श्वेता तिवारीला मिळाली मुलगा रेयांशची कस्टडी, अभिनेत्रीने पती अभिनव कोहलीला फटकारले!
टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) आणि तिचा पती अभिनव कोहली (Abhinav kohli) गेल्या अनेक महिन्यांपासून मुलगा रेयांशच्या (Reyansh Tiwari) कस्टडीसाठी लढत आहेत. अभिनवने श्वेतावर त्याचा मुलगा रियंशला भेटू न देण्याचा आरोप केला होता.
मुंबई : टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारी (Shweta Tiwari) आणि तिचा पती अभिनव कोहली (Abhinav kohli) गेल्या अनेक महिन्यांपासून मुलगा रेयांशच्या (Reyansh Tiwari) कस्टडीसाठी लढत आहेत. अभिनवने श्वेतावर त्याचा मुलगा रियंशला भेटू न देण्याचा आरोप केला होता. श्वेता-अभिनव प्रकरणावर आज न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. मुंबई उच्च न्यायालयाने दिलेल्या माहितीनुसार, मुलाची कस्टडी श्वेताकडेच राहणार आहे आणि तिचा पती अभिनव कोहली याला त्यांच्या मुलाला भेटण्यासाठी वेळ ठरवून दिली जाणार आहे. न्यायालयाच्या या निर्णयानंतर श्वेता तिवारी खूप आनंदी आहे.
अभिनव कोहली आठवड्यातून एकदा आपल्या मुलाला भेटू शकतो. श्वेता मुलाला त्याच्यापासून दूर ठेवते, असा आरोप त्याने केला होता. अनेक वेळा अभिनवने म्हटले होते की, श्वेता तिच्या कामामुळे खूप व्यस्त आहे, आणि तिला तिच्या मुलासाठी वेळ नाही. न्यायालयाने अभिनवचा अर्ज फेटाळून श्वेताच्या बाजूने निकाल दिला आहे. रेयांश सुरुवातीपासूनच त्याची आई श्वेता हिच्यासोबत आहे. कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले आहे की, अभिनव आठवड्यातून एकदा श्वेताच्या इमारतीच्या परिसरात दोन तास मुलाला भेटू शकतो, परंतु त्यावेळी कुटुंबातील सदस्यांची उपस्थितीही असेल. तसेच, ते दोघे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे दररोज 30 मिनिटे बोलू शकतात.
श्वेताने व्यक्त केला आनंद
न्यायालयाच्या निर्णयानंतर श्वेता तिवारीने टाइम्स ऑफ इंडियाशी केलेल्या संभाषणात आपला आनंद व्यक्त केला आहे. ती म्हणाली, ‘मला तेच हवे होते आणि प्रामाणिकपणे सांगायचे तर मी या निर्णयावर समाधानी आहे. अभिनव गेल्या दोन वर्षात मी जिथे गेले तिथे माझा पाठलाग करायचा. मी जिथे दिल्ली किंवा पुण्यात रियांशसोबत माझा शो करायला जायचे, तिथे तो गोंधळ निर्माण करायचा. हे माझ्यासाठी आणि माझ्या बाळासाठी मानसिकदृष्ट्या त्रासदायक होते. तो इथेच थांबला नाही, कधीकधी तो माझ्या घराच्या दारापर्यंत यायचा.’
श्वेताने फेटाळले आरोप
श्वेताने असेही सांगितले की, तिने रियांश आणि अभिनव यांना बोलण्यापासून कधीही रोखले नाही. परंतु, तिच्यावर चुकीचे आरोप केले गेले. ती म्हणाला, ‘मी त्याला नेहमीच रियांशला भेटण्याचा अधिकार दिला. खरं तर, कोर्टाच्या आधीच्या आदेशानुसार, तिला रियांशशी फक्त अर्ध्या तासासाठी व्हिडिओ कॉलवर बोलायचे होते, पण मी त्याला कधीच जास्त बोलण्यापासून कधीही थांबवले नाही. पण त्याच व्यक्तीने मला वाईट आई म्हणून चित्रित केले. मी माझ्या कुटुंबासाठी काम करते आणि त्यांना चांगली जीवनशैली देण्यासाठी कठोर परिश्रम करते. त्यात काय चुकलं? पण तो त्याचा वापर माझ्याविरुद्ध करत राहिला आणि मला आनंद आहे की, न्यायालयाने ते आरोप फेटाळून लावले.’
हेही वाचा :
Mouni Roy | मौनी रॉय लवकरच ‘नवरीबाई’ बनणार, ‘या’ व्यावसायिकाशी बांधणार लग्नगाठ!
चंदीगडच्या हरनाझ संधूने कोरलं ‘मिस दिवा मिस युनिवर्स 2021’वर नाव, जाणून घ्या या मॉडेलविषयी…