संदीप खरे यांच्या मुलीचं टीव्हीवर पदार्पण; ‘या’ नव्या मालिकेत साकारतेय महत्त्वपूर्ण भूमिका

प्रसिद्ध कवी संदीप खरे (Sandeep Khare) आणि सलील कुलकर्णी या जोडीने 'आयुष्यावर बोलू काही' या कार्यक्रमातून रसिकांच्या मनात घर केलं. 'अग्गोबाई ढग्गोबाई', 'तुझ्यावरच्या कविता', 'आरस्पानी' या त्यांच्या कवितासंग्रह फार प्रसिद्ध आहेत. संदीप खरे हे सोशल मीडियावर सक्रिय असून त्यावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात असतात.

संदीप खरे यांच्या मुलीचं टीव्हीवर पदार्पण; 'या' नव्या मालिकेत साकारतेय महत्त्वपूर्ण भूमिका
Sandeep Khare, Rumani KhareImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Mar 20, 2022 | 5:26 PM

प्रसिद्ध कवी संदीप खरे (Sandeep Khare) आणि सलील कुलकर्णी या जोडीने ‘आयुष्यावर बोलू काही’ या कार्यक्रमातून रसिकांच्या मनात घर केलं. ‘अग्गोबाई ढग्गोबाई’, ‘तुझ्यावरच्या कविता’, ‘आरस्पानी’ या त्यांच्या कवितासंग्रह फार प्रसिद्ध आहेत. संदीप खरे हे सोशल मीडियावर सक्रिय असून त्यावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात असतात. आता संदीप खरे यांची लाडकी लेक रुमानी (Rumani Khare) ही टीव्हीवर पदार्पण करण्यास सज्ज झाली आहे. यानिमित्त त्यांनी फेसबुकवर पोस्ट लिहिली आहे. आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद तिच्याही पाठीशी सदैव राहू देत, असं त्यांनी या पोस्टमध्ये म्हटलंय. झी मराठी वाहिनीवर (Zee Marathi) नवी मालिका सुरू होतेय. याच मालिकेत रुमानी महत्त्वपूर्ण भूमिका साकारतेय. या पोस्टमध्ये संदीप खरेंनी त्यांच्या मुलीचे काही फोटोसुद्धा पोस्ट केले आहेत.

संदीप खरे यांची पोस्ट-

‘लाडकी लेक रुमानी आज टीव्हीवर पदार्पण करतेय, एका छान भूमिकेतून. आजपासून सुरू होत असलेल्या एका नव्या मराठी मालिकेतून. तू तेव्हा अशी, झी मराठीवर आज रात्री 8 वाजता. तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा. आपल्या शुभेच्छा आणि आशीर्वाद तिच्याही पाठीशी सदैव राहू देत, हीच प्रार्थना,’ अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे.

रुमानीला अभिनयाची फार आवड आहे. 2012 मध्ये प्रदर्शित झालेल्या श्रीरंग गोडबोले दिग्दर्शित ‘चिंटू’ आणि 2013 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चिंटू 2’ या चित्रपटांमध्ये रुमानी झळकली होती. बालकलाकार म्हणून तिने काम केलं होतं. अभिनयासोबतच तिला नृत्याचीही फार आवड आहे. रुमानीने कथ्थकचं प्रशिक्षण घेतलं आहे. 2019 मधील ‘आई पण बाबा पण’ या नाटकात तिने महत्त्वाची भूमिका साकारली होती.

तू तेव्हा तशी या मालिकेतून स्वप्नील जोशी आणि शिल्पा तुळसकर ही जोडी पहिल्यांदाच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत प्रेक्षकांचा अजून एक आवडता चेहरा एका महत्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री अभिज्ञा भावे ही टेलिव्हिजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री आहे. अनेक वेगवेगळ्या भूमिकांमधून अभिज्ञाने प्रेक्षकांचं मनोरंजन केलं आहे. तू तेव्हा तशी या मालिकेतून देखील अभिज्ञा छोट्या पडद्यावर पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या मालिकेत अभिज्ञा प्रेक्षकांना पुष्पावल्लीच्या भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा:

साऊथ सुपरस्टार्सची स्टॅच्यू ऑफ युनिटीला भेट; राजामौलींच्या RRRचं जोरदार प्रमोशन

Kajol खरंच तिसऱ्यांचा प्रेग्नंट आहे का? जाणून घ्या काय आहे सत्य..

बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्यe अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...