Bigg Boss 15 : जंगलात डासांना पळवताना दिसला सलमान खान, यावेळी स्पर्धकांचा जंगलापासून सुरू होईल प्रवास ?

कलर्स वाहिनीनं शेअर केलेल्या पहिल्या शोच्या प्रोमोमध्ये प्रेक्षकांना कल्पना आली की यावेळी बिग बॉस 15 ची थीम जंगल असणार आहे. दरम्यान, आता नवीन प्रोमो पाहिल्यावर कळतंय की आगामी हंगाम किती मनोरंजक असणार आहे. (Salman Khan was seen fleeing mosquitoes in the forest, this time the journey of the contestants will start from the forest?)

Bigg Boss 15 : जंगलात डासांना पळवताना दिसला सलमान खान, यावेळी स्पर्धकांचा जंगलापासून सुरू होईल प्रवास ?
Follow us
| Updated on: Sep 12, 2021 | 11:37 AM

मुंबई : बिग बॉसच्या (Bigg Boss 15) आगामी सीझन 15 ची प्रेक्षक आतुरतेनं वाट पाहत आहेत, मात्र सर्वात जास्त प्रतीक्षा ही सलमान खानला पुन्हा एकदा त्याच्या स्वतःच्या अनोख्या पद्धतीत होस्ट करताना पाहण्याची आहे. आता, कलर्स वाहिनीनं शेअर केलेल्या पहिल्या शोच्या प्रोमोमध्ये प्रेक्षकांना कल्पना आली की यावेळी बिग बॉस 15 ची थीम जंगल असणार आहे. दरम्यान, आता नवीन प्रोमो पाहिल्यावर कळतंय की आगामी हंगाम किती मनोरंजक असणार आहे.

शोच्या नवीन प्रोमोमध्ये सलमान खान शोची झलक दाखवत आहे की स्पर्धकांना येथे आल्यानंतर कोणत्या अडचणींना सामोरे जावं लागेल. प्रोमो व्हिडीओमध्ये सलमानला असं म्हणतो की, जागं होण्यासाठी आणि छेडण्यासाठी जागा आहे, मात्र झोपण्याची सोय कुठे आहे विश्वसुंदरी… एक वृक्ष असलेल्या विश्वसुंदरला ज्येष्ठ अभिनेत्री रेखा यांनी आवाज दिला आहे. सलमानच्या बोलण्यावर, विश्वसुंदरी म्हणते की आपण आपल्या सावलीत झोप कशी येणार आणि या जंगलाती थंड वारा तुम्हाला नेहमीच त्रास देत राहिल.

स्पर्धकांचा प्रवास सुरू होईल जंगलापासून…

रेखा आणि सलमान खानचे शब्द ऐकल्यानंतर, असा अंदाज लावला गेला आहे की यावेळी स्पर्धकांना बिग बॉसच्या आलिशान घरात गेल्या 14 हंगामात मिळालेला कम्फर्ट झोन मिळणार नाही. शोचा प्रोमो खूपच वेगळा आहे, ज्यामुळे प्रेक्षकांना शोसाठी खूप उत्सुकता आहे. हा प्रोमो शेअर करताना कलर्स वाहिनीनं कॅप्शनमध्ये लिहिलं – यावेळी बिग बॉस 15 चे ‘Suffer’ जंगलापासून सुरू होईल. यासाठी तुम्ही किती उत्साहित आहात?

पाहा व्हिडीओ

View this post on Instagram

A post shared by ColorsTV (@colorstv)

बिग बॉस 15 च्या या प्रोमोवर प्रेक्षक आणि सेलिब्रिटींच्या प्रतिक्रियाही पाहायला मिळत आहेत. बिग बॉसची माजी स्पर्धक अर्शी खाननं लिहिलं प्रोमो काय आहेत… त्याच वेळी, काही वापरकर्ते त्यांचा आवडता स्टार सलमान खानला पुन्हा एकदा शो होस्ट करताना पाहून खूप उत्साहित आहेत. अनेक वापरकर्त्यांनी असं लिहिलं आहे की, सलमान खानशिवाय दुसरा कोणीही हा शो होस्ट करू शकत नाही. अशाप्रकारे सलमान आणि बिग बॉसचे चाहते शोच्या नवीन प्रोमोवर आपली प्रतिक्रिया देत आहेत.

सलमान खान गेल्या अनेक सीझनपासून हा शो होस्ट करत आहे, पण रेखा पहिल्यांदाच या शो सोबत जोडली गेली आहे. रेखा बिग बॉसमध्ये सामील झाल्यामुळे खूप आनंदी आहे. रिपोर्ट्सनुसार, या नवीन अनुभवाबद्दल बोलताना रेखा म्हणाली की बिग बॉस हा एक अतिशय अनोखा शो आहे. यात नाटक, अॅक्शन, मजा आणि थरार आहे. या नवीन अनुभवासाठी मी खूप उत्साहित आहे. मी एका झाडासाठी आवाज देत आहे ज्याला सलमाननं प्रेमानं विश्वसुंदरी असं नाव दिलं आहे. सलमानसोबत काम करताना नेहमीच मजा येते. मला आनंद आहे की मी या शोच्या माध्यमातून एक वेगळा क्षण शेअर करणार आहे.

संबंधित बातम्या

Ganpati Visarjan: जल्लोष आणि उत्साहात बाप्पाला निरोप… शिल्पा शेट्टीच्या घरी दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन, पाहा खास फोटो

KBC 13: फराह खाननं सांगितली आयांशला 16 कोटीच्या इंजेक्शनची गरज, अमिताभ बच्चन यांनी शो दरम्यान केलं गुप्तदान

मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल
मस्साजोगमधील सरपंच हत्या प्रकरण : 'त्या' दोघांच्या भेटीचं CCTV व्हायरल.
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट
अजित पवार नॉट रिचेबल, भास्कर जाधवांनी कारण देत केला मोठा गौप्यस्फोट.
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण
छगन भुजबळ राज्यपाल होणार? भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य अन् चर्चांना उधाण.
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य
'...तर शिंदे माझे मंत्रिपद काढू शकतात', उदय सामंत यांचं मोठं वक्तव्य.
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?
नाही लाल दिवा, आम्ही जातो आमच्या गावा; मंत्रिपद हुकल्यानं कोण नाराज?.
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?
श्रीरामाच्या घोषणा,जीवाला धोका रात्री 3.30 वाजता अंधारेंसोबत काय झालं?.
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड
थर्टी फस्ट पार्टीसाठी किल्ल्यांवर जाताय? पण असं वागाल तर १ लाखांचा दंड.
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली
भाजपच्या या 4 नेत्याचं सत्तेत कमबॅक, लालदिव्याची प्रतीक्षा अखेर संपली.
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.