Bigg Boss 16 | शालिनचे हे गैरवर्तन पाहून भाईजानचा पारा चढला…

बिग बॉसच्या मंच्यावर सलमान खान शालिनवर प्रचंड चिडल्याचे दिसत आहे. वीकेंड का वारमध्ये सलमान खान शालिनचा क्लास घेताना दिसणार आहे.

Bigg Boss 16 | शालिनचे हे गैरवर्तन पाहून भाईजानचा पारा चढला...
Follow us
| Updated on: Oct 15, 2022 | 9:12 AM

मुंबई : बिग बॉस 16 (Bigg Boss 16) चांगलेच रंगात आले असून आरोप-प्रत्यारोपाचे सत्र सुरूच आहे. मात्र, यादरम्यान शालिनमुळे मोठा वाद निर्माण झालाय. बिग बॉसच्या घराच चेक करण्यासाठी आलेल्या डाॅक्टरसोबत शालिनने गैरवर्तन केल्याने सोशल मीडियावर (Social media) संतापाची लाट निर्माण झालीये. त्यामध्येच आता सलमान खानने (Salman Khan) देखील शालिनचा चांगलाच समाचार घेतलाय. इतकेच नाही तर रागामध्ये सलमानने आपले जॅकेट देखील काढून टाकले. शालिन सलमान खानला बोलण्याचा प्रयत्न करतो, त्यावेळी सलमान त्याला म्हणतो की, मला शर्ट काढण्याची वेळ नको येऊ देऊ तू, काहीच बोलू नकोस.

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

बिग बॉसच्या मंच्यावर सलमान खान शालिनवर प्रचंड चिडल्याचे दिसत आहे. वीकेंड का वारमध्ये सलमान खान शालिनचा क्लास घेताना दिसणार आहे. गेल्या काही दिवसांपासून शालिन तीन टाईम चिकन खाण्यासाठी मागतोय. तसेच बिग बॉसने सर्व घरातील सदस्यांसाठी चिकन पाठवले असूनही शालिन सर्वांना सांगतोय की, फक्त आणि फक्त माझ्यासाठीच बिग बॉसने चिकन पाठवले आहे आणि तो मी एकटाच तीन वेळा खाणार आहे. माझ्या हेल्थसाठी डाॅक्टरांनी मला चिकन खायला सांगितल्याचे शालिन म्हणतो.

बिग बॉसच्या घरात शालिन इतर सदस्यांना बिग बॉसने दिलेले चिकन खाऊ देत नसल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. माझ्या हेल्थसाठी मला चिकन बिग बॉसने दिले असे शालिन खोटे सांगत होता. यावर बिग बॉसने देखील शालिनला समजवण्याचा प्रयत्न केला. यानंतर बिग बॉसने शालिनचे हेल्थ चेकअप करण्यासाठी घरामध्ये एका डाॅक्टरांना पाठवले. मात्र, यावेळी शालिनने डाॅक्टरांसोबत चुकीचा व्यवहार करत. त्यांची पदवी मागत त्यांना चुकीच्या काही गोष्टी बोलल्या.

शालिनने ज्यापध्दतीने डाॅक्टरांसोबत व्यवहार केला. तो व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होत असून शालिनविरोधात संतापाची लाट निर्माण झाली. शालिनने स्वत:ची चोरी लपवण्यासाठी डाॅक्टरांसोबत गैरवर्तन केले आणि  हेल्थ चेकअप देखील करू दिले नाही. याचप्रकरणात सलमान खानने देखील शालिनचा चांगलाच क्लास घेत म्हटले की, कोरोनाच्या काळात आपल्या जीवाची पर्वा न करता डॉक्टरांनी लोकांचे प्राण वाचवले आणि तू त्यांच्यासोबत असा व्यवहार करतोय.

'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
'संजय राऊतांना लवकर उपरती आली', एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल.
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम
'..तर तुझ्या घरालाच टाळं ठोकू', राणेंनी ठाकरे गटाच्या नेत्याला भरला दम.
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?
'भिकार साले...', लक्ष्मण हाकेंच्या धमकीवर जरांगे नेमकं काय म्हणाले?.
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया
'तेव्हापासूनच संतोष देशमुख अस्वस्थ अन् भिती...', पत्नीच्या प्रतिक्रिया.
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले...
जरांगेंकडून लक्ष्मण हाकेंना धमकी, थेट व्हिडीओ शेअर करत म्हणाले....
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?
बायको सोबत होती म्हणून वाचला जीव, नाहीतर...., वसईत नेमकं काय घडलं?.
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली
धनंजय देशमुखांचे आंदोलन मागे, अखेर 4 तासांनंतर टाकीवरून उतरले खाली.
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या
'प्लीज खाली या..', जरांगेंनंतर SP कॉवत यांच्याकडून देशमुखांना विनवण्या.
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन
'...तर यांचं जीनं मुश्किल करेन', जरांगेंचा धनंजय देशमुखांना थेट फोन.
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ
संतोष देशमुखांना हत्येच्या महिनाभर आधी धमकी, पत्नीच्या जबाबानंतर खळबळ.