छोट्यांचं मोठं स्वप्नं साकारणार ‘सा रे ग म प लिटील चॅम्प’, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला!

झी मराठीचा ‘सा रे ग म प’ हा अनेकांच्या स्वप्नपूर्तीचा मंच आहे, असं म्हंटल तर खोटं ठरणार नाही. या मंचाने आजवर अनेक उत्तमोत्तम गायक, गायिका, संगीतकार या मनोरंजन क्षेत्राला दिले आहेत. फक्त लोकप्रियताच नाही तर, खऱ्या अर्थाने या मंचाने गायक, गायिका घडवले असून, त्यांच्या संगीत क्षेत्रातील प्रवास यशस्वी बनवला आहे.

छोट्यांचं मोठं स्वप्नं साकारणार ‘सा रे ग म प लिटील चॅम्प’, लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला!
सारेगमप
Follow us
| Updated on: Jun 14, 2021 | 11:30 AM

मुंबई : झी मराठीचा ‘सा रे ग म प’ हा अनेकांच्या स्वप्नपूर्तीचा मंच आहे, असं म्हंटल तर खोटं ठरणार नाही. या मंचाने आजवर अनेक उत्तमोत्तम गायक, गायिका, संगीतकार या मनोरंजन क्षेत्राला दिले आहेत. फक्त लोकप्रियताच नाही तर, खऱ्या अर्थाने या मंचाने गायक, गायिका घडवले असून, त्यांच्या संगीत क्षेत्रातील प्रवास यशस्वी बनवला आहे. सारेगमपचा हा प्रतिष्ठित मंच गेली अनेक वर्ष प्रेक्षकांचं मनोरंजन करत असून या कार्यक्रमाने तमाम संगीतप्रेमींच्या मनात एक अढळ स्थान निर्माण केलं आहे (SaReGaMaPa little champs singing reality show new season on zee Marathi).

‘सा रे ग म प’च्या या प्रवासात अनेक पर्व गाजली आणि त्यात विशेष उल्लेख करावा लागेल तो 12 वर्षांपूर्वी झालेल्या ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’चा (SaReGaMaPa little champs). अनेक टॅलेंटेड लिटिल चॅम्प्सच्या अफलातून परफॉर्मन्सेसमुळे हे पर्व तुफान गाजलं. या छोट्या मुलांच्या गाण्यांना साथ होती ती म्हणजे कमलेश भडकमकर आणि त्यांचा वादक मित्रांची. निलेश परब यांची ‘ढोलकी’, अमर ओक यांची ‘बासरी’, अर्चिस लेलेंचा ‘तबला’, सत्यजित प्रभू यांचा ‘सिंथेसायजर’, या मंडळींनी ही वाद्य वाजवायला घेतली की कानसेनांचे कान तृप्त व्हायचे, जणू ही वाद्य आपल्याशी बोलत आहेत असे वाटे.

‘पंचरत्नां’ची जादू

या पर्वातील महाअंतिम फेरीत पोहोचलेली पंचरत्न म्हणजेच रोहित राऊत, कार्तिकी गायकवाड, मुग्धा वैशंपायन, प्रथमेश लघाटे, आर्या आंबेकर यांनी प्रेक्षकांची मन तर जिंकलीच, पण या कार्यक्रमाने या पंचरत्नांना संगीत क्षेत्रात उतरण्यासाठी तयार केलं आणि त्यांची एक वेगळी ओळख निर्माण केली. झी मराठीवर गाजलेल्या मालिकांची शीर्षक गीत गाण्याची संधी या पंचरत्नांना मिळाली. या पंचरत्नांनी मनोरंजन सृष्टीत नावलौकिकता मिळवली.

आता नवीन पिढीतून काही उमदा गायक गायकांना घडवण्याचा वारसा जपत जवळपास 12 वर्षांनी ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमाची झलक वाहिनीवर पाहिल्यानंतर लिटिल चॅम्प्सच्या नवीन पर्वाची चर्चा घराघरांत सुरु झाली. यावेळी स्पर्धेत परीक्षक नसून ‘ज्युरी’ असणार आहेत. हे ज्युरी दुसरे कोणी नसून, आपले ‘पंचरत्न’ असणार आहेत. हे ज्युरी आपल्या छोट्या स्पर्धकांचे मोठं स्वप्न साकारण्यासाठी मार्गदर्शन करणार आहेत.

मृण्मयी देशपांडेच्या हाती सूत्रसंचालनाची धुरा

यासोबतच या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन ‘मृण्मयी देशपांडे’ करणार आहे. या पर्वाचे नावीन्य म्हणजे या पर्वात कोणतही एलिमिनेशन होणार नाही. छोट्या स्पर्धकांवर स्पर्धेतून बाहेर पडण्याचं कोणतंही दडपण नसेल. हो पण एलिमिनेशन नसलं, तरी या गायक मित्र मैत्रिणींना आपलं गाणं रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मेहनत घ्यावीच लागणार आहे. म्हणजेच या 14 छोट्या स्पर्धकांचा महाअंतिम सोहोळ्यापर्यंतचा प्रवास अनोखा असणार हे नक्की!

नवे पर्व ठरणार खास!

‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ हा कदाचित मराठीतला एकमेव रिऍलिटी शो असेल ज्यात एकही स्पर्धक महाअंतिम सोहोळ्यापर्यंत स्पर्धेबाहेर जाणार नाही. महाराष्ट्रातील उत्तोमत्तम गायकांचा शोध हा कार्यक्रम घेतो, त्यामुंळे लहानग्या गायकांसाठी सा रे ग म प पुन्हा एकदा नवी उमेद घेऊन आलं आहे. ही बच्चेकंपनी पुढे संगीतक्षेत्रात स्वतःची ओळख निर्माण करतीलच, ही ओळख आणि लिटिल चॅम्प्सचं मोठं स्वप्न साकारण्यासाठी झी मराठी आणि सारेगमपचा मंच सज्ज झाला आहे.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने झी मराठीवरील प्रेक्षकांच्या लाडक्या कलाकारांनी देखील आपल्या लहानपणीचे फोटोज शेअर केले असून त्यांचं छोटेपणीचं मोठं स्वप्न त्यांच्या चाहत्यांसोबत शेअर केलं आहे. सारेगमप लिटिल चॅम्प्स या कार्यक्रमाच्या स्वागताची कलाकारांची हि अनोखी पद्धत प्रेक्षकांना खूपच भावली. त्यांच्या या पोस्ट्सवर प्रेक्षक प्रेमाचा वर्षाव करत आहेत. 24 जूनपासून गुरुवार ते शनिवार रात्री 9.30 वाजता सारेगमप लिटिल चॅम्प्स प्रेक्षकांच्याच्या भेटीस येणार आहे.

(SaReGaMaPa little champs singing reality show new season on zee Marathi)

हेही वाचा :

Sushant Singh Rajput Death Anniversary | अंकिता लोखंडेला आली सुशांतची आठवण, घरी आयोजित केली पूजा

Video | Indian Idol 12च्या मंचावर राखी सावंतची तुफान ‘लावणी’, ‘ड्रामा क्वीन’चा डान्स पाहून चाहते म्हणतात…

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.