Tunisha Sharma Death | शीजान खान याच्या अडचणीमध्ये वाढ? कोर्टाच्या पुढच्या सुनावणीकडे सर्वांच्या नजरा
तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येनंतर शीजान खान याच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण या प्रकरणात शीजान खान याच्यावर गंभीर आरोप केले जात आहेत. शीजान खान हा सध्या कोठडीमध्ये असून न्यायालयाकडून त्याला दिलासा मिळाला नाहीये.
मुंबई : टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा (Tunisha Sharma) हिने 24 डिसेंबर 2022 रोजी मालिकेच्या सेटवर गळफास घेत आत्महत्या केली. अली बाबा दास्तान ए काबुल मालिकेमध्ये तिच्यासोबत मुख्य भूमिकेत असलेल्या शीजान खान याच्यावर तुनिशाच्या आत्महत्येनंतर गंभीर आरोप करण्यात आले. तुनिशा हिने शीजान खान (Sheezan Khan) याच्याच मेकअप रूममध्ये गळफास घेतला. तुनिशा शर्मा हिच्या आईने या प्रकरणात शीजान खान याच्यावर अनेक गंभीर आरोप केले. तुनिशाच्या आईने केलेल्या आरोपांनंतर शीजान खान याला पोलिसांनी चाैकशीसाठी ताब्यात घेतले आणि मग अटक केली. विशेष म्हणजे अजूनही शीजान खान हा कोठडीमध्येच आहे. या प्रकरणात त्याच्या अडचणी सातत्याने वाढताना दिसत आहेत.
तुनिशा शर्मा आणि शीजान खान हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, तुनिशा शर्मा हिने आत्महत्या करण्याच्या काही दिवस अगोदरच यांचे ब्रेकअप झाले. शीजान खान याच्यासोबत ब्रेकअप झाल्यानेच तुनिशा शर्मा ही तणावात असल्याचे सांगण्यात आले. तिने काही दिवसांपूर्वीच तिच्या आईला सांगितले होते की, शीजान खान हा मला धोका देत आहे.
तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येनंतर या प्रकरणात अनेक मोठे खुलासेही झाले. आता शीजान खान याच्या वकिलाने कोर्टामध्ये शीजान खान याने तुनिशाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाला विरोध केला आहे. तुनिशा शर्मा आत्महत्या प्रकरणात शीजान खान याला कोर्टाकडून अजूनही दिलासा मिळाला नाहीये. पत्रकार परिषद घेत तुनिशा शर्मा हिच्या आईने काही खुलासे केले होते. तर शीजान खान याच्याही कुटुंबियांनी एक पत्रकार परिषद घेत तुनिशाच्या आईवर आरोप केले.
शीजान खान याला जामिनावर सोडण्याची विनंतीही कोर्टाकडे त्याच्या वकिलाने केली आहे. आता या सर्व प्रकरणातील पुढील सुनावणी ही 2 मार्चला होणार आहे. या पुढील सुनावणीकडे सर्वांच्या नजरा आहेत. शीजान खान याच्यावर गंभीर आरोप करण्यात आले असून फक्त तुनिशा शर्मा हिलाच नाहीतर शीनज खान हा अजूनही काही मुलींना डेट करत होता.
अली बाबा दास्तान ए काबुल मालिकेमधून शीजान खान याचा पत्ता कट झालाय. शीजान खान याच्या पात्रासाठी एका दुसऱ्या अभिनेत्याला संधी देण्यात आलीये. मात्र, तुनिशा शर्मा हिच्या पात्रामध्ये कोण दिसणार हे कळू शकले नाहीये. तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येनंतर अली बाबा दास्तान ए काबुल मालिकेच्या सेटवर भीतीचे वातावरण बघायला मिळत होते. मात्र, आता मालिकेचा सेट दुसरीकडे स्थलांतरीत करण्यात आलाय.