तुनिशा शर्मा हिच्या अंत्यसंस्कार वेळी शीजान खानच्या आई आणि बहिणीला अश्रू अनावर
तुनिशा शर्माच्या आत्महत्येनंतर तिच्या आईने शीजान खान याच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत.
मुंबई : टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्मा हिने मालिकेच्या सेटवर गळफास घेत जगाचा निरोप घेतला. मात्र, तुनिशा शर्मा हिच्या आत्महत्येनंतर अनेक धक्कादायक खुलासे होत आहेत. इतकेच नाहीतर तुनिशाच्या आईने दास्तान-ए-काबुल मालिकेमध्ये तुनिशासोबतच मुख्य भूमिकेत असलेल्या शीजान खानवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. शीजान आणि तुनिशा हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते. मात्र, काही दिवसांपूर्वीच यांचे ब्रेकअप झाले होते आणि यामुळेच तुनिशा ही तणावामध्ये होती. तुनिशा हिने मालिकेच्या सेटवरील शीजान खान याच्या मेकअप रूममध्ये गळफास घेतला.
तुनिशा शर्माच्या आत्महत्येनंतर तिच्या आईने शीजान खान याच्यावर अनेक गंभीर आरोप केले आहेत. तुनिशाला शीजान खान याने धोका दिल्याचे देखील सांगितले जात आहे. दुसऱ्या मुलीसोबत शीजान रिलेशनशिपमध्ये होता.
तुनिशाच्या आत्महत्येनंतर तिच्या आईने FIR मध्ये शीजान खानवर गंभीर आरोप केले. या प्रकरणात पोलिसांनी शीजानला अटक केली असून तो आता कोठडीमध्ये आहे. शीजानचा फोन देखील पोलिसांनी जप्त केले आहे.
#WATCH | TV actor Tunisha Sharma death case | Sister and mother of accused Sheezan Khan also arrived at the crematorium ground in Mira Road area for her last rites. pic.twitter.com/HA0voEOwQr
— ANI (@ANI) December 27, 2022
आत्महतेच्या तीन दिवसांनंतर मुंबईमध्ये तुनिशा शर्मा हिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार पार पडले आहेत. तुनिशा शर्माच्या आईच्या डोळ्यांमधून अश्रू थांबत नाहीयेत. इतकेच नाहीतर अंत्यसंस्कार वेळी तुनिशाची आई बेशुद्ध पडली होती.
शीजान खानवर या प्रकरणात गंभीर आरोप करण्यात आलेले असतानाच तुनिशाच्या अंत्यसंस्कारला शीजान खान याची आई आणि बहिण उपस्थित होत्या. यावेळी या दोघीही रडताना दिसल्या. याचाच व्हिडीओ आता व्हायरल होतोय.