Video | ‘माझा प्रेमावरचा विश्वासच उडालाय…’, करण-निशाच्या वादावर ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंतची प्रतिक्रिया
छोट्या पडद्यावरील टीव्ही सीरियलचा प्रसिद्ध अभिनेता करण मेहरा (Karan Mehra) आणि त्याची पत्नी निशा रावल (Nisha Rawal) यांच्यात सुरू असलेला वाद आता चर्चेचा विषय बनला आहे. प्रत्येकजण सध्या याच वाद्विषयी बोलत आहे.
मुंबई : छोट्या पडद्यावरील टीव्ही सीरियलचा प्रसिद्ध अभिनेता करण मेहरा (Karan Mehra) आणि त्याची पत्नी निशा रावल (Nisha Rawal) यांच्यात सुरू असलेला वाद आता चर्चेचा विषय बनला आहे. प्रत्येकजण सध्या याच वाद्विषयी बोलत आहे. 1 जून रोजी करणची पत्नी निशा रावल हिने पत्रकार परिषदे घेत करणने आपली फसवणूक केल्याचा आरोप केला होता. तिने सांगितले की, आमच्या लग्नाला 9 वर्ष झाली होती आणि त्याधीच्या 4 वर्षांच्या नात्यानंतर मला आज असे उभे राहणे आवडत नाहीय. पण आता ते आवश्यक झाले आहे. यानंतर आता ‘ड्रामा क्वीन’ राखी सावंत (Rakhi Sawant) हिने देखील या प्रकरणी आपली बाजू मांडली आहे (Rakhi Sawant Reaction on Karan Mehra and Nisha Rawal domestic violence case).
अभिनेत्री राखी सावंत देखील करण आणि निशा राहत असलेल्या इमारतीतच राहते. करण आणि निशा मेहरा गेल्या 9 वर्षांपासून याच सोसायटीमध्ये राहत आहेत.
माझा प्रेमावरील विश्वासच उडालाय!
मुंबईत माध्यमांशी बोलताना राखी सावंतने या संदर्भात भाष्य केले आहे. अभिनेत्री म्हणते की, ती गेल्या अनेक वर्षांपासून या जोडप्याला ओळखत आहे. ते एकाच इमारतीत राहतात, परंतु असे घडेल असे तिला कधी स्वप्नातही वाटले नव्हते. राखीने सांगितले की, ‘मी स्वत: निशा रावल अनेक वेळा करवा चौथचा कार्यक्रम साजरा करताना पाहिला आहे. निशाने अनेक वेळा माझ्या हातावर मेहंदी काढली आहे. पण आता या प्रकरणामुळे माझा प्रेम आणि लग्नावरचा विश्वास पूर्णपणे उडाला आहे. 5 वर्षांपूर्वी आम्ही सगळे एकत्र अमेरिकेत गेलो होतो. हे सर्व कसे घडले, यावर माझा विश्वासच बसत नाही. दोघे किती क्युट जोडपे होते. आता दोघेही वेगळे होत आहेत. त्यांना एक गोंडस, चिमुकला मुलगा देखील आहे. निशाला बरीच मारहाण केली गेली आहे. फोटोंमध्ये मी पाहिले की, तिला मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता. या जोडीबद्दल हे सर्व ऐकून मला खूप वाईट वाटते आहे.’(Rakhi Sawant Reaction on Karan Mehra and Nisha Rawal domestic violence case)
पाहा राखीची प्रतिक्रिया
अभिनेत्री राखी सावंत 2000पासून बॉलिवूड आणि टीव्ही इंडस्ट्रीमध्ये काम करत आहेत. प्रत्येक मोठ्या आणि लहान कलाकारांशी तिची छान मैत्री आहे. अशा परिस्थितीत अभिनेत्रीची या प्रकरणावर प्रतिक्रिया अपेक्षित होतीच. यादरम्यान, तिने सांगितले की, ती लवकरच एका म्युझिक व्हिडीओमध्ये झळकणार आहे.
का तुटलं निशा आणि करणचं नातं?
मीडियाशी बोलताना निशाने सांगितले होते की, करणचे दिल्ली स्थित एका मुलीशी अफेयर सुरु आहे. त्याला आता तिच्याबरोबर राहायचे आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून तो चंदीगडमध्ये शूटिंग करत होता. जिथे माझ्या विचारण्यावर आता त्याने काबुल केले आहे की, त्याचा त्या मुलीशी भावनिक आणि शारीरिक संबंध आहे. ज्यामुळे त्याला घटस्फोट हवा आहे. पण 31 मेच्या रात्री आमच्यात काही वाद झाले आणि त्यावेळी त्याने माझे डोके भिंतीवर आपटले आणि त्यानंतर माझ्या कपाळातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला. त्यानंतरच मी त्याच्यावर एफआयआर दाखल करण्याचा निर्णय घेतला.
(Rakhi Sawant Reaction on Karan Mehra and Nisha Rawal domestic violence case)
हेही वाचा :
दीपिका पदुकोणचा ‘एक्स’ बॉयफ्रेंड बनला ‘बाबा’, निहार-नीतिच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन!
विराट-अनुष्काची लेक पुन्हा पापाराझींच्या कॅमेरात कैद, सोशल मीडियावर ‘वामिका’ची झलक चर्चेत!
Must Watch Netflix Show | ‘फ्रेंड्स रियुनियन’ ते ‘ल्युसिफर’, नेटफ्लिक्सचे ‘हे’ वेब शो एकदा आवर्जून बघाच! https://t.co/iammHaRQWC #FriendsReunion | #Netflix | #LuciferSeason5
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 3, 2021