Sonali Phogat: सोनाली फोगाट यांच्या पीएबाबत राखी सावंतचा खुलासा; म्हणाली “जेव्हा दिसला तेव्हा..”
आधी सोनाली यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं म्हटलं जात होतं. मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. सोनाली यांना ड्रग्ज दिल्याचंही गोवा पोलिसांनी सांगितलं होतं.
टिकटॉक स्टार आणि भाजप नेत्या सोनाली फोगाट (Sonali Phogat) यांच्या मृत्यूचं गूढ सध्या चर्चेचा विषय आहे. आधी सोनाली यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचं म्हटलं जात होतं. मात्र पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये अनेक धक्कादायक खुलासे झाले आहेत. सोनाली यांना ड्रग्ज दिल्याचंही गोवा पोलिसांनी सांगितलं होतं. अशा परिस्थितीत आता अनेक सेलिब्रिटी सोनाली यांना न्याय देण्याची मागणी करत आहेत. अभिनेत्री राखी सावंतनेही (Rakhi Sawant) नुकताच सोनाली फोगाट आणि त्यांचे पीए सुधीर सांगवान (Sudhir Sangwan) यांच्याबाबत मोठा खुलासा केला आहे.
राखी सावंत आणि सोनाली फोगाट या ‘बिग बॉस 14’मध्ये स्पर्धक म्हणून एकत्र दिसल्या होत्या. पापाराझींशी बोलताना राखीने सांगितलं की, तिने सोनाली यांच्यासोबत शोमध्ये चांगला वेळ घालवला होता. “मला पहिल्या दिवसापासूनच त्यंच्या हत्येची शंका होती. मी बिग बॉसमध्ये त्यांच्यासोबत चांगला वेळ घालवला होता. आपली मुलगी आणि पीए (सुधीर सांगवान) यांच्यावर त्यांना खूप जीव होता. त्यांच्यावर खूप प्रेम असल्याचं मला सोनाली यांनी सांगितलं होतं. सुधीर त्यांचा पीए आणि मित्रही होता. त्या आता जिवंत नाहीत तर मला हे सगळं सांगताना वाईट वाटतंय. त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता की नाही, हे आता पोलिसच सांगू शकतील,” असं राखी म्हणाली.
View this post on Instagram
सोनाली यांच्याविषयी बोलताना तिने पुढे सांगितलं, “मी सोनाली यांचा व्हिडिओ पाहिला होता. ते पाहून मी आश्चर्यचकित झाले. तेव्हा मी दुबईत होते. ज्यांनी सोनाली यांची हत्या केली आहे त्यांच्यावर कारवाई करावी अशी माझी भाजपला विनंती आहे. त्या सुधीर सांगवानने सोनाली यांच्या मुलीला अनाथ केलं. मी त्याला 10 वेळा भेटले आहे आणि प्रत्येक वेळी मी त्याला पाहिलं तेव्हा मला नेहमीच राग आला. तो गुन्हेगार आहे असंच मला वाटायचं. आज ते खरं ठरलं. मला सोनाली यांच्याबद्दल खूप वाईट वाटत आहे.” राखी सावंतच्या आधी राहुल वैद्य आणि अर्शी खान यांनीसुद्धा सोनाली फोगाट यांच्या हत्येतील दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली.