Dance Deewane 3च्या मंचावर रेखाचे ठुमके पाहून अवाक् झाली माधुरी दीक्षित, पाहा व्हिडीओ

यंदाच्या आठवड्यात ‘डान्स दिवाने 3’ या रियॅलिटी शोच्या मंचावर बराच ड्रामा पाहायला मिळणार आहे. या आठवड्यात दिग्गज अभिनेत्री रेखा या शोमध्ये येणार आहे.

Dance Deewane 3च्या मंचावर रेखाचे ठुमके पाहून अवाक् झाली माधुरी दीक्षित, पाहा व्हिडीओ
रेखा-माधुरी
Follow us
| Updated on: Jul 17, 2021 | 6:52 PM

मुंबई : यंदाच्या आठवड्यात ‘डान्स दिवाने 3’ या रियॅलिटी शोच्या मंचावर बराच ड्रामा पाहायला मिळणार आहे. या आठवड्यात दिग्गज अभिनेत्री रेखा या शोमध्ये येणार आहे. शोमध्ये रेखाचे आगमन झाल्यावर स्टेजची चमक आणखीनच वाढणार आहे. त्याचबरोबर रेखा येथे सादरीकरण देखील करणार आहे. ज्यामुळे हा भाग प्रेक्षकांसाठी विशेष पर्वणी असणार आहे. काही काळापूर्वी या कार्यक्रमाचा टीझर रिलीज करण्यात आला होता, ज्यामध्ये रेखा डान्स करताना दिसत आहे (Rekha Dance Performance on Dance Deewane 3 reality show).

या शोच्या मंचावर रेखा व्हाईट ड्रेसमध्ये नृत्य करताना दिसणार आहे. जिथे अभिनेत्री तिचं सुपरहिट गाणं ‘सलामे इश्क मेरी जान’ सादर करणार आहे. अभिनेत्रीच्या या डान्स व्हिडीओचा छोटासा टीझर चॅनेलच्या टीमने प्रसिद्ध केला आहे. ज्यामध्ये रेखाची स्टाईल खूप खास दिसत आहे.

पाहा व्हिडीओ :

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

या वयातही अभिनेत्रीमधील अशी आश्चर्यकारक ऊर्जा पाहून चाहते आणखी दिवाने झाले आहेत. अभिनेत्रीचे वय 66 आहे, परंतु तिच्या डान्सिंग शैलीकडे पाहता, असे वाटते की ती अजूनही 30 वर्षांचीच आहे. या व्हिडीओमध्ये असे दाखवण्यात आले आहे की, रेखाला या मंचावर नृत्य करताना पाहून सर्व परीक्षक आणि स्पर्धक भावूक होतात. अभिनेत्रीची ही शैली तिला इतरांपेक्षा वेगळी बनवते.

अमित माझं प्रेम!

अभिनेत्रीने सेटवर ‘सिलसिला’चा एक एपिक सीन पुन्हा तयार केला, ज्यात तिला सेटवर अभिनेत्री माधुरी दीक्षितने साथ दिली. या व्हिडीओत रेखा म्हणाली की, ‘अमित हे माझे प्रेम आहे आणि प्रेम कधीच विसरले जात नाही.’ या व्हिडीओमध्ये आपण माधुरी दीक्षितला जया बच्चनची भूमिका साकारताना पाहत आहोत, तर रेखा तिच्या शेजारी उभी आहे आणि न थांबता संपूर्ण सीन पूर्ण करते. या शोच्या प्रोमोमध्ये आम्ही ‘देखा एक ख्वाब’ चित्रपटाचे प्रसिद्ध गाणे देखील ऐकू शकतो.

पाहा व्हिडीओ :

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

(Rekha Dance Performance on Dance Deewane 3 reality show)

हेही वाचा :

आरोग्याचे नियम पाळून शिस्तबद्ध रीतीने चित्रीकरण करावे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निर्देश!

Video | तब्बल 1200 किलोमीटरचा सायकल प्रवास करून चाहता सोनू सूदच्या भेटीला, पाहा अभिनेत्याने कसे केले स्वागत…

ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर
ठाण्यात टीएमटी बसेस बंद, नेमकं झालं काय? कर्मचारी उतरले रस्त्यावर.
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला
'...नाहीतर फडणवीस जेलमध्ये टाकतील', नाराज भुजबळांना जरांगे यांचा सल्ला.
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?
उद्धव ठाकरे नागपुरात फडणवीसांच्या भेटीला, दोघांत काय झाली चर्चा?.
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?
'...पाया पडतो', विधानभवन परिसरात ठाकरे अन् दरेकरांमध्ये मिश्किल संवाद?.
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप
'...पण माझी अवहेलना, मंत्रिपद कोणी नाकारलं हे शोधणारच',भुजबळांचा संताप.
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.