Swarn Ghar: पंख्यात दुपट्टा अडकल्याचा सीन पाहून प्रेक्षकांनी डोक्याला मारला हात; ट्रोल होताच अभिनेत्रीचं स्पष्टीकरण

मालिकांमध्ये अनेकदा असे दृश्य दाखवले जातात, ज्यांना काहीच अर्थ नसतो. अनेकदा असे वाढीव सीन्स ट्रोलिंगचे शिकार होतात. कुठलाही तर्क न लावता चित्रित केलेले हे दृश्य पाहून प्रेक्षकांनाही हसू अनावर होतं. असंच एक दृश्य सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे.

Swarn Ghar: पंख्यात दुपट्टा अडकल्याचा सीन पाहून प्रेक्षकांनी डोक्याला मारला हात; ट्रोल होताच अभिनेत्रीचं स्पष्टीकरण
Sangita GhoshImage Credit source: Twitter
Follow us
| Updated on: May 14, 2022 | 5:21 PM

मालिकांमध्ये अनेकदा असे दृश्य दाखवले जातात, ज्यांना काहीच अर्थ नसतो. अनेकदा असे वाढीव सीन्स ट्रोलिंगचे शिकार होतात. कुठलाही तर्क न लावता चित्रित केलेले हे दृश्य पाहून प्रेक्षकांनाही हसू अनावर होतं. असंच एक दृश्य सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. ‘स्वर्ण घर’ (Swarn Ghar) या मालिकेतील नुकत्याच पार पडलेल्या एपिसोडमध्ये हे दृश्य दाखवण्यात आलं होतं. मात्र हा सीन पाहून प्रेक्षकांनी डोक्यावरचा हात मारला. त्यावरून अनेकांनी ट्विटरवर मीम्स पोस्ट केले असून विविध हास्यास्पद प्रतिक्रियासुद्धा येऊ लागल्या आहेत. फक्त नेटकरीच नव्हे तर छोट्या पडद्यावरील इतरही काही कलाकारांनी त्या सीनची खिल्ली उडवली आहे. अखेर यावर आता मालिकेतल्या अभिनेत्रीने (Sangita Ghosh) सोशल मीडियावर भलीमोठी पोस्ट लिहित स्पष्टीकरण दिलं आहे. ‘अशा परिस्थितीत कलाकारांकडे कुठलाही निर्णय घेण्याचा, किंवा काही बदल करण्याचा अधिकार फारच क्वचित असतो’, असं तिने म्हटलंय. त्याचप्रमाणे मालिकेच्या सीनची खिल्ली उडवणाऱ्या काम्या पंजाबीलाही (Kamya Punjabi) तिने सुनावलंय.

व्हायरल व्हिडीओमध्ये नेमकं काय दाखवलंय?

कलर्स टीव्हीवरील ‘स्वर्ण घर’ या मालिकेतील एका सीनमध्ये असं दाखवलंय की, स्वर्ण बेदी (संगीता) तिचा दुपट्टा खांद्यावर घेत असताना तो मागे चालू असलेल्या पंख्यात अडकतो. पंख्यात दुपट्टा अडकून स्वर्णचा गळा आवळला जातो. तिच्या समोर असलेला अजय चौधरी हा तिचा दुपट्टा गळ्यातून काढण्याचा प्रयत्न करतो मात्र ते त्याला काढता येत नाही. इतकंच नव्हे तर त्याठिकाणी उभे असलेले सर्वजण फक्त तमाशा बघत उभे असतात. थोड्या वेळानंतर अजय तिचा दुपट्टा फाडण्याचा प्रयत्न करतो. दुसरीकडे एक तरुणी पंखा बंद करण्याचा प्रयत्न करते, मात्र पंख्याचा प्लग तिच्याकडून निघत नाही. याच दृश्याला नेटकऱ्यांनी जोरदार ट्रोल केलंय.

हे सुद्धा वाचा

नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया-

अभिनेत्री संगीता घोषची पोस्ट-

‘मी प्रत्येक गोष्ट थोडं मस्करीतच घेते. या व्हिडीओच्या बाबतीतसुद्धा मी तेच केलं. मला असं वाटतं, जेव्हा तुमचे प्रेक्षक तुमच्यावर इतका प्रेमाचा आणि कौतुकाचा वर्षाव करतात, तेव्हा त्यांना टीका करण्याचाही तेवढाच अधिकार असतो. सेटवर सर्वांनाच मी हे म्हटलं होतं की, आपण व्हायरल होऊ. आपण खऱ्या आयुष्यात आणि शोजमध्येही चुका करतो. मात्र ते विसरून पुढं जाणं गरजेचं असतं. ज्या पद्धतीने आम्ही तो सीन प्लॅन केला होता, तसा तो झाला नाही. आम्ही कुठे चुकलो, हे टीमला आधीच कळालं आहे. कलाकार म्हणून आम्हाला यात फार काही बोलता येत नाही. पण पुढच्या वेळी आम्ही नक्की अधिक काळजी घेऊ. आमच्या मालिकेला आतापर्यंत प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला. होय, आमचं थोडंसं चुकलं, पण याचा अर्थ असा नाही की आमचं काम चांगलं नाही’, असं तिने या पोस्टमध्ये म्हटलंय.

काम्या पंजाबीला उत्तर

अभिनेत्री काम्या पंजाबीनेही संगीताच्या या सीनची खिल्ली उडवली होती. ‘यामुळेच काही प्रतिभावान कलाकार असूनही चित्रपट आणि वेबच्या तुलनेत टीव्हीच्या कंटेटकडे दुर्लक्ष केलं जातं’, असं काम्याने ट्विट केलं. त्यावर संगीताने तिला सुनावलं, ‘जी व्यक्ती स्वत: या इंडस्ट्रीत काम करतेय, तिच या इंडस्ट्रीत कमीपणा असल्यासारखं दाखवतेय. लाज वाटली पाहिजे’, असं संगीता म्हणाली.

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.