शर्लिन चोप्रा हिने ‘राखी सावंत’ला दिले जोरदार प्रतिउत्तर, म्हणाली शरीर…
इतकेच नाही तर शर्लिनने सोशल मीडियावरही साजिद खान विरोधात मोहिम सुरू केलीये.
मुंबई : बिग बॉस 16 च्या घराबाहेर सध्या मोठा वाद सुरू आहे. साजिद खान याला बिग बाॅसच्या घराबाहेर काढण्यासाठी अभिनेत्री शर्लिन चोप्रा पोलिस स्टेशनमध्ये सारख्या चक्कर मारत आहे. इतकेच नाही तर शर्लिनने सोशल मीडियावरही साजिद खान विरोधात मोहिम सुरू केलीये. शर्लिन हिने साजिदवर लैंगिक शोषणाचा आरोप केला आहे. लवकरात लवकर साजिद खान याला बिग बाॅसच्या घराबाहेर बघण्याची शर्लिनची इच्छा आहे.
साजिद खान आणि शर्लिन चोप्राच्या या वादामध्ये राखी सावंत हिने उडी घेतलीये. काही दिवसांपूर्वी साजिद खान निर्दोष असल्याचे राखी सावंत म्हणाली आणि यादरम्यान तिने शर्लिनवर अनेक आरोपही केले. इतकेच नाही तर शर्लिनला असे आरोप करताना लाज वाटायला हवी, असेही राखी म्हणाली होती.
राखीने शर्लिन चोप्रा हिच्यावर केलेल्या आरोपाचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. राखीच्या आरोपांवर आता शर्लिन चोप्राने ही जोरदार प्रतिउत्तर देत राखीचा चांगलाच समाचार घेतलाय. शर्लिन म्हणाली की, राखी सावंत दर तीन ते चार महिन्यामध्ये बॉयफ्रेंड्स बदलते आम्ही कधी काही बोलतो का? मी असा विचार करते की, ते तिचे खासगी आयुष्य आहे.
शर्लिन पुढे म्हणाली की, जर तुझा भाऊ साजिद खान निर्दोष असेल तर तपास होऊ दे ना…काय प्राॅब्लेम आहे…मी अशी आणि मी तशी आहे हे बोलायचेच कशासाठी…पापाराझींना शर्लिन म्हणते की, जर एखादी महिला तिचे शरीर दाखवते म्हणणे तिच्यावर रेप व्हायला पाहिजे का? आता शर्लिनच्या टिकेनंतर राखी सावंत काय उत्तर देते हे बघण्यासारखे ठरणार आहे.