गोठ्यात आसरा मिळालेल्या रूपालीला पहाटे 3 वाजता उठून अंघोळ करावी लागायची! वाचा ‘आई कुठे काय करते’च्या संजनाबाद्द्ल…  

रुपाली भोसलेने आपल्या आयुष्यरूपी पुस्तकातील हे एक दुःखद घटनांनी आणि अनुभवाने भरलेलं हे पान स्वप्नील जोशीच्या ‘शेअर विथ स्वप्नील’ या रेडीओ शोमध्ये उलगडलं. यावेळी तिने आपल्या आयुष्यातील काही महत्वाच्या घटनांना उजाळा दिला.

गोठ्यात आसरा मिळालेल्या रूपालीला पहाटे 3 वाजता उठून अंघोळ करावी लागायची! वाचा ‘आई कुठे काय करते’च्या संजनाबाद्द्ल...  
रुपाली भोसले
Follow us
| Updated on: Aug 06, 2021 | 9:29 AM

मुंबई : ‘बिग बॉस मराठी’च्या दुसऱ्या सिझनमुळे चर्चेत आलेली अभिनेत्री रुपाली भोसले (Rupali Bhosle) सध्या ‘आई कुठे काय करते!’ मालिकेत खलनायिकेची भूमिका साकारत आहे. अनिरुद्ध आणि अरुंधती यांच्या संसारात बिब्बा घालणाऱ्या संजनाची व्यक्तिरेखा ती खुबीने निभावत आहेत. आजमितीला अभिनेत्री रुपाली भोसले यशाच्या शिखरावर आहे. मात्र, तिच्या आयुष्यात एक काळ असा होता, जेव्हा तिला आणि तिच्या कुटुंबाला अक्षरशः गुरं बांधण्याच्या ठिकाणी राहवं लागलं होतं.

रुपाली भोसलेने आपल्या आयुष्यरूपी पुस्तकातील हे एक दुःखद घटनांनी आणि अनुभवाने भरलेलं हे पान स्वप्नील जोशीच्या ‘शेअर विथ स्वप्नील’ या रेडीओ शोमध्ये उलगडलं. यावेळी तिने आपल्या आयुष्यातील काही महत्वाच्या घटनांना उजाळा दिला.

एका स्कीममुळे आयुष्य उध्वस्त झालं!

रूपालीचा जन्म मुंबईचाच! वरळीच्या बीडीडी चाळीत रूपालीचं बालपण गेलं. इतर मुलान्प्रनामेच रूपालीला देखील खूप शिकायची इच्छा होती. पण नियतीच्या मनात काही वेगळंच होतं. रुपाली इयत्ता नववीत असताना तिच्या काकाने एका स्कीमच्या नावाने तिच्या वडिलांकडे होते नवहते तितके सगळे पैसे नेले. या स्कीममध्ये तिच्या काकाला तर अटक झाली, मात्र रूपालीचं संपूर्ण कुटुंब रस्त्यावर आलं. हातात असलेले पैसे संपले, अन्नाची भ्रांत अशावेळी रूपालीला इयत्ता नववीतच शिक्षण सोडावं लागलं. इथूनच तिच्या आयुष्यातील तो वाईट काळ सुरु झाला होता.

भर पावसात रस्त्यावर राहिले

अशावेळी तिच्या काकीने घर विकून तिच्याकडे येऊन राहण्याचा सल्ला दिला. रुपालीच्या कुटुंबाला तो पटला आणि त्यांनी आपलं रहातं घर विकलं. मात्र, त्या काकीने देखील त्यांना धोका दिला. त्यांच्याकडील पैसे घेऊन तिने रुपालीच्या संपूर्ण कुटुंबाला भर पावसात घराबाहेर काढलं. अशावेळी रुपाली आणि तिच्या लहानग्या भावाला घेयून तिचे आई-वडील रस्त्याच्या आडोश्याला आश्रयाला गेले. मुलं भिजू नयेत म्हणून आईने दोघांच्या डोक्यावर ताडपत्री धरली होती. याचा काळात रुपालीच्या आईला 2 वेळा हृदयविकाराचा झटका येऊन गेला.

गोठ्यात मिळाला आश्रय

रुपाली आणि तिच्या कुटुंबाची वाताहत तिच्या वडिलांच्या एका मित्राला कळली. त्याने या संपूर्ण कुटुंबाला त्याच्या घरी नेलं. मात्र, त्याच कुटुंब आधीच मोठं असल्याने थोडीशी अडचण निर्माण झाली होती. तरीही एक रात्र या मित्राने आणि त्यांच्या कुटुंबाने या कुटुंबाचा सांभाळ केला. दुसऱ्या दिवशी त्याच मित्राच्या ओळखीने एक छोटी पत्र्याची खोली भोसले कुटुंबियांना मिळाली. या खोलीत पहिला गुरे बांधली जात होती. पत्र्याच्या भिंती असलेल्या या घरात आश्रय तर मिळाला, पण भितींना बरीच छिद्र पडलेली होती. या छिद्रातून आता डोकावून पाहिलं जायचं. याचमुळे रूपालीला पहाटे 3-3:30 वाजता उठून काळोखात अंघोळ करावी लागायची.

दरम्यान एकदा रुपालीच्या भावाच्या मनात आत्महत्येचा विचार आला तो ऐकून रुपाली प्रचंड घाबरली. तिने गोरेगावमध्ये एक छोटीशी नोकरी करायला सुरुवात केली. महिनाकाठी अडीच हजार पगार मिळायचा यात कुटुंबाचा उदरनिर्वाह होत होता.

मी नाही शिकले, तू शिक!

रुपाली म्हणते, मला खूप शिकून मोठं व्हायचं होतं, पण तसं झालं नाही. मात्र, मी माझ्या भावाला आजही सांगते की तू तुला हवं तेवढं आणि हवं ते शिक! आता पुन्हा आपल्याला जुन्या दिवसांचा विचार देखील करायचा नसल्याचे रुपाली भोसले सांगते.

(Rupali Bhosle who was sheltered in the barn, had to get up at 3 in the morning and take a bath know her life journey)

हेही वाचा :

इतकी बदलली की ओळखू देखील येईना! पाहा ‘बेल बॉटम’मध्ये कसं बदललं लारा दत्ताचं रूपडं…

एव्हरग्रीन चित्रपटाची 27 वर्षे, जाणून घ्या ‘हम आपके हैं कौन’च्या खास गोष्टी

कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.