Shehnaaz Gill | सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत रमली शहनाज गिल, कठीण काळात स्वतःला ‘असं’ सावरलं!

‘बिग बॉस 13’ फेम शहनाज गिल (Shehnaaz Gill) अलीकडेच एका व्हिडीओमध्ये तिचा कथित बॉयफ्रेंड सिद्धार्थ शुक्लाची आठवण काढताना दिसली. यादरम्यान शहनाज गिलने तिच्या कठीण काळातही ती कशी खंबीर राहिली, हे देखील सांगितले.

Shehnaaz Gill | सिद्धार्थ शुक्लाच्या आठवणीत रमली शहनाज गिल, कठीण काळात स्वतःला ‘असं’ सावरलं!
Sidharth-Shehnaaz
Follow us
| Updated on: Jan 05, 2022 | 1:03 PM

मुंबई : ‘बिग बॉस 13’ फेम शहनाज गिल (Shehnaaz Gill) अलीकडेच एका व्हिडीओमध्ये तिचा कथित बॉयफ्रेंड सिद्धार्थ शुक्लाची आठवण काढताना दिसली. यादरम्यान शहनाज गिलने तिच्या कठीण काळातही ती कशी खंबीर राहिली, हे देखील सांगितले. वास्तविक, शहनाज गिल आणि आध्यात्मिक गुरू बीके शिवानी यांचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर चर्चेत आला आहे. या व्हिडीओमध्ये शहनाज गिल आध्यात्मिकरित्या बोलताना दिसत आहे. त्याच वेळी, अभिनेत्रीने खुलासा केला की तिने अनेकदा सिद्धार्थला सांगितले होते की, तिला त्याच्याशी खूप आधीपासून बोलायचे होते.

लोकप्रिय टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्लाने अचानक या जगाचा निरोप घेतला. अशा परिस्थितीत सिद्धार्थच्या सर्वात जवळची मानली जाणारी शहनाज गिलही बराच काळ शॉकमध्ये होती. तथापि, यादरम्यान, अभिनेत्रीचा पंजाबी अभिनेता आणि गायक दिलजीत दोसांझ सोबतचा ‘हौसला रख’ चित्रपट देखील प्रदर्शित झाला, ज्याला प्रेक्षकांचे खूप प्रेम मिळाले.

शहनाजचा सिद्धार्थकडे हट्ट!

सोशल मीडियावर समोर आलेल्या शहनाज गिलच्या व्हिडीओमध्ये ती बीके शिवानीसोबत संवाद साधताना दिसत आहे. या व्हिडीओमध्ये शहनाज गिल म्हणते की, ‘मी सिद्धार्थला अनेकदा सांगितले की, मला सिस्टर शिवानीला भेटायचे आहे. मला त्या खूप आवडतात. तोही नेहमी हो भेटूया असे म्हणायचा.’

शहनाज पुढे म्हणाली, ‘मी अनेकदा विचार करते की त्या आत्म्याने मला इतके ज्ञान कसे दिले, कारण त्यापूर्वी मी लोकांना समजू शकत नव्हते. कोणावरही भरवसा ठेवणारी मी खूप निरागस होते. पण आयुष्यात काय घडते याबद्दल त्याने मला खूप काही शिकवले. देवाने माझी त्याच्याशी ओळख करून दिली. मग आम्ही मित्रासारखे होतो. देवाने आमची ओळख फक्त यासाठी केली की त्याने मला आयुष्याबद्दल हे सर्व सांगावे. या दोन वर्षांत त्यांनी मला अनेक गोष्टी शिकवल्या.’

सिद्धार्थने मला खंबीर केले : शहनाज गिल

शहनाज पुढे म्हणाली की, ‘त्याच्यामुळेच मी तुम्हाला भेटले आहे. आता मला माझ्या आयुष्यातील गोष्टी कशा हाताळायच्या हे माहित आहे. आता मी खूप मजबूत आहे.’ गेल्या वर्षी 2 सप्टेंबरला टीव्ही अभिनेता सिद्धार्थ शुक्ला यांचे निधन झाले.

बिग बॉसचा विजेता ठरलेल्या सिद्धार्थने वयाच्या 40व्या वर्षी जगाचा निरोप घेतला होता. ‘बिग बॉस सीझन 13’मध्ये सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल यांना एकत्र पाहणे प्रेक्षकांना खूप आवडले होते. त्यावेळी चाहते दोघांनाही ‘सिडनाज’ म्हणू लागले. अभिनेता सिद्धार्थने त्याच्या करिअरमध्ये अनेक मालिकांमध्ये काम केले. ‘बालिका वधू’ आणि ‘दिल से दिल तक’ या शोने त्याला प्रेक्षकांमध्ये विशेष ओळख मिळवून दिली.

हेही वाचा :

Rajesh Pinjani | राष्ट्रीय पुरस्कार विजेते दिग्दर्शक राजेश पिंजाणी यांची अकाली एक्झिट, मराठी चित्रपट सृष्टीवर शोककळा

कुणाची अंगठी तर कुणासाठी ब्रेसलेट, जाणून घ्या तुमच्या सुपरस्टार्सचा लकी चार्म कोणता?

नृत्यांगना ते अभिनेत्री…‘पिंकीचा विजय असो’ मालिकेतील ‘पिंकी’ने हेमा मालिनींसोबतही केलंय काम!

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.