KBC 12 Karamveer Special | ‘रणजितसिंह डिसले आणि ऊषा खरे’ कौन बनेगा करोडपतीमध्ये दिसणार!
कौन बनेगा करोडपती'च्या कर्मवीर एपिसोडमध्ये रणजितसिंह डिसले आणि ऊषा खरे दिसणार आहेत.
मुंबई : ‘कौन बनेगा करोडपती’च्या कर्मवीर एपिसोडमध्ये रणजितसिंह डिसले आणि ऊषा खरे दिसणार आहेत. उषा या मुलींना चांगली सुरक्षा कशी पुरवता येईल आणि त्यांना आपल्या पायावर कसे उभे करता येईल यावर काम करतात तर रणजितसिंह तंत्रज्ञान शिक्षणात आणले पाहिजे, अशी त्यांचा इच्छा आहे आणि त्यावर ते काम करतात. कौन बनेगा करोडपतीच्या नुकताच एक नवीन प्रोमो समोर आला आहे.(Ranjit Singh Disley and Usha khare will come in Kaun Banega Crorepati)
ज्यात उषा म्हणताना दिसत आहे की, जेंव्हा एक मुलगी शिकते त्यावेळी फक्त दोन घर बदलत नाहीत तर त्यांचा आसपासचे घर देखील बदलतात. रणजितसिंह म्हणतात की, शिक्षणात तंत्रज्ञान आणण्याची गरज आहे. हा प्रोमो शेअर करताना लिहले आहे ज्ञानाचा संदेश प्रत्येक घरात पोहोचविला आणि शिक्षणाने संपूर्ण देश बदलला. कर्मवीर रणजित आणि उषाची कहाणी जाणून घ्या. शुक्रवारी रात्री 9 वाजता.
View this post on Instagram
उषा आणि रणजित यांच्यासोबत कौन बनेगा करोडपतीच्या कर्मवीर एपिसोडमध्ये बोमन ईरानी देखील येणार आहेत. ते दोघांना चांगले पैसे जिंकण्यास मदत करतील. 2017 मध्ये उषा यांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. उषा यांनी सरकारी स्कूल हायटेक केले आहे. त्यांच्या शाळेतील मुली टॅबलेटच्या माध्यमातून अभ्यास करतात. शाळेचा संपूर्ण कोर्स टॅबलेटवर आहे. वृत्तानुसार, उषा ज्या शाळेत आहे त्या शाळेतील सुमारे 300 विद्यार्थ्यांना माइक्रोसॉफ्ट कंपनीकडून नोकरीच्या ऑफर मिळाल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकविणारे शिक्षक रणजितसिंह डिसले यांना तब्बल 7 कोटींच्या ‘ग्लोबल टीचर’ या पुरस्काराने सम्नानित करण्यात येणार आले. युनेस्को आणि लंडनस्थित वार्की फाऊंडेशन यांनी त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना हा पुरस्कार जाहीर केला आहे. 7 कोटी रकमेचा हा पुरस्कार युनेस्को आणि वर्की यांच्या संयुक्त विद्यमाने देण्यात आला होता.
रणजितसिंह डिसले यांना पुरस्कार जाहीर झाल्यानंतर संपूर्ण महाष्ट्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांनी पुरस्कारातील एकूण रकमेपैकी 50 टक्के रक्कम त्यांच्यासोबत नामांकन मिळालेल्या पहिल्या 9 शिक्षकांना देण्याची घोषणा त्यांनी केली आहे. त्यांच्या या घोषणेमुळे, 9 देशांतील हजारो मुलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देणाऱ्या 9 शिक्षकांचादेखील सन्मान होणार आहे. त्यांच्या या निर्णयाचे सर्वांनी स्वागत केले आहे. संबंधित बातम्या :
अरे व्वा..! जिल्हा परिषदेच्या शिक्षकाची युनेस्कोकडून दखल, तब्बल 7 कोटी रुपयांच्या पुरस्काराने सन्मान
जिल्हा परिषदांच्या शाळांना नावे ठेवणाऱ्यांना डिसले गुरुजी हेच उत्तर : दत्तात्रय भरणे
(Ranjit Singh Disley and Usha khare will come in Kaun Banega Crorepati)