शीजान खान याच्या वकिलाने तुनिशा शर्मा हिच्या आईने केलेल्या आरोपांवर दिले उत्तर, म्हटले की…
शीजान खान हा सध्या पोलिस कोठडीमध्ये असून त्याची कसून चाैकशी पोलिस करत आहेत.
मुंबई : अली बाबा: दास्तान-ए-काबुल मालिकेच्या सेटवर गळफास घेत टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मा हिने आपली जीवनयात्रा संपवली. मात्र, तुनिशाने अनेक प्रश्न मागे सोडले आहेत. तुनिशाच्या आत्महत्येनंतर तिची आई लेकीला न्याय मिळून देण्यासाठी धडपड करत आहे. तुनिशाच्या आईने शीजान खान याच्यावर गंभीर आरोप केले आहेत. शीजान खान हा सध्या पोलिस कोठडीमध्ये असून त्याची कसून चाैकशी पोलिस करत आहेत. शीजान खान याचा मोबाईलही पोलिसांनी जप्त केला आहे.
तुनिशा शर्मा हिच्या आईने एक नाहीतर अनेक गंभीर आरोप शीजान खान याच्यावर केले आहेत. शीजान हा मालिकेच्या सेटवरच ड्रग्स घेत असल्याचे तिच्या आईने सांगून मोठी खळबळ निर्माण केलीये.
शीजान खान आणि तुनिशा शर्मा हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते आणि त्याने तुनिशाला लग्न करणार असल्याचे वचन देखील दिले होते. परंतू शीजान खान हा अनेक मुलींच्या संपर्कामध्ये असल्याचे तुनिशाच्या आईने सांगितले.
तुनिशाने शीजान खान याचा फोन चेक केला असता तो तिला धोका देत असल्याचे तुनिशाच्या लक्षात आले आणि यांच्यामध्ये वाद झाला. यामुळेच यांचे ब्रेकअप झाल्याचे तुनिशाच्या आईने सांगितले.
In the investigation, it has become clear that Police has no evidence against Sheezan. All allegations made by Tunisha’s mother are baseless. Police is investigating the case, we should wait. I am very confident that Sheezan will be proven not guilty: Accused Sheezan’s advocate pic.twitter.com/qY83qy64ag
— ANI (@ANI) December 30, 2022
गंभीर आरोप करत तुनिशाची आई म्हणाली की, बुरखा घालण्यासाठी आणि उर्दू शिकण्यासाठी शीजान दबाव आणत होता. तुनिशाच्या आईने केलेल्या गंभीर आरोपांवर आता शीजान खान याच्या वकिलाने मोठे विधान केले आहे.
शीजान खान याच्या वकिलाने म्हटले की, तुनिशा शर्माचे कुटुंबिय जे काही आरोप करत आहेत, ते सर्व निराधार आहेत. इतकेच नाहीतर या प्रकरणात पोलिसांना काहीच पुरावे मिळाले नसल्याचे देखील शीजानचा वकिलाने म्हटले आहे.
पुढे शीजान खान याचे वकिल म्हणाले, तुनिशा शर्मा हिची आई जे काही आरोप करत आहे, ते सर्व बिनबुडाचे आहेत. पोलिसांच्या तपासाची आपण वाट पाहायला हवी, असे ही त्यांनी म्हटले आहे.