Shehnaaz Gill : सिद्धार्थ शुक्लाच्या अंत्यसंस्कारानंतर दिसली नाही शहनाज गिल, आता ‘या’ दिवशी दिसेल पहिली झलक!

शहनाज गिलच्या 'हौसला रख' या चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजच्या घोषणेबरोबरच, दिलजीत दोसांझने लोकांसोबत चित्रपटाची रिलीज डेट शेअर केली आहे. निर्माते हा चित्रपट 15 ऑक्टोबर रोजी रिलीज करतील, म्हणजेच चित्रपट दसऱ्याला जगभरात प्रदर्शित होतील. (Shahnaz Gill was not seen after Siddharth Shukla's funeral, now the first glimpse will be seen on 'this' day!)

Shehnaaz Gill : सिद्धार्थ शुक्लाच्या अंत्यसंस्कारानंतर दिसली नाही शहनाज गिल, आता 'या' दिवशी दिसेल पहिली झलक!
Follow us
| Updated on: Sep 26, 2021 | 2:13 PM

मुंबई : टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या (Siddharth Shukla) मृत्यूला आज 24 दिवस पूर्ण झाले आहेत. 2 सप्टेंबर रोजी त्यानं या जगाचा निरोप घेतला. टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्लाच्या निधनामुळे केवळ त्याचे जवळचे आणि त्याचे प्रियजनच अस्वस्थ झाले नाहीत तर संपूर्ण टीव्ही इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. त्याच्या अकाली निधनामुळे अनेक लोक तुटले आहेत. यानंतर त्याची खास मैत्रीण शहनाज गिलही चक्रावून गेली. दोघांचे अनेक व्हिडीओ आणि फोटो व्हायरल झाले. आता शहनाज गिलच्या आगामी ‘हौसला रख’ या चित्रपटाचं डबिंग सुरू झालं आहे. अशा परिस्थितीत शहनाज कामावर परतणार का, असा प्रश्न चाहते विचारत आहेत.

शहनाजच्या चित्रपटाचा ट्रेलर लवकरच होणार प्रदर्शित 

शहनाज गिल कधी कामावर परतणार हे अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी तिचा पहिला पंजाबी चित्रपट ‘हौसला रख’ चा ट्रेलर रिलीज होणार आहे. चित्रपटात पुरुष मुख्य भूमिकेत दिसणारा अभिनेता दिलजीत दोसांझ याने आपल्या अलीकडील ट्विटमध्ये ही माहिती शेअर केली आहे. त्यानं सांगितलं की चित्रपटाचा ट्रेलर 27 सप्टेंबर 2021 रोजी रिलीज होणार आहे, म्हणजेच पोस्टर रिलीज होण्यासाठी फक्त एक दिवस शिल्लक आहे. चित्रपटाचा ट्रेलर सोमवारी दुपारी 1 वाजता रिलीज होईल. अशा परिस्थितीत, सिद्धार्थ (Siddharth Shukla)च्या मृत्यूनंतर, लोक शहनाझ गिलला चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये प्रथमच पाहू शकतील.

चित्रपटाची रिलीज डेटही आली समोर 

शहनाज गिलच्या ‘हौसला रख’ या चित्रपटाच्या ट्रेलर रिलीजच्या घोषणेबरोबरच, दिलजीत दोसांझने लोकांसोबत चित्रपटाची रिलीज डेट शेअर केली आहे. निर्माते हा चित्रपट 15 ऑक्टोबर रोजी रिलीज करतील, म्हणजेच चित्रपट दसऱ्याला जगभरात प्रदर्शित होतील. शहनाज गिल आणि सोनम बाजवा स्टारर दिलजीत दोसांझच्या या चित्रपटाची एक नवीन पोस्ट देखील समोर आली आहे, जी विलक्षण दिसते.

पाहा ट्विट

शहनाजसाठी प्रार्थना करत आहेत चाहते 

आतापर्यंत शहनाज गिलची कोणतीही सोशल मीडिया पोस्ट समोर आलेली नाही. तसेच सिद्धार्थ शुक्लाच्या अंत्यसंस्कारापासून ती दिसलासुद्धा नाही. तसे, हा व्हिडीओ तिच्या शारीरिक परिवर्तनाचा आहे असे दिसते. लोक या व्हिडीओवर खूप कमेंट करत आहेत. लोकांना आता त्यांची आवडती शहनाज गिल कशी आहे हे जाणून घ्यायचं आहे. शहनाजच्या कुटुंबीयांकडून शहनाजच्या स्थितीबद्दल अद्याप कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. त्याच वेळी, इंडस्ट्रीतील अनेक सहकारी म्हणतात की ती अजूनही या दुःखातून सावरत आहे.

वयाच्या 40 व्या वर्षी जगाला दिला निरोप 

बिग बॉस फेम अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (Siddharth Shukla) आपले करोडो चाहत्यांना सोडून हे जग सोडून गेला. मिळालेल्या माहितीनुसार, 2 सप्टेंबर रोजी त्याला हृदयविकाराचा झटका आला, त्यानंतर त्याला कूपर रुग्णालयात नेण्यात आलं आणि तेथे त्याला मृत घोषित करण्यात आलं. त्याच्यावर दुसऱ्या दिवशी म्हणजेच 3 सप्टेंबर रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या प्रियजनांनी आणि कुटुंबाने त्याला अंतिम निरोप दिला. सिद्धार्थ शुक्ला फक्त 40 वर्षांचा होता. त्याच्या कुटुंबात त्याची आई आणि दोन बहिणी आहेत.

संबंधित बातम्या

Eijaz Khan Pavitra Punia : गर्लफ्रेंड पवित्रा पुनियाच्या कुटुंबियांना भेटला एजाज खान, लवकरच वाजणार सनई-चौघडा?

Romantic Song : अभिनेता अक्षय वाघमारे पहिल्यांदाच झळकणार रोमँटिक गाण्यात, ‘हळवेसे’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

Daughter’s Day 2021 : आंतरराष्ट्रीय कन्या दिवस, बापलेकीच्या नात्यावरील हे बॉलिवूड सिनेमे पाहाच

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.