मुंबई : छोट्या पडद्यावरील ‘सहकुटुंब सहपरिवार’ ही मालिका घराघरांत पहिली जाते. या मालिकेतील पात्रांनी त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. नेहमी एकत्र राहणारं कुटुंब आणि त्यांच्यातील प्रेम असा आशय असणारी मालिकेची कथा प्रेक्षकांना खूप भावली आहे. मात्र, आता या मालिकेतील एका अभिनेत्रीने सर्व सहकलाकारांवर गंभीर आरोप केले आहेत. मालिकेत ‘आई’ची भूमिका साकारणाऱ्या यांनी मालिकेतील सहकलाकार आणि निर्माते यांच्या विरोधात तक्रार दाखल केली आहे.
अभिनेत्री अन्नपूर्णा विठ्ठल यांनी मालिकेत ‘आई’ची भूमिका साकारली होती. अभिनेत्रीने या मालिकेतील कलाकारांविरोधात तक्रार दाखल केली आहे. त्यांनी आपल्या युट्यूब चॅनेलवर व्हिडीओ पोस्ट करत याची माहिती दिली आहे.
अन्नपूर्णा या व्हिडीओत म्हणाल्या की, ‘मी अमराठी कलाकार असल्यामुळे मला सेटवर सतत त्रास दिला गेला. त्यांनी दिलेला त्रास सहन न झाल्यामुळे मला मालिका सोडावी लागली. मात्र, मालिका सोडल्यानंतर त्यांनी मला मालिकेतून काढलं अशी चर्चा सगळीकडे पसरविण्यात आली.’
या व्हिडीओत त्यांनी अभिनेता सुनील बर्वे, अभिनेत्री नंदिता पाटकर, किशोरी आंबिये यांच्यावरही आरोप केले आहेत. या कलाकारांनी मला मानसिक त्रास दिला. इतकेच नव्हेतर त्यांनी माझं रॅगिंग केलं, असं देखील अन्नपूर्णा म्हणाल्या. दिग्दर्शक देखील सेटवर मला घालून पाडून बोलायचे, म्हातारी म्हणायचे, असे त्या म्हणाल्या.
अभिनेत्री अन्नपूर्णा विठ्ठल या मागील एक वर्षापासून ‘सहकुटुंब सहपरिवार’ या मालिकेत काम करत होत्या. त्यांची ही पहिलीच मराठी मालिका होती. त्यांनी आपल्या कारकीर्दीमध्ये अनेक बहुभाषिक मालिकांमध्ये काम केले होते. मात्र, या मलिकेत मला इतका त्रास दिला गेला की, त्यामुळे मी डिप्रेशनमध्ये गेल्याचं त्या सांगतात. एका आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीला इतका त्रास त्यांनी दिला, त्यांना देखील असा त्रास होईल, असं त्या म्हणाल्या.
अभिनेत्रीने मालिकेच्या निर्मात्याच्या विरोधात मानसिक त्रास आणि छळ केल्याबद्दल तक्रार दाखल केली आहे. दादर पोलीस ठाण्यात 22 नोव्हेंबरला याबाबत लेखी तक्रार दाखल करण्यात आली आहे. मात्र, या संपूर्ण प्रकरणानंतर मालिकेकडून किंवा कोणत्याही कलाकारांकडून कोणतेही प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आलेली नाही.
उफ्फ तेरी अदा…मौनी रॉयने सोशल मीडियावर शेअर केले ‘इनसाइड द बेडरूम’ फोटो!