत आहे. आदिल दुर्रानी याच्यावर अनेक गंभीर आरोप हे राखी सावंत हिने केले आहेत.