Rakhi Sawant | लग्नानंतर पहिल्यांदाच दर्गामध्ये दिसली राखी सावंत, व्हिडीओ व्हायरल
लग्नानंतर राखी सावंत हिचे नाव फातिमा आदिल दुर्रानी असे आहे. अगोदर राखी सावंत हिने कोर्टामध्ये लग्न केले आणि नंतर निकाह केला.
मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राखी सावंत (Rakhi Sawant) ही सतत चर्चेत आहे. बिग बाॅस मराठीमध्ये राखी सावंत ही सहभागी झाली होती. बिग बाॅसच्या घराबाहेर पडल्यानंतर काही दिवसांमध्येच राखी सावंत हिने धक्कादायक खुलासा करत सोशल मीडियावर तिच्या लग्नाचे काही फोटो आणि व्हिडीओ थेट शेअर करून टाकले. राखी सावंत हिच्या लग्नाचे फोटो (Photo) पाहून अनेकांना धक्काच बसला. विशेष म्हणजे राखी सावंत हिने सात महिन्यांपूर्वी आदिल दुर्रानी याच्यासोबत लग्नगाठ बांधली होती. इतकेच काय तर आदिल दुर्रानी याच्यासोबत लग्न केल्यानंतर राखी सावंत हिने इस्लाम स्वीकारला आहे. लग्नानंतर राखी सावंत हिचे नाव फातिमा आदिल दुर्रानी असे आहे. अगोदर राखी सावंत हिने कोर्टामध्ये लग्न केले आणि नंतर निकाह केला.
चाहते राखी सावंत हिचे लग्नाचे फोटो आणि व्हिडीओ पाहून तिला शुभेच्छा देत असतानाच आदिल दुर्रानी याने धक्कादायक खुलासा करत म्हटले की, मी राखी सावंत हिच्यासोबत केलेले लग्न नाकारून शकत नाही आणि स्वीकारू देखील शकत नाही.
आदिल दुर्रानी याने थेट राखी सावंत हिच्यासोबतच्या लग्नाला नकार दिला. राखी सावंत म्हणाली होती की, आदिल दुर्रानी याने मला आमच्या लग्नाबद्दल कोणालाच एक वर्ष सांगायचे नाही असे सांगून ठेवले होते. परंतू मी बिग बाॅसच्या घराबाहेर पडल्यानंतर मला काही गोष्टींमध्ये बदल जाणवले होते आणि म्हणून मी लग्नाची गोष्ट जाहिर केली.
View this post on Instagram
या घडामोडींमध्ये आदिल दुर्रानी याने राखी सावंत हिच्यासोबत केलेले लग्न मान्य केले. राखी सावंत हिच्या आईची तब्येत खूप जास्त खराब आहे. राखी आईला भेटण्यासाठी दररोज दवाखान्यामध्ये जाते. आईच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना करण्याची विनंतीही राखीने काही दिवसांपूर्वी चाहत्यांना केली होती.
नुकताच राखी सावंत हिचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये राखी सावंत ही दर्गामध्ये गेल्याचे दिसत असून आईच्या तब्येतीसाठी आपण दर्गामध्ये आल्याचे राखी सावंत ही व्हिडीओमध्ये सांगताना दिसत आहे. आता राखीचा हाच व्हिडीओ व्हायरल होताना दिसत आहे.