Aai Kuthe Kay Karte: ‘आई कुठे काय करते’ मालिकेच्या सेटवर भुताचा वावर? भीतीने संजनाचा उडाला थरकाप

तयार होण्यासाठी म्हणून मेकअपरुमध्ये जात असताना सेटवर अचानक लाईट्स बंद झाले. काही वेळाने पुन्हा सुरु झाले. सुरुवातीला पावसामुळे हे होतं असावं असं संजनाला वाटलं. मात्र हा खेळ काही मिनिटं असाच सुरु राहिला.

Aai Kuthe Kay Karte: 'आई कुठे काय करते' मालिकेच्या सेटवर भुताचा वावर? भीतीने संजनाचा उडाला थरकाप
भीतीने संजनाचा उडाला थरकाप Image Credit source: Tv9
Follow us
| Updated on: Jul 18, 2022 | 1:01 PM

स्थळ- आई कुठे काय करतेचा (Aai Kuthe Kay Karte) सेट. वेळ रात्री नऊची. नाईट शिफ्ट असल्यामुळे सेटवर मोजकेच कलाकार उपस्थित होते. सीनसाठी प्रत्येक जण आपापल्या मेकरुपमध्ये तयार होत होते. संजनाही (Rupali Bhosale) घाईघाईने सेटवर पोहोचली. तयार होण्यासाठी म्हणून मेकअपरुमध्ये जात असताना सेटवर अचानक लाईट्स बंद झाले. काही वेळाने पुन्हा सुरु झाले. सुरुवातीला पावसामुळे हे होतं असावं असं संजनाला वाटलं. मात्र हा खेळ काही मिनिटं असाच सुरु राहिला. तिच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि तिने मदतीसाठी सेटवर (Serial Set) प्रॉडक्शनच्या लोकांना हाक मारायला सुरुवात केली. काही कळायच्या आत संजनासमोर एक विचित्र चेहऱ्याची व्यक्ती समोर आली. या व्यक्तीला पाहून संजनाचा भीतीने थरकाप उडाला आणि ती जोरजोरात ओरडायला लागली. तिचा आरडाओरडा पाहून सहकलाकार मदतीसाठी धावून आले.

संजनाप्रमाणेच सुख म्हणजे नक्की काय असतंच्या सेटवरही काहीसा असाच किस्सा घडला. शिर्केपाटलांच्या जुन्या वाड्यात शूटिंग सुरु होतं. शालिनीचा सीन सुरु होता आणि अचानक शूटिंगदरम्यान तिला एक अनोळखी व्यक्ती दिसली. अंधारात नेमकं काय घडतंय हे सुरुवातीला तिला कळलं नाही. मात्र विचित्र चेहऱ्याच्या या व्यक्तीला पुन्हा पाहताच शालिनीच्या काळजाचा ठोका चुकला.

हे सुद्धा वाचा

आई कुठे काय करते आणि सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या सेटवर वावरणारी ही व्यक्ती म्हणजे भूत आहे हे एव्हाना स्पष्ट झालं होतं. हे भूत म्हणजे दुसरं तिसरं कुणी नसून एलिजाबेथचं आहे. नर्सच्या वेशात वावरणाऱ्या या एलिजाबेथला पाहून भीतीने थरकाप उडाल्याशिवाय राहत नाही. ही एलिजाबेथ म्हणजे स्वप्नील जोशी आणि पूजा सावंत यांच्या मुख्य भूमिका असलेल्या बळी या चित्रपटातील होती. या हॉरर-थ्रीलर चित्रपटात सात वर्षांचा मुलगा मंदारच्या वडिलांच्या भूमिकेत स्वप्नील जोशी असून मंदारच्या उपचारादरम्यान हॉस्पिटलमध्ये घडणाऱ्या अनेक रहस्यमय घटना आणि त्याचा एलिजाबेथशी असणारा संबंध याचा उलगडा चित्रपटातून होतो.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.