तुनिशा शर्माच्या आत्महत्येनंतर अली बाबा: दास्तान-ए-काबुल मालिकेमधून शीजान खान याची सुट्टी
पोलिसांच्या चाैकशीमध्ये शीजान काही धक्कादायक खुलासे करत असल्याचे सांगितले जात आहे.
मुंबई : अली बाबा: दास्तान-ए-काबुल या मालिकेमध्ये मुख्य भूमिकेत असलेली टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मा हिने मालिकेच्या सेटवरच आत्महत्या करत जीवनयात्रा संपवली. तुनिशाच्या आत्महत्येनंतर अनेक मोठे खुलासे झाले. याच मालिकेच मुख्य भूमिकेत असलेल्या शीजान खान याच्यावर तुनिशाच्या आईने अत्यंत गंभीर आरोप केले. शीजान खान हा सध्या कोठडीमध्ये असून पोलिस याची चाैकशी करत आहेत. पोलिसांच्या चाैकशीमध्ये शीजान काही धक्कादायक खुलासे करत असल्याचे सांगितले जात आहे. तुनिशा शर्माच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
दास्तान-ए-काबुल या मालिकेमध्ये तुनिशा शर्मा आणि शीजान खान हे दोघेही मुख्य भूमिकेत होते. तुनिशा हिने आत्महत्या केली आणि शीजान खान हा सध्या कोठडीमध्ये आहे. यामुळे मालिकेचे नेमके पुढे काय होणार याबद्दल महत्वाची अपडेट मिळालीये.
मालिकेचे सध्या जितके भाग तयार आहेत, ते प्रसारित केले जाणार आहेत. तुनिशा ही दास्तान-ए-काबुल या मालिकेमध्ये शहजादीच्या भूमिकेत होती तर शीजान खान हा अली बाबाच्या भूमिकेत होता. दोन्ही मुख्य कलाकार असल्याने लगेचच नवे चेहरे हे मालिकेसाठी शोधणे शक्य नसल्याने मालिका काही दिवस ऑफ एअर होणार आहे.
दास्तान-ए-काबुल मालिकेचा दुसरा भाग थेट प्रेक्षकांच्या भेटीला येईल. म्हणजेच आता तुनिशासोबतच शीजान देखील यानंतर परत मालिकेमध्ये दिसणार नसल्याचे स्पष्ट होत आहे. दास्तान-ए-काबुल ही मालिका अत्यंत बिग बजेटची असल्याचे सांगितले जात आहे.
तुनिशा शर्मा आणि शीजान खान हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, 15 दिवसांपूर्वी यांचे ब्रेकअप झाल्याने तुनिशा ही तणावामध्ये होती आणि यामुळेच तिने आत्महत्या केल्याचा आरोप आहे. तुनिशाच्या आत्महत्येनंतर शीजानवर अनेक आरोप करण्यात आले आहेत.
दास्तान-ए-काबुल या मालिकेमधून शीजान खानची कायमच सुट्टी होणार असल्याचे आता जवळपास नक्कीच आहे. काल मुंबईमध्ये तुनिशा शर्मा हिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. आता पोलिस चाैकशीमधून नेमके काय पुढे येते हे पाहण्यासारखे ठरणार आहे.