Bigg Boss 16 | शालिन भनोट याने केली बिग बाॅसच्या घरात तोडफोड, वाचा काय घडले?
विकास आणि अर्चना यांच्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून भांडणे सुरू आहेत. किचनमध्ये गॅसवर चहा बनवण्यावरून यांच्यामध्ये वाद सुरू झाला.
मुंबई : बिग बाॅस सीजन 16 मधील आजच्या एपिसोडमध्ये मोठा धमाका होताना दिसणार आहे. नुकताच सोशल मीडियावर एक प्रोमो शेअर करण्यात आलाय. यामध्ये अर्चना आणि विकास यांच्यामध्ये जोरदार भांडणे होताना दिसत आहेत. विकास हा किचनमध्ये भांडे धुताना दिसत आहे. यावेळी अर्चना आणि विकासमध्ये परत एकदा भांडणास सुरूवात होते. भांडणामध्ये विकास हा चक्क अर्चना गाैतमचा बाप काढतो. हे ऐकून अर्चनाचा पारा चांगलाच चढतो आणि ती विकासला म्हणते की, तू तर आयुष्यामध्ये बाप कधीच होऊ शकत नाही.
विकास आणि अर्चना यांच्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून भांडणे सुरू आहेत. किचनमध्ये गॅसवर चहा बनवण्यावरून यांच्यामध्ये वाद सुरू झाला. अजूनही या दोघांमध्ये भांडणे होतानाच दिसत आहेत.
View this post on Instagram
व्हायरल झालेल्या प्रोमोमध्ये शालिन भनोट हा बिग बाॅसच्या घरातील साहित्याची तोडफोड करताना दिसतोय. शालिन भनोट याला कोणत्यातरी गोष्टीचा प्रचंड राग आल्याचे दिसत आहे.
शालिन भनोट बिग बाॅसला दरवाजा उघडण्याचे सांगतो. परंतू बिग बाॅस दरवाजा उघडत नसल्याने शालिन तोडफोड करतो. यानंतर साजिद खान हा शालिन याला समजवण्याचा प्रयत्न करतो.
View this post on Instagram
शालिनला समजवण्यासाठी टीना दत्ता देखील जवळ येते. परंतू टीनाला शालिन दूर करतो. आता आजच्या एपिसोडमध्ये हे स्पष्ट होईल की, बिग बाॅसच्या घरात नेमके काय झाले होते. ज्यामुळे शालिन भनोट याने तोडफोड करण्यास सुरूवात केली.
अंकित गुप्ता हा बिग बाॅसच्या घराबाहेर पडला आहे. मात्र, अंकित जेवढा बिग बाॅसच्या घरामध्ये चर्चेत नव्हता. त्यापेक्षा अधिक तो बाहेर पडल्यावर चर्चेत आलाय. अंकितचा हाॅटेल रूममधील एक व्हिडीओ व्हायरल झालाय.