Rakhi Sawant | गाण्याच्या लाँचिंगवेळी रडताना दिसली राखी सावंत, थेट म्हणाली, मी माणूस नाही का?
गेल्या काही दिवसांपासून राखी सावंत ही सतत चर्चेत आहे. यावेळी राखी सावंत तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत आलीये. काही दिवसांपूर्वीच राखी सावंत हिने पती आदिल दुर्रानी याच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राखी सावंत (Rakhi Sawant) ही तिच्या पर्सनल लाईफमुळे प्रचंड चर्चेत आहे. राखी सावंत हिने आदिल दुर्रानी याच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. राखी सावंत आणि आदिल दुर्रानी यांच्यामधील वाद थेट कोर्टात पोहचलाय. आदिल दुर्रानी हा गेल्या काही दिवसांपासून कोठडीमध्ये आहे. राखी सावंत हिने आदिल दुर्रानी याचे अगोदरच लग्न (Marriage) झाल्याचे म्हटले आहे. मात्र, आदिल दुर्रानी याच्यासोबत लग्न करण्याच्या अगोदर आपल्याला हे काही माहित नसल्याचे राखी हिने म्हटले. काही दिवसांपूर्वीच राखी सावंत म्हणाली की, काहीही झाले तरीही मी आदिल दुर्रानी याला घटस्फोट देणार नाहीये.
राखी सावंत ही बिग बाॅस मराठीमधून बाहेर आली आणि तिने सोशल मीडियावर काही व्हिडीओसह फोटो शेअर करत आपले आणि आदिल दुर्रानीचे लग्न झाल्याचे जाहिर केले. इतकेच नाहीतर राखी सावंत हिने लग्नानंतर इस्लाम धर्म स्वीकारत स्वत: चे नाव देखील बदलून फातिमा असे ठेवले. ज्यानंतर चाहत्यांना मोठा धक्का बसला.
नुकताच राखी सावंत हिचा नवा म्युझिक व्हिडीओ रिलीज झाला. या म्युझिक व्हिडीओचे नाव झूठा असे असून या व्हिडीओमुळे सध्या ती चर्चेत आहे. हे गाणे राखी सावंत हिचा आयुष्यामधील घटनांवर आधारित आहे. गाण्याच्या सुरूवातीला दाखवण्यात आले की, एक चाहता तिला कार भेट देऊन कशाप्रकारे इंप्रेस करतो आणि त्याच्यापुढे थेट लग्न दाखवण्यात आलंय.
View this post on Instagram
पुढे गाण्यामध्ये दाखवण्यात आलंय की, हा चाहता शेवटी तिला कशाप्रकारे धोका देऊन तिची फसवूक करतो. नुकताच पापाराझी यांच्यासमोर गाण्याच्या लाँचिंगवेळी राखी सावंत ही ढसाढसा रडताना दिसली. राखी सावंत ही स्टेजवर उभी आहे आणि अचानकच रडायला लागते आणि खाली बसते. माईक हातामध्ये घेऊन राखी काही प्रश्न विचारताना देखील दिसत आहे.
माईकवर राखी सावंत म्हणते की, लोक म्हणत आहेत. राखी सावंत हिला कोणी फसवू शकत नाही. का राखी सावंत हिच्याकडे दिल नाही, का राखी सावंत संसाराचे स्वप्न पाहू शकत नाही, राखी सावंत एक महिला नाहीये? असे म्हणत राखी सावंत रडताना दिसली आहे. ज्याचे व्हिडीओ आता व्हायरल होताना दिसत आहेत.
युजर्सने आता राखी सावंत हिच्या या व्हिडीओवर कमेंट करण्यास सुरूवात केल्या आहेत. एकाने लिहिले की, मॅडम लोकांच्या बोलण्याकडे फार जास्त लक्ष अजिबात द्यायचे नाही, लोक काहीही बोलतात. दुसऱ्याने लिहिले की, मला खरोखरच आता राखी सावंत हिच्याबद्दल वाईट वाटत आहे. तिसऱ्याने लिहिले की, काही नाही ही फक्त नाटक करत आहे.