Raju Srivastava | एक महिना उलटूनही राजू श्रीवास्तव यांना शुद्ध नाही, जाणून घ्या डॉक्टर नेमके काय म्हणाले…
10 आॅगस्ट रोजी राजू श्रीवास्तव यांना दिल्लीतील एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले. राजू यांना रूग्णालयात आणल्यापासून ते व्हेंटिलेटरवरच आहेत. मध्यंतरी बातम्या आल्या होत्या की, डाॅक्टरांनी राजू यांना व्हेंटिलेटरवरून काढले आहे.
मुंबई : कॉमेडियन राजू श्रीवास्तव (Raju Srivastava) यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा होत नसल्याने कुटुंबीय आणि चाहते चिंतेत आहेत. काही दिवसांपूर्वी राजू यांची तब्येत स्थिर असल्याचे डाॅक्टरांकडून (Doctor) सांगितले जात होते. मात्र, चार दिवसांपूर्वी माहिती मिळाली की, राजू यांना परत ताप आलायं. एका महिन्यात राजू यांना चार वेळा ताप आल्याने डाॅक्टरांनी चिंता व्यक्त केलीयं. बॉलिवूड (Bollywood) आणि टीव्ही इंडस्ट्रीमधील सर्वचजण राजू यांच्या चांगल्या तब्येतीसाठी प्रार्थना करतायेत. डॉक्टरांची संपूर्ण टीम राजू यांच्यावर उपचार करते आहे. राजू हे गेल्या 32 दिवसांपासून रूग्णालयात उपचार घेत आहेत.
एका महिन्यात चार वेळा आला राजू यांना ताप
10 आॅगस्ट रोजी राजू श्रीवास्तव यांना दिल्लीतील एम्स रूग्णालयात दाखल करण्यात आले. राजू यांना रूग्णालयात आणल्यापासून ते व्हेंटिलेटरवरच आहेत. मध्यंतरी बातम्या आल्या होत्या की, डाॅक्टरांनी राजू यांना व्हेंटिलेटरवरून काढले आहे. मात्र, रूग्णालयात दाखल करण्यात आल्यापासून अजून 1 वेळही राजू यांना व्हेंटिलेटरवरून काढण्यात न आल्याची माहिती स्वत: राजू यांच्या कुटुंबियांकडून देण्यात आलीयं.
चाहत्यांकडून राजू श्रीवास्तव यांच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना सुरू
राजू श्रीवास्तव यांची तब्येत चांगली व्हावी, याकरिता त्यांचे चाहते प्रार्थना करत आहेत. 10 ऑगस्ट रोजी राजू श्रीवास्तव यांना हृदयविकाराचा झटका आला. त्यावेळी ते जिममध्ये व्यायाम करत होते. त्यानंतर राजू यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले. दोन दिवसांपूर्वी अभिनेते शत्रुघ्न सिन्हा यांनी राजू श्रीवास्तव यांची तब्येत ठिक व्हावी अशाप्रकारची एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती.