Rutuja Bagwe: किचनमध्ये काम करताना गरम पदार्थ अंगावर पडल्याने अभिनेत्री ऋतुजा बागवे जखमी

स्वयंपाकघरात काम करताना गरम पदार्थ अंगावर उडाल्याने अभिनेत्री (Marathi Actress) ऋतुजा बागवे (Rutuja Bagwe) जखमी झाली आहे. मिक्सरमध्ये गरम पदार्थाचं वाटप करताना अचानक ते पदार्थ अंगावर उडालं आणि त्यामुळे ऋतुजाच्या मानेजवळ आणि चेहऱ्यावर भाजलं (Burns) गेलं.

Rutuja Bagwe: किचनमध्ये काम करताना गरम पदार्थ अंगावर पडल्याने अभिनेत्री ऋतुजा बागवे जखमी
Rutuja BagweImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 4:46 PM

स्वयंपाकघरात काम करताना गरम पदार्थ अंगावर उडाल्याने अभिनेत्री (Marathi Actress) ऋतुजा बागवे (Rutuja Bagwe) जखमी झाली आहे. मिक्सरमध्ये गरम पदार्थाचं वाटप करताना अचानक ते पदार्थ अंगावर उडालं आणि त्यामुळे ऋतुजाच्या मानेजवळ आणि चेहऱ्यावर भाजलं (Burns) गेलं. याविषयी खुद्द ऋतुजाने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत माहिती दिली. तिने इन्स्टा स्टोरीमध्येही भाजलेल्या खुणांचा फोटो पोस्ट केला होता. “मला स्वयंपाकाची खूप आवड आहे. मी नेहमीच विविध पदार्थ बनवत असते. त्यादिवशी एका पदार्थासाठी मी मिक्सरमध्ये वाटण वाटत होते. मिक्सर चालू असतानाच त्यातील गरम पदार्थ माझ्या हातावर आणि मानेवर उडालं. सुदैवाने माझ्या चेहऱ्यावर जे शिंतोडे उडाले होते, त्याचे डाग राहिले नाहीत. पण मानेवरील आणि हातावरील भाजल्याच्या खुणा तशाच आहेत”, असं तिने सांगितलं.

‘ई टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत ऋतुजा पुढे म्हणाली, “अभिनेत्री असल्याने माझ्यासाठी माझा चेहरा खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे जेव्हा गरम पदार्थाचे शिंतोडे माझ्या चेहऱ्यावर उडाले, तेव्हा मी खूप घाबरले होते. पण आता मला चांगलीच शिकवण मिळाली आहे. त्यामुळे भविष्यात मी स्वयंपाकघरात काम करताना योग्य ती काळजी घेईन. मी स्वत:ची चांगली काळजी घेत आहे. मानेवर आणि हातावर भाजल्याच्या खुणा अजूनही दिसत आहेत. अनन्या या नाटकाच्या शूटिंगदरम्यान स्टेजवर माझा पायसुद्धा भाजला होता. मात्र अशा घटनांनी घाबरून न जाता मी आता त्यांना सामोरं जायला शिकले आहे.”

दुखापतीमुळे ऋतुजाने कामातून ब्रेक घेतला असून पुढील दोन-तीन दिवसांत ती पुन्हा शूटिंगला सुरुवात करणार आहे. ऋतुजाचं ‘अनन्या’ हे नाटक सध्या चांगलंच गाजतंय. या नाटकात तिने दिव्यांग तरुणीची भूमिका साकारली आहे.

हेही वाचा:

Aai Kuthe Kay Karte: ‘आई कुठे काय करते’च्या शूटिंगदरम्यान रुपाली भोसलेला दुखापत

“हे समीकरण ज्यांना कळत नाही तिथेच..”; 11 लाखांच्या पैठणीवरून ट्रोल करणाऱ्यांना आदेश बांदेकरांचं सडेतोड उत्तर

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.