Raksha Bandhan: ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा, पिंकीचा विजय असो या मालिकांमध्ये राखीपौर्णिमेचा उत्साह!

स्टार प्रवाहवरील ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा, तुझेच मी गीत गात आहे आणि पिंकीचा विजय असो मालिकेत रक्षाबंधनाचा उत्साह पाहायला मिळणार आहे.

Raksha Bandhan: ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा, पिंकीचा विजय असो या मालिकांमध्ये राखीपौर्णिमेचा उत्साह!
मालिकांमध्ये राखीपौर्णिमेचा उत्साह! Image Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Aug 11, 2022 | 3:23 PM

बहिण-भावाच्या नात्यातला गोडवा वाढवणारा सण म्हणजे रक्षाबंधन. स्टार प्रवाहवरील (Star Pravah Serials) ठिपक्यांची रांगोळी, रंग माझा वेगळा, तुझेच मी गीत गात आहे आणि पिंकीचा विजय असो मालिकेत रक्षाबंधनाचा उत्साह पाहायला मिळणार आहे. या खास दिवशी खरंतर बहिण भावाला राखी (Rakhi) बांधते मात्र ठिपक्यांची रांगोळी मालिकेत मात्र आगळं वेगळं रक्षाबंधन (Raksha Bandhan) पाहायला मिळणार आहे. अप्पूला भाऊ नाही म्हणून ती उदास आहे. मात्र संपूर्ण कानेटकर कुटुंब एकत्र येऊन अप्पूला राखी बांधणार आहे. एकत्र कुटुंबाचं महत्त्व या विशेष भागाच्या निमित्ताने अधोरेखित होणार आहे.

रंग माझा वेगळामध्येही यंदा दीपिका कार्तिकीला राखी बांधून राखीपौर्णिमा साजरी करणार आहे. या दोघी जरी सख्या बहिणी असल्या तरी याची कल्पना दोघींनाही नाही. या दोघींची मैत्री मात्र घट्ट आहे. याच मैत्रीच्या नात्याने दीपिका कार्तिकीला राखी बांधणार आहे. दीपिका आणि कार्तिकी प्रमाणेच पिहू आणि स्वरा देखिल बहिणी आहेत. मात्र स्वराने आपली ओळख लपवल्यानंतर स्वराज म्हणूनच ती घरात वावरते. यंदाच्या राखीपौर्णिमेला पिहू स्वराजलाच भाऊ मानत त्याला राखी बांधणार आहे. रंग माझा वेगळा आणि तुझेच मी गीत गात आहे मालिकेतलं हे रक्षाबंधन निरागस प्रेमाची साक्ष देणारं आहे.

हे सुद्धा वाचा
View this post on Instagram

A post shared by Star Pravah (@star_pravah)

पिकींचा विजय असो मालिकेत पिंकी लग्नानंतरची पहिली राखीपौर्णिमा साजरी करणार आहे. पिंकी आणि तिचा भाऊ दिप्याचं नातं आपल्या परिचयाचं आहेच. लाडक्या बहिणीला नेहमी साथ देणारा दिप्या पिंकीला रक्षाबंधनाला काय गिफ्ट देणार याची उत्सुकता नक्कीच आहे. स्टार प्रवाह वाहिनीवरील मालिकांचं रक्षाबंधन विशेष भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत.

मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?
मंत्रिमंडळात 39 पैकी 20 नव्या चेहऱ्यांना संधी, बघा कोणाची लागली वर्णी?.
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन
प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं वयाच्या 73 व्या वर्षी निधन.
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?
महायुतीचा अखेर मंत्रिमंडळ विस्तार, कोणत्या जिल्ह्यात किती मंत्री?.
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'
अजित दादांनी आपल्याच मंत्र्यांचे टोचले कान, '... अन्यथा वेगळा निर्णय'.
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?
प्रचंड बहुमतानंतर बहुप्रतिक्षेत मंत्रिमंडळाचा विस्तार, कोणाची वर्णी?.
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.