कपिल शर्माच्या शोसारखाच ‘सरगम की साढे साती’ देणार लॉफ्टरचा डोस; सोनीवर नवीन मालिका

सोनी टिव्हीवरील कॉमेडी शो 'द कपिल शर्मा' ने आतापर्यंत मनोरंजन केले आहे. मात्र, लॉकडाउननंतर कपिल शर्मा शो अचानक बंद झाला आहे.

कपिल शर्माच्या शोसारखाच ‘सरगम की साढे साती’ देणार लॉफ्टरचा डोस; सोनीवर नवीन मालिका
Follow us
| Updated on: Feb 22, 2021 | 6:29 PM

मुंबई : सोनी टिव्हीवरील कॉमेडी शो ‘द कपिल शर्मा’ ने आतापर्यंत प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. मात्र, लॉकडाउननंतर कपिल शर्मा शो अचानक बंद झाला आहे. अशा परिस्थितीत सोनी एंटरटेनमेंट टेलिव्हिजनने एक नवीन विनोदी मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. ज्याचे नाव आहे, ‘सरगम की साढे साती’ (Sargam Ki Sare Saati) असे आहे. या मालिकेची कहाणी सरगम नावाच्या एका स्त्रीवर आधारित आहे. लग्न झाल्यानंतर सरगमला जरा वेगळे सासर मिळाले आहे. (‘Sargam Ki Sare Saati’ new series on Sony TV)

तिच्या सासरच्या घरामध्ये ती एकटी स्त्री आहे. इतर सर्व पुरुष सदस्य घरात आहेत. अशी अनोखी मालिका आजपासून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ही मालिका सोमवार ते शुक्रवार रात्री साडेआठ वाजता प्रसारित होईल. मालिकेमध्ये गाझियाबादच्या अवस्थी कुटूंबाची कहाणी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेत सरगमची भूमिका प्रसिध्द अभिनेत्री अंजली तत्रारी करत आहे.

त्याचवेळी कुणाल सलूजा अपारशक्ती अवस्थीच्या भूमिकेत आहे. दर्शन जरीवाला, सनत व्यास, ओजस रावल, यश सहगल, विष्णू भोलवाणी, आकाश माखीजा आणि क्रिश चुग आदी या मालिकेत दिसणार आहेत. मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत असलेली सरगम ही एक साधी सरळ स्त्री आहे. तिला जेवण तयार करता देखील येत नाही. मात्र, तिला सासरी आल्यावर हे सर्व करावे लागते.

सरगमला ज्या गोष्टी करता येत नाहीत त्या करण्याची अतिशय इच्छा असते परंतू ती ज्या गोष्टी चांगल्या करण्याचा प्रयत्न करते त्यासर्व गोष्टी तिच्या आयुष्यात उलट्या होतात. सरगमचा पती अपारशक्ती अवस्थी म्हणजेच अप्पू, जो जगासाठी थोडासा ज्ञानी आहे पण तो घरात जुगाड करण्यामध्ये माहिर आहे. दुसरीकडे, दादाजी आनंदीलाल अवस्थी, जे लोकांची सहानुभूती गोळा करतात.

घरातील ज्येष्ठ परंतु सर्वात उत्साही सदस्य आहेत. शोमधील आणखी एक विशेष व्यक्तिरेखा म्हणजे छेदिलाल अवस्थी जे आजोबांचा मुलगा आहेत. लोक त्यांना कंजुस म्हणतात कारण त्यांचे लक्ष नेहमी पैशाची बचत करण्यावर असते. ते घरातील सर्वात जबाबदार सदस्य आहेत. ते एक साडीचे दुकान चालवतात आणि घरातील जो सदस्य घरातील नियम मोडतो त्याला शिक्षा देण्याचे काम छेदिलाल अवस्थी करतात.

त्यानंतर घरातील सर्वात रागीट माणूस म्हणजे आशा अमर अवस्थीला जर कोणी त्यांना आशा म्हटले तर ते लवकर रागात येतात. त्यांच्या रागामुळेच त्यांची पत्नी सीमा त्याच्यापासून विभक्त झाली. या घरात आधुनिक काळातील ब्रह्मचारी देखील आहे, ज्याचे नाव आस्तिक कुमार अवस्थी आहे. ते फक्त सरगमलाच बोलतो. या मालिकेमध्ये प्रेक्षकांना पोटभरून हासवण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या :

Video : सोनू सूदने उघडला ढाबा, खवय्यांना दिलं आवतन; म्हणाला…

Bigg Boss 14 : ‘बिग बॉस 14’चे विजेतेपद हुकल्यानंतर राहुल वैद्यची प्रतिक्रिया, म्हणाला….

सैफ-करीनाच्या बाळाचं नाव काय असेल?; रणधीर कपूर म्हणतात…

(‘Sargam Ki Sare Saati’ new series on Sony TV)

सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.