‘एक महानायक- डॉ. बी. आर. आंबेडकर’ मालिकेत महत्त्वाचा अध्याय; सयाजीराव गायकवाड भीमरावांना देणार शिष्यवृत्ती

एण्‍ड टीव्‍हीवरील 'एक महानायक – डॉ. बी. आर. आंबेडकर' (Ek Mahanayak Dr B R Ambedkar) या मालिकेने आंबेडकर जयंतीवर आधारित स्‍पेशल एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला आणला. आता मालिकेमध्‍ये महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्‍या प्रवेशासह महत्त्वपूर्ण एपिसोड पाहायला मिळणार आहे.

'एक महानायक- डॉ. बी. आर. आंबेडकर' मालिकेत महत्त्वाचा अध्याय; सयाजीराव गायकवाड भीमरावांना देणार शिष्यवृत्ती
Sandeep MehtaImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Apr 21, 2022 | 4:39 PM

एण्‍ड टीव्‍हीवरील ‘एक महानायक – डॉ. बी. आर. आंबेडकर’ (Ek Mahanayak Dr B R Ambedkar) या मालिकेने आंबेडकर जयंतीवर आधारित स्‍पेशल एपिसोड प्रेक्षकांच्या भेटीला आणला. आता मालिकेमध्‍ये महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्‍या प्रवेशासह महत्त्वपूर्ण एपिसोड पाहायला मिळणार आहे. लोकप्रिय टेलि‍व्हिजन अभिनेता संदीप मेहता (Sandeep Mehta) ही भूमिका साकारणार आहेत. या एपिसोडचे कथानक एका ऐतिहासिक घटनेवर प्रकाश टाकेल, जेथे बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड हे निःपक्षपातीपणे आणि निष्पक्ष स्पर्धेद्वारे भीमराव आंबेडकरांना शिष्यवृत्ती देणार आहेत. केळुसकर गुरुजी भीमरावांची महाराज सयाजीराव गायकवाड यांच्याशी ओळख करून देतात आणि भीमरावांना शिष्यवृत्ती देण्याची विनंती करतात. पण, शिष्यवृत्तीच्या शर्यतीत आणखी एक उमेदवार असल्याचे त्यांच्या लक्षात येते. भीमराव राजाकडे न्याय आणि न्याय्य वागणुकीची मागणी करतात. तेव्हा राजा शिष्‍यवृत्तीसाठी योग्‍य उमेदवाराची निवड करण्‍याकरिता स्‍पर्धेची घोषणा करतात.

अभिनेता संदीप मेहता यांनी अनेक टेलिव्हिजन मालिका व चित्रपटांमध्‍ये काम केले आहे. या मालिकेबद्दल ते म्‍हणाले, ”ही अत्यंत महत्त्वपूर्ण भूमिका आहे. आम्‍ही शूटिंगला सुरूवात केली आहे आणि त्याचा अनुभव खूपच चांगला आहे. मी पडद्यावर ही भूमिका व कथानक कशाप्रकारे दिसते हे पाहण्‍यासाठी उत्‍सुक आहे. मी अनेक संस्‍मरणीय भूमिका साकारल्‍या असल्‍या तरी ही पूर्णत: वेगळी भूमिका आहे. ही महाराज सयाजीराव गायकवाड यांची ऐतिहासिक भूमिका आहे, ज्‍यांनी प्रमुख सामाजिक व शैक्षणिक सुधारणा केल्‍या. त्‍यांचा भेदभाव न करता लोकांची निष्‍पक्षपणे सेवा करण्‍यावर दृढ विश्‍वास होता.”

आगामी एपिसोडबाबत सांगताना भीमरावांच्या भूमिकेतील अथर्व म्‍हणाले, ”डॉ. बी. आर. आंबेडकर यांनी महाराजा सयाजीरावांचा आदर केला आणि भीमरावांच्या शैक्षणिक उद्दिष्टे साध्य करण्यासाठी त्यांनी दिलेल्या पाठिंब्याबद्दल ते कृतज्ञ होते. आगामी एपिसोड भीमरावांच्या जीवन प्रवासातील या महत्त्वपूर्ण आणि ऐतिहासिक भागावर प्रकाश टाकतो. भीमरावांच्या विविध शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी महाराजांनी भीमरावांना त्यांची क्षमता सिद्ध करण्‍यासोबत दीर्घकाळासाठी योग्य संधी देखील दिली. मला खात्री आहे की, भीमरावांच्या आयुष्यातील हा टर्निंग पॉईंट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेईल आणि एक प्रेरणादायी व लक्षवेधक कथानक पाहायला मिळेल.” ही मालिका सोमवार ते शुक्रवार रात्री 8.30 वाजता एण्‍ड टीव्‍हीवर प्रेक्षकांच्या भेटीला येते.

हेही वाचा:

‘लग्न.. लग्न.. लग्न..’; लग्नपत्रिकेवर छापला KGF 2 मधील यशचा डायलॉग; वाचून तुम्हीही पोट धरून हसाल!

Chandramukhi Trailer: चंद्रा, दौलतराव, दमयंतीची नाट्यमय कहाणी; ‘चंद्रमुखी’च्या ट्रेलरमध्ये प्रेक्षकांसाठी खास सरप्राइज

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.